AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vivek Agnihotri | शाहरुख खान याच्यावर अत्यंत गंभीर आरोप, विवेक अग्निहोत्री यांचा धक्कादायक खुलासा

शाहरुख खान याचे चित्रपट मोठा धमाका करताना दिसत आहेत. शाहरुख खान हा आपल्या आगामी चित्रपटाचे प्रमोशन हे सोशल मीडियाच्या माध्यमातून करताना दिसतोय. शाहरुख खान आपल्या चाहत्यांसाठी खास सेशनचे आयोजन करतोय.

Vivek Agnihotri | शाहरुख खान याच्यावर अत्यंत गंभीर आरोप, विवेक अग्निहोत्री यांचा धक्कादायक खुलासा
| Updated on: Oct 02, 2023 | 3:20 PM
Share

मुंबई : विवेक अग्निहोत्री हे नेहमीच चर्चेत असतात. विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri ) यांचा द वॅक्सिन वॉर हा चित्रपट 28 सप्टेंबर रोजी रिलीज झालाय. या चित्रपटाकडून मोठ्या अपेक्षा आहेत. मुळात म्हणजे या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन देखील करण्यात आले. नाना पाटेकर हे या चित्रपटात (Movie) मुख्य भूमिकेत धमाका करताना दिसत आहेत. मात्र, विवेक अग्निहोत्री यांचे यापूर्वी ज्याप्रकारे चित्रपट कमाई करताना दिसले आणि बाॅक्स आॅफिसवर आपला जलवा दाखवताना ते करण्यात द वॅक्सिन वॉर या चित्रपटाला यश मिळाले नाही.

द वॅक्सिन वॉर या चित्रपटाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवल्याचे दिसतंय. या चित्रपटाला बजेट काढणे देखील अवघड असल्याचे सध्याच्या परिस्थितीनुसार दिसतंय. द वॅक्सिन वॉर हा चित्रपट आपल्या शास्त्रज्ञांच्या प्रयत्नांची, त्यागाची, संघर्षाची आणि यशाची आठवण करून देणारा असल्याचे सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत विवेक अग्निहोत्री यांनी सांगितले होते.

आता नुकताच विवेक अग्निहोत्री यांनी शाहरुख खान याच्यावर गंभीर आरोप केले. विवेक अग्निहोत्री यांनी केलेले हो आरोप ऐकून लोक हैराण झाल्याचे बघायला मिळाले. विवेक अग्निहोत्री म्हणाले की, शाहरुख खान याच्या सोशल मीडिया एजन्सीने माझ्यावर हल्ला केलाय. एजन्सीने ट्रोल आणि बॉट्स तयार केले आहेत. या सर्वांनी माझ्यावर हल्ला केला आहे, विवेक अग्निहोत्री गंभीर आरोप करताना दिसत आहेत.

पुढे विवेक अग्निहोत्री हे म्हणाले की, मी नेहमीच शाहरुख खान याचे कौतुक केले. परंतू मी त्याचे चित्रपट पाहिले आणि मला एक गोष्ट जाणवली की, त्याचे हे चित्रपट फार जास्त वरवरचे आहेत. यापेक्षा तो अधिक चांगले नक्कीच करू शकला असल्याचे म्हणताना देखील विवेक अग्निहोत्री हे दिसले आहेत. शाहरुख खान याचा जवान हा चित्रपट अजूनही बाॅक्स आॅफिसवर जलवा दाखवताना दिसतोय.

शाहरुख खान याने पठाण चित्रपटाच्या माध्यमातून तब्बल चार वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर पुनरागमन केले. विशेष म्हणजे त्याच्या करिअरमधील सर्वाधिक कमाई करणारा पठाण हाच चित्रपट ठरलाय. झिरो हा चित्रपट रिलीज झाल्यानंतर शाहरुख खान हा मोठ्या पडद्यापासून दूर गेला. शाहरुख खान याचे चाहते सतत त्याच्या पुनरागमनाची आतुरतेने वाट पाहताना दिसले.

मोदी अन् EVM असल्यानं माज करताहेत, एकत्र या... राज ठाकरेंचा कानमंत्र
मोदी अन् EVM असल्यानं माज करताहेत, एकत्र या... राज ठाकरेंचा कानमंत्र.
ठाकरेंच्या शिवसेनेकडून 102 जणांना AB फॉर्मचे वाटप, कोणाला उमेदवारी?
ठाकरेंच्या शिवसेनेकडून 102 जणांना AB फॉर्मचे वाटप, कोणाला उमेदवारी?.
ठाकरे यांच्या शिवसेनेची 40 उमेदवारांची पहिली यादी जाहीर
ठाकरे यांच्या शिवसेनेची 40 उमेदवारांची पहिली यादी जाहीर.
BMC निवडणुकीत भाजपचे युवा चेहरे, 'या' नव्या चेहऱ्यांना पक्षाकडून संधी
BMC निवडणुकीत भाजपचे युवा चेहरे, 'या' नव्या चेहऱ्यांना पक्षाकडून संधी.
मुंबईत पालिकेसाठी भाजपची पहिली यादी जाहीर, एकूण 66 उमेदवारांची नावं
मुंबईत पालिकेसाठी भाजपची पहिली यादी जाहीर, एकूण 66 उमेदवारांची नावं.
राज्यात सर्वत्र गुंडांना राजकीय सुगीचे दिवस, सामनातून महायुतीवर टीका
राज्यात सर्वत्र गुंडांना राजकीय सुगीचे दिवस, सामनातून महायुतीवर टीका.
निष्ठावंत राहिले बाजूला, उपरेच लागले रडायला; पक्षांतराचा भावनिक खेळ
निष्ठावंत राहिले बाजूला, उपरेच लागले रडायला; पक्षांतराचा भावनिक खेळ.
पुणे मनपा निवडणुकीवरून महायुतीत खडाजंगी, धंगेकरांचा भाजपवर थेट इशारा
पुणे मनपा निवडणुकीवरून महायुतीत खडाजंगी, धंगेकरांचा भाजपवर थेट इशारा.
खासदार पुत्राची 24 तासात माघार, पक्षाच्या आदेशानंतर उमेदवारी अर्ज मागे
खासदार पुत्राची 24 तासात माघार, पक्षाच्या आदेशानंतर उमेदवारी अर्ज मागे.
निवडणुकीसाठी मुंबईतलं युती अन् आघाड्यांचे चित्र स्पष्ट! कोण कोणासोबत?
निवडणुकीसाठी मुंबईतलं युती अन् आघाड्यांचे चित्र स्पष्ट! कोण कोणासोबत?.