Vivek Agnihotri: ’10 जनपथवरून आणलेला तो सोफा..’; 18 कोटींचं घर विकत घेतल्याच्या चर्चांवर विवेक अग्निहोत्रींचं भन्नाट ट्विट

'द काश्मीर फाइल्स'च्या यशानंतर विवेक अग्निहोत्रींनी बिग बींच्या शेजारी घेतलं 18 कोटींचं घर? सत्य आलं समोर

Vivek Agnihotri: '10 जनपथवरून आणलेला तो सोफा..'; 18 कोटींचं घर विकत घेतल्याच्या चर्चांवर विवेक अग्निहोत्रींचं भन्नाट ट्विट
Vivek AgnihotriImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Dec 06, 2022 | 12:58 PM

मुंबई: ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटाच्या यशानंतर दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी मुंबईत कोट्यवधींचं घर खरेदी केलं, अशी चर्चा होती. बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्या बंगल्याशेजारी त्यांनी हे घर घेतल्याचं म्हटलं जात होतं. इतकंच नव्हे तर या फ्लॅटची किंमत तब्बल 18 कोटी रुपये आहे, अशाही चर्चांना उधाण आलं होतं. आता या सर्व चर्चांवर विवेक अग्निहोत्री यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या चर्चांबद्दल ट्विट करत अग्निहोत्रींनी पुन्हा एकदा काँग्रेस, आप आणि बॉलिवूडवर निशाणा साधला आहे.

विवेक अग्निहोत्री यांचा ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली होती. या वर्षभरात सर्वाधिक कमाई करणाऱ्या टॉप 10 चित्रपटांमध्ये याचा समावेश होतो. बॉक्स ऑफिसवर तगडी कमाई झाल्यानंतर अग्निहोत्री आणि त्यांची पत्नी पल्लवी जोशी यांनी मिळून फ्लॅट खरेदी केल्याची चर्चा सुरू झाली.

हे सुद्धा वाचा

या सर्व चर्चांवर ट्विट करत अग्निहोत्रींनी लिहिलं, ‘मी काँग्रेसी, आप आणि बेरोजगार बॉलिवूडकरांचा आभारी आहे, जे माझ्यासाठी दररोज नवीन अपार्टमेंट बनवत आहेत. इतकंच नव्हे तर त्या घरात आलिशान फर्निचरदेखील बसवत आहेत. 10 जनपथवरून आणलेला सोफा मला खूपच आवडला. सर्वांचे खूप आभार.’

विवेक अग्निहोत्री यांनी हे नवीन घर वर्सोवा परिसरातील पार्थेनॉन टॉवर्समध्ये विकत घेतल्याचं वृत्त समोर आलं होतं. इमारतीतील 30 व्या मजल्यावर त्यांनी हे घर घेतलं आणि सप्टेंबर 2022 मध्ये त्याचं रजिस्ट्रेशन पार पडलं, असंही म्हटलं गेलं होतं. 1200 चौरस फूटांवर पसरलेल्या या फ्लॅटसाठी विवेक यांनी जवळपास एक कोटी रुपये रजिस्ट्रेशनसाठी दिले, अशी चर्चा होती.

Non Stop LIVE Update
सभा नरेंद्र मोदींची पण सर्वात जास्त चर्चा तर 'या' व्यक्तीची, पाहा कोण?
सभा नरेंद्र मोदींची पण सर्वात जास्त चर्चा तर 'या' व्यक्तीची, पाहा कोण?.
भोरमधील सभेत अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंची नक्कल, म्हणाले...
भोरमधील सभेत अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंची नक्कल, म्हणाले....
मोरा सारखे नाचणारे मित्र पाहिले पण... मोर नाचताना तुम्ही पाहिलं का?
मोरा सारखे नाचणारे मित्र पाहिले पण... मोर नाचताना तुम्ही पाहिलं का?.
राजीनाम्यानंतर नसीम खान एमआयएम, वंचित की महायुतीत जाणार?
राजीनाम्यानंतर नसीम खान एमआयएम, वंचित की महायुतीत जाणार?.
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप.
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.