AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कुस्तीपटूंचं आंदोलन मोडून काढल्याप्रकरणी विशाल ददलानीचा संताप; म्हणाला ‘नव्या महालाच्या भिंती आणखी..’

कुस्तीपटूंच्या आंदोलनाला रविवारी हिंसक वळण मिळालं. संसद भवनाकडे निघालेल्या या कुस्तीपटूंची पोलिसांनी धरपकड केली. या प्रकरणावर प्रसिद्ध गायक आणि संगीतकार विशाल ददलानीने तीव्र संताप व्यक्त केला आहे.

कुस्तीपटूंचं आंदोलन मोडून काढल्याप्रकरणी विशाल ददलानीचा संताप; म्हणाला 'नव्या महालाच्या भिंती आणखी..'
Vishal Dadlani on wrestler's protestImage Credit source: Twitter
| Updated on: Jan 17, 2025 | 2:29 PM
Share

नवी दिल्ली : नव्या संसद भवनाच्या उद्घाटन सोहळ्यापासून अवघ्या तीन किलोमीटर अंतरावर जंतर-मंतर इथं सुरू असलेल्या कुस्तीपटूंच्या आंदोलनाला रविवारी हिंसक वळण मिळालं. महिला महापंचायत भरविण्यासाठी संसद भवनाकडे निघालेल्या कुस्तीपटूंची पोलिसांनी धरपकड केली. त्यांना ताब्यात घेण्यात आल्यानंतर जंतर-मंतर इथलं सर्व साहित्य पोलिसांनी जप्त केलं. ऑलिम्पिक विजेते कुस्तीपटू बजरंग पुनिया, साक्षी मलिक, संगीता फोगट तसंच विनेश फोगट यांच्यासह आंदोलनाच्या आयोजकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषणाचा आरोप असलेले राष्ट्रीय कुस्ती महासंघाचे तत्कालीन अध्यक्ष आणि भाजपचे खासदार ब्रिजभूषण सिंह यांना अटक करण्याच्या मागणीसाठी रविवारी नव्या संसद भवनाबाहेर महापंचायत भरविण्याचा निर्णय कुस्तीपटूंनी घेतला होता. आता या सर्व प्रकरणावर बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक आणि संगीतकार विशाल ददलानीने प्रतिक्रिया दिली आहे.

विशालने याप्रकरणी ट्विट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नव्या संसद भवनावर निशाणा साधला. साक्षी मलिकने पोस्ट केलेला व्हिडीओ शेअर करत विशालने लिहिलं, ‘नव्या महालाच्या भिंती आणखी मोठ्या असतील, जेणेकरून बाहेरून येणाऱ्या जनतेचा आवाज आणखी दाबला जाईल.’ विशालच्या या पोस्टवर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत. काहींनी या ट्विटवरून विशाललाच ट्रोल केलं आहे.

आंदोलकांना ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी जंतर-मंतरवरील तंबू उखडून टाकले. आंदोलकांनी आणलेल्या गाद्या, चटया, कुलर, पंखे, ताडपत्री आणि इतर साहित्यही बाजूला केले आणि संध्याकाळपर्यंत आंदोलन पूर्णपणे मोडून काढलं. मोर्चाला परवानगी दिली नव्हती, तरीही आंदोलकांनी कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केल्यामुळे त्यांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती दिल्ली पोलिसांनी दिली. कुस्तीपटूंना धक्काबुक्की करून फरपटत बसगाड्यांमध्ये कोंबण्यात आलं असा आरोप आंदोलकांनी केला.

ब्रिजभूषण यांच्याविरोधातील तक्रारीची केंद्र सरकारने गंभीर दखल न घेतल्यामुळे गेल्या महिन्याभरापासून महिला कुस्तीपटू जंतरमंतरवर ठिय्या आंदोलन करत आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपामुळे अखेर दिल्ली पोलिसांना ब्रिजभूषणविरोधात गुन्हा दाखल करावा लागला. न्याय मिळेपर्यंत आंदोलन कायम ठेवण्याचा निर्णय आंदोलकांनी घेतला होता. या आंदोलनाला विविध खाप पंचायची, हरियाणा आणि पंजाबमधील शेतकरी संघटनांचा पाठिंबा आहे.

Follow Us
मी पुन्हा येईल, मी... फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
Abhijeet Dipake On CM Fadnavis : जेलमध्ये टाकलं तर... मीच तेच म्हणेल जे तुम्ही म्हणायचे; मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल...मुख्यमंत्री फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
Abhijeet Dipke : खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर अभिजीत दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं कौतुक
Abhijeet Dipke : मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; अभिजीत दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं तोंडभरून कौतुक
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ते.....
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ‘वोटचोर ग्यानू’पर्यंत भन्नाट पोस्टर्स होतायेत व्हायरल
दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; शिरसाटांचा विरोधकांना..
Sanjay Shirsat : दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; संजय शिरसाटांचा विरोधकांना थेट सवाल, पुढे म्हणाले...
CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच..
Mumbai CJP Protest : ज्ञानेश कुमारांविरोधात शिवाजी पार्कवर रणकंदन; CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच...
परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी....
Mumbai CJP Protest : परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी;  ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी CJPचं जेलभरो आंदोलन
हे आंदोलन म्हणजे..; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले
Ashish Shelar : हे आंदोलन म्हणजे....; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले...
व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : ठाकरे बंधूंवर विखे पाटलांनी साधला निशाणा
Video : राजकीय प्रतिमा परत मिळवण्यासाठी ठाकरे बंधूं..., विखे पाटलांनी साधला निशाणा