AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“वो मुझे भी नहीं छोडेंगे…” सुशांतसोबत फोटो पोस्ट करत असं का म्हणाले विवेक अग्निहोत्री?

सुशांतची आत्महत्या की हत्या प्रकरणात 'द कश्मिर फाईल्स' चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांचं ट्विट चर्चेत

“वो मुझे भी नहीं छोडेंगे…” सुशांतसोबत फोटो पोस्ट करत असं का म्हणाले विवेक अग्निहोत्री?
“वो मुझे भी नहीं छोडेंगे…” सुशांतसोबत फोटो पोस्ट करत असं का म्हणाले विवेक अग्निहोत्री?
| Updated on: Dec 28, 2022 | 11:49 AM
Share

Vivek Agnihotri on Sushant Singh Rajput : कमी कालावधीत चाहत्यांच्या मनात घर करणाऱ्या अभिनेता सुशांत सिंह राजपूतने राहत्या घरात गळफास घेत स्वतःचा जीवन प्रवास संपवला. पण अभिनेत्याच्या निधनाच्या दोन वर्षांनंतर कूपर रुग्णालयातील कर्मचारी मॉर्चरी सर्वेंट रूपकुमार शाह (Mortuary Servant Roopkumar Shah) यांनी सुशांत सिंग प्रकरणात मोठा खुलासा केला आहे. ज्यामुळे प्रत्येकाला मोठा धक्का बसला आहे. शाह यांच्या दाव्यानंतर अभिनेत्याच्या बहिणीने सीबीआयकडे पुन्हा चौकशी करण्याची विनंती केली आहे.

सुशांतची आत्महत्या की हत्या या प्रकरणात ‘द कश्मिर फाईल्स’ चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी अभिनेत्याला न्याय मिळण्यासाठी एक ट्विट केलं आहे. विवेक अग्निहोत्री यांचं ट्विट सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

विवेक अग्निहोत्री ट्विट करत म्हणाले, “वो मुझे भी नहीं छोडेंगे… कौन थे ‘वो’, सुशांत, मेरे दोस्त? ” असं म्हणत त्यांनी #SushantSinghRajput आणि #RightToJustice या हॅशटॅगचा वापर केला आहे. विवेक यांनी सुशांतसोबत एक फोटो पोस्ट करत ट्विट केल्यामुळे युजर्सकडून ट्विटवर कमेंट येत आहेत.

काय म्हणाले कूपर रुग्णालयातील कर्मचारी शाह? ‘सुशांत सिंह राजपूतची हत्या नसून आत्महत्या आहे. अभिनेत्याच्या शरीरावर जे व्रण होते, असे व्रण आत्महत्या केलेल्या व्यक्तीच्या शरीरावर नसतात. त्याच्या डोळ्यांवर मार लागल्याचे ठसे होते. शरीरावर जखमा होत्या, हात-पाय तुटल्यासारखे होते. तेव्हा मी माझ्या वरिष्ठांना सांगितलं, पण त्यांनी मला माझं काम करण्यास सांगितलं.’ शाह यांच्या दाव्यानंतर सर्वत्र खळबळ माजली आहे.

अभिनेता सुशांत सिंह राजपूतने १४ जून २०२० मध्ये राहत्या घरी गळफान घेवून आत्महत्या केली. अभिनेत्याच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमध्येच नाही, तर राजकारणात देखील प्रंचड खळबळ माजली. पण अद्यापही अभिनेत्याच्या आत्महत्या की हत्या? या मागील रहस्य कायम आहे.

दरम्यान, सुशांतचं निधन झाल्यानंतर शवविच्छेदगृहात घडलेला सर्व प्रकार प्रथमदर्शी शाह यांनी सांगितल्यामुळे याप्रकरणाला नवं वळण लागलं आहे. म्हणून याप्रकरणी पुढे काय होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणादर आहे.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.