Panchayat Season 4: फ्रीमध्ये पाहायचीये सीरिज? जियो, एयरटेल, व्हीआय देतायेत मोठी संधी
Panchayat Season 4: Amazon Prime Video वर प्रदर्शित झालेली 'पंचायत 4' सीरिज मोफत कशी पाहून शकता? जियो, एयरटेल, व्हीआय देतायेत मोठी संधी... जाणून घ्या Amazon Prime Video चं सब्सक्रिप्शन नसताना देखील कशी पाहता येणार सीरिज

Panchayat Season 4: लोकप्रिय ओटीटी प्लॅटफॉर्म Amazon Prime Video ची पंचायत सीरिज सर्वांच्या पसंतीस उतरली आहे. सीरिजचे 3 सीझन प्रदर्शित झाल्यानंतर चाहते चौथ्या सीझनच्या प्रतीक्षेत होते. सीरिज Amazon Prime Video वर प्रदर्शित झाली आहे. सीरिज पाहण्यासाठी Amazon Prime Video चं सब्सक्रिप्शन घ्यावं लागतं. पण तुमच्याकडे सब्सक्रिप्शन नसेल तरी इतर मर्गांनी तुम्हाला सीरिज पाहता येणार आहे. जियो, एयरटेल, व्हीआय कंपनीचं सीमकार्ड असेल तरी तुम्हाला पंचायत सीरिजचा चौथा सिझन फ्रीमध्ये पाहता येणार आहे. जाणून घेऊ कसं?
एअरटेलच्या दोन प्रीपेड प्लॅनमध्ये मोफत ॲमेझॉन प्राइम सबस्क्रिप्शन मिळतं. पहिल्या प्लॅनची किंमत 1,199 रुपये आहे. यामध्ये वापरकर्त्यांना दररोज 2.5GB डेटा, 100 मोफत एसएमएस आणि अमर्यादित कॉलिंगची सुविधा मिळते. या प्लॅनमध्ये ॲमेझॉन प्राइमचं मोफत सबस्क्रिप्शन देखील मिळते. त्याची वैधता 84 दिवस आहे. कंपनीचा दुसरा प्लॅन 838 रुपयांना येतो. तो दररोज 3GB डेटा, अमर्यादित कॉलिंग आणि 100 मोफत एसएमएस देतो. तसेच, अमेझॉन प्राइम लाईटचे मोफत सबस्क्रिप्शन उपलब्ध आहे. त्याची वैधता 56 दिवस आहे.
जिओ कंपनी त्यांच्या अनेक प्रीपेड प्लॅनमध्ये अनेक ओटीटीचं मोफत सबस्क्रिप्शन देते. यामध्ये ॲमेझॉन प्राइमचाही समावेश आहे. कंपनीचा एक प्लॅन 1029 रुपयांना येतो. ज्यामध्ये 2 जीबी मोबाइल डेटा आणि 100 मोफत एसएमएस करता येतात. तसेच, वापरकर्त्यांना अमर्यादित कॉलिंगची सुविधा मिळते. Amazon Prime Lite चं मोफत सबस्क्रिप्शन देखील दिलं जातं. या प्लॅनची किंमत 1029 रुपये आहे. त्याची वैधता 84 दिवस आहे. यामध्ये अमर्यादित 5G मोबाइल डेटा देखील दिला जातो.
व्होडाफोन आयडिया (Vi) च्या अनेक प्रीपेड प्लॅनमध्ये मोफत OTT उपलब्ध आहे. कंपनीचा एक प्लॅन 3799 रुपयांना येतो. तो दररोज 2 जीबी डेटा, अमर्यादित कॉलिंग आणि 100 मोफत एसएमएस देतो. या प्लॅनमध्ये ॲमेझॉन प्राइमची मोफत मेंबरशिप देखील मिळते. त्याची वैधता 365 दिवस आहे. दुसरा प्लॅन 996 रुपयांचा आहे. पहिल्या प्लॅनप्रमाणे, तो दररोज अमर्यादित कॉलिंग आणि 100 मोफत एसएमएस देखील देतो. तसेच, या प्लॅनमध्ये दररोज 2 जीबी मोबाइल डेटा देखील मिळतो.
Amazon Prime च्या एका महिन्याच्या प्लॅनची किंमत 299 रुपये आहे. तर तीन महिन्यांसाठी तुम्हाला 599 रुपये द्यावे लागतील, तर 12 महिन्यांसाठी तुम्हाला 1499 रुपये द्यावे लागतील. याशिवाय, वार्षिक प्राइम लाइट प्लॅनची किंमत 799 रुपये आहे. याशिवाय, फक्त प्राइम शॉपिंग एडिशन प्लॅनची किंमत 399 रुपये आहे.
