Vivek Agnihotri | ‘या’ 2 अभिनेत्रींबद्दल विवेक अग्निहोत्री यांचा मोठा खुलासा, थेट म्हणाले, मला मरावे लागेल आणि…
विवेक अग्निहोत्री हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. विवेक अग्निहोत्री यांची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. विवेक अग्निहोत्री हे सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय दिसतात.

मुंबई : द वॅक्सिन वॉर या चित्रपटामुळे सध्या विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) हे तूफान चर्चेत आहेत. विवेक अग्निहोत्री यांनी मोठी घोषणा केलीये. विवेक अग्निहोत्री यांनी स्पष्ट केले की, द वॅक्सिन वॉर (The Vaccine War) चित्रपटाचे एक तिकिट खरेदी केल्यानंतर दुसरे तिकिट फ्रीमध्ये मिळेल. मुळात म्हणजे द वॅक्सिन वॉर या चित्रपटाला प्रेक्षकांचा म्हणावा तसा प्रतिसाद मिळताना दिसत नाहीये. या चित्रपटाला (Movie) अद्याप धमाका करण्यात यश मिळाले नाही.
काही दिवसांपूर्वीच विवेक अग्निहोत्री हे थेट आलिया भट्ट हिचे काैतुक करताना दिसले. विवेक अग्निहोत्री हे म्हणाले की, आलिया भट्ट ही माझी आवडती अभिनेत्री आहे. मी तिचा मोठा चाहता आहे. आलिया भट्ट ही माझ्या कुटुंबातील सदस्यासारखी आहे. इतकेच नाही तर विवेक अग्निहोत्री थेट म्हणाले, सार्वजनिक ठिकाणी कसे वागावे हे आलिया भट्ट हिला चांगले माहितीये.
नुकताच दिलेल्या एका मुलाखतीमुळे सध्या विवेक अग्निहोत्री हे चर्चेत आहेत. विवेक अग्निहोत्री या मुलाखतीमध्ये चक्क आलिया भट्ट आणि कंगना राणावत यांच्याबद्दल भाष्य करताना दिसले. विवेक अग्निहोत्री यांना विचारण्यात आले की, आलिया भट्ट आणि कंगना राणावत या दोघींना एकाच चित्रपटात तुम्ही कास्ट करणार का?
Thanks @taran_adarsh. https://t.co/V9FKdsztpS
— Vivek Ranjan Agnihotri (@vivekagnihotri) September 28, 2023
यावर बोलताना विवेक अग्निहोत्री म्हणाले की, मी जर असा विचार केला तर मला मरावे लागले. कोण अशाप्रकारचा विचार करतो? मुळात म्हणजे एका पुरस्कार सोहळ्यात माझी आणि आलिया भट्ट हिची भेट झाली. यावेळी आलिया भट्ट माझ्यासोबत खूप चांगला व्यवहार करत होती. तसेच कंगना हिचे देखील आहे. कंगना नेहमीच मला सन्मानाने बोलते.
द वॅक्सिन वॉर या चित्रपटाचा सपोर्ट करताना कंगना राणावत ही दिसली होती. कंगना राणावत ही सध्या तिच्या चंद्रमुखी 2 चित्रपटामुळे चर्चेत आहे. चंद्रमुखी 2 हा कंगना राणावत हिचा चित्रपट धमाका करताना दिसतोय. मुळात म्हणजे कंगना राणावत ही कायमच चर्चेत असते. बऱ्याच वेळा कंगना राणावत ही रणबीर कपूर याच्यावर टिका करताना दिसलीये.
