AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘समलैंगिक विवाहची गरज… ‘, Vivek Agnihotri यांच्या वक्तव्यानं चर्चांना उधाण

सर्वत्र समलैंगिक विवाहावर चर्चा सुरु असताना ‘द कश्मीर फाइल्स’ सिनेमाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांचं लक्षवेधी ट्विट... सध्या सर्वत्र दिग्दर्शकाच्या ट्विटची चर्चा

'समलैंगिक विवाहची गरज... ', Vivek Agnihotri यांच्या वक्तव्यानं चर्चांना उधाण
| Updated on: Apr 18, 2023 | 4:34 PM
Share

मुंबई : ‘द कश्मीर फाइल्स’ सिनेमाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. अनेक ठळक मुद्द्यांवर देखील विवेक अग्निहोत्री त्यांचं मत मांडत असतात. विवेक अग्निहोत्री कायम त्यांच्या परखड वक्तव्यांमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकतात. आता देखील त्यांनी एक ट्विट केलं आहे. ज्यामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे. विवेक अग्निहोत्री यांनी समलैंगिक विवाहाचं समर्थन करणारं ट्विट केलं आहे. समलैंगिक विवाह ही गरज आहे, अपराध नाही… असं विवेक अग्निहोत्री यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. सध्या सर्वत्र विवेक अग्निहोत्री यांच्या ट्विटची चर्चा रंगत आहे.

सर्वोच्च न्यायालयात केंद्र सरकारच्या एका अर्जासंदर्भावर सिनेमा निर्मात्याने प्रतिक्रिया दिली आहे. विवेक अग्निहोत्री म्हणाले, ‘समलैंगिक विवाह ही ‘शहरी अभिजात’ संकल्पना नाही. ती मानवी गरज आहे. गाव किंवा छोट्या शहरात कधीही न गेलेल्या सरकारी वर्गातील लोकांनी असा मसूदा तयार केला असेल. असं विवेक अग्निहोत्री ट्विट करत म्हणाले आहे.

विवेक अग्निहोत्री पुढे म्हणाले, ‘महत्त्वाची गोष्ट म्हणजे समलैंगिक विवाह ही संकल्पना नाही. ती गरज आहे. तो हक्क आहे.आणि भारतासारख्या पुरोगामी, उदारमतवादी आणि सर्वसमावेशक सभ्यतेमध्ये समलैंगिक विवाह हा गुन्हा नसून हक्क आहे…’ असं देखील ते ट्विट करत म्हणाले.

केंद्र सरकारच्या अर्जावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी  सांगायचं झालं तर, भारताचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड, न्यायमूर्ती संजय किशन कौल, एस रवींद्र भट, पीएस नरसिम्हा आणि हिमा कोहली यांचा समावेश असलेले सर्वोच्च न्यायालयाचे घटनापीठ समलिंगी विवाहाच्या सामाजिक स्वीकृतीबद्दलच्या त्यांच्या मतांबाबत केंद्राच्या अर्जावर सुनावणी करेल. सध्या सर्वत्र समलैंगिक विवाहावर चर्चा सुरु आहे.

Follow Us
शरद पवारांचा गट NDAच्या वाटेवर? थेट अमित शाहांसोबतच... पडद्याआड मोठ्या
शरद पवारांचा गट NDAच्या वाटेवर? थेट अमित शाहांसोबतच... पडद्याआड मोठ्या राजकीय हालचाली!
पंतप्रधानांनी कॅमेरा अँगल नव्हे तर हृदयाचा... -प्रियांका गांधी
पंतप्रधानांनी कॅमेरा अँगल नव्हे तर हृदयाचा... नीट पेपरफुटीवर बोलताना प्रियंका गांधी हे काय बोलून गेल्या?
मंत्री-सचिव सगळेच घामाघुम! शिंदेंच्या आढावा बैठकीत मोठं घडलं? शिक्षण..
मंत्री-सचिव सगळ्यांनाच फुटला घाम! शिंदेंच्या आढावा बैठकीत मोठं घडलं? शिक्षण खातं...
विद्यार्थी दहशतवादी होते का? संसदेत प्रियंका गांधींचा सरकारला थेट सवाल
Priyanka Gandhi | विद्यार्थी दहशतवादी होते का? संसदेत प्रियंका गांधींचा सरकारला थेट सवाल; लाठीचार्जवरून मोदी-शहांकडे मागितलं उत्तर
परीक्षा सुधारणा विधेयकाबाबत लोकसभेत चर्चा, मंत्री जितेंद्र सिंह...
परीक्षा सुधारणा विधेयकाबाबत लोकसभेत चर्चा, मंत्री जितेंद्र सिंह यांनी दिली मोठी अपडेट
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी मंत्रालयांच्या सचिवांसोबत बैठक
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी मंत्रालयांच्या सचिवांसोबत उच्चस्तरीय बैठक, ईराण-अमेरिका तणावादरम्यान...
मोठा निर्णय! CJP आंदोलनातील विद्यार्थ्यांवरील सर्व गुन्हे मागे...
मोठा निर्णय! CJP आंदोलनातील विद्यार्थ्यांवरील सर्व गुन्हे मागे; मुख्यमंत्री फडणवीसांचे पोलिसांना तातडीचे आदेश
पुणे विद्यापीठात बनावट डिग्रीचा खेळ खल्लास; 70 हजारांच्या व्यवहारानंतर
मोठा खुलासा! पुणे विद्यापीठात बनावट डिग्रीचा खेळ खल्लास; 70 हजारांच्या व्यवहारानंतर एकच खळबळ
शेतकऱ्यांना थोडा त्रास झाला तर सहन करू, पण उद्योजकांना त्रास...
शेतकऱ्यांना थोडा त्रास झाला तर सहन करू, पण उद्योजकांना त्रास... गुलाबराव पाटलांचं विधान तुफान चर्चेत
उत्तम शिंदेंविरोधात गुन्हा दाखल; सहकारी संघाच्या इमारतीवर बेकायदेशीर..
मोठी कारवाई! शिंदेंविरोधात गुन्हा दाखल; सहकारी संघाच्या इमारतीवर बेकायदेशीर ताब्याचा आरोप