
आलिया भट्टनं एअरपोर्ट लूकसाठी फ्लोरल डेनिम जॅकेट डार्क ब्लू जीन्ससह पेअर केलेलं पाहायला मिळालं. यासह तिने गोल गळ्याचा टी-शर्ट कॅरी केला आहे. आलियानं आपला लूक पांढरा स्नीकर्स, ब्लॅक गॉगल आणि मस्टर्ड रंगाच्या बॅगसोबत पूर्ण केला. तिचा हा लूक तिच्या चाहत्यांना खूप आवडला.

श्रद्धा कपूर आपल्या स्टाईल स्टेटमेंटमुळे बर्याचदा चर्चेत असते. तिनं डेनिम शर्टसह व्हाईट कलरचे स्केचर कॅरी केले होते. त्यावर तिनं ओव्हरसाईज क्रीम कलर जॅकेट कॅरी केलं आहे. तर तिनं स्लिंग बॅगसह आपला लूक पूर्ण केला आहे.

अनेकदा जाह्नवी कॅज्युअल लूकमध्ये घराबाहेर स्पॉट होते. नुकतंच जान्हवीला निळ्या जीन्ससह पांढरा टी-शर्ट कॅरी केलेला पाहायला मिळालं. या लूकमध्ये ती कमालीची हॉट दिसली.

कृती सॅनॉननं ब्लू जीन्ससोबत ब्लॅक क्रॉप टॉप आणि गुलाबी शर्ट कॅरी केलेलं पाहायला मिळालं. या कॅज्युअल लूकमध्ये अभिनेत्री बर्यापैकी स्टाईलिश दिसत आहे.

दीपिका पादुकोण नेहमीच आपल्या अनोख्या आणि कॅज्युअल फॅशन सेन्समुळे चर्चेत असते. या अभिनेत्रीनं एअरपोर्ट लूकसाठी पांढर्या टी-शर्टसह चंदेरी रंगाचे पँट कॅरी केले होते, या लूकला तिनं पांढर्या स्नीकर्ससह पूर्ण केलं.