AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मिथुन चक्रवर्ती यांच्या सूनकडे दिग्दर्शकाची विचित्र मागणी, ‘बिकिनी घाल, मला तुझं शरीर…’

'बिकनी घाल मला तुझं शरीर...', मिथुन चक्रवर्ती यांच्या सूनकडे दिग्दर्शकाची विचित्र मागणी, मिटिंगसाठी पोहोचलेल्या तिच्यासोबत नेमकं काय घडलं..., अभिनेत्रीकडून मोठा खुलासा...

मिथुन चक्रवर्ती यांच्या सूनकडे दिग्दर्शकाची विचित्र मागणी, 'बिकिनी घाल, मला तुझं शरीर...'
Madalsa Sharma
| Updated on: May 01, 2026 | 10:40 AM
Share

ग्लॅमरचं विश्व दिसतं तसं नसतं. या विश्वात सेलिब्रिटींना अनेक वाईट परिस्थितीचा सामना करावा लागतो… असंच काही दिग्गज अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांच्या सूनेसोबत देखील झालं आहे. दिग्दर्शकाने मिथुन चक्रवर्ती यांच्या सुनेकडे एक विचित्र मागणी केली होती. मिथुन चक्रवर्ती यांच्या सुनेबद्दल सांगायचं झालं तर, ती एक प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री आहे. अशात अभिनय विश्वात काम करणाऱ्या अभिनेत्रींना कायम वाईट अनुभव येत असतो. अशात मिथुन चक्रवर्ती यांची सून आणि ‘अनुपमा’ फेम अभिनेत्री मदालसा शर्मा हिने तिच्यासोबत घडलेली अशी घटना सांगितली, ज्यामुळे सर्वांनाच मोठा धक्का बसेल…

एका मुलाखतीत मदालसा हिने तिच्यासोबत घडलेली एक अत्यंत वाईट घटना सांगितली आहे. जेव्हा अभिनेत्री इंडस्ट्रीमध्ये नवीन होती आणि फक्त 19 वर्षांची होती… तेव्हा एका दिग्दर्शकाने मदालसा हिने एका मिटिंसाठी बोलावलं होतं. मदालसा हिने सांगितल्यानुसार, दिग्दर्शकाने मदालसा हिला सांगितलं, सिनेमासाठी अशा मुलीच्या शोधात आहे, जी सिनेमात बिकिनी घालेल. तेव्हा अभिनेत्री प्रोफेशनल रित्या होकार दिला. म्हणाली, ‘त्यात मला फार काही वाटलं आहे… पण मला सिनेमाच्या कथेबद्दल जाणून घ्यायचं होतं…’

प्रकरण तेव्हा चिघळलं जेव्हा दिग्दर्शकाने मदालसाला त्याच्यासमोर बिकिनी घालून दाखवायला सांगितलं. दिग्दर्शकाला अभिनेत्रीचा देहबोली आणि ती कॅमेऱ्यासमोर कशी वावरते हे बघायचे होते. यावर मदालसा म्हणाली, ‘सुरुवातीला तर मी घाबरली. पण मी त्यानंतर स्पष्टच म्हणाली, ‘मी एक प्रोफेशनल अभिनेत्री आहे… जर सिनेमाच्या सीनची गरज आहे तर मी, कॅमेऱ्यासमोर बिकिनी, साडी, लेहेंगा काहीही घालायला तयार आहे. कारण माझं ते काम आहे… पण तुमच्यासमोर असे कपडे घालणं माझं काम नाही…’

पुढे मदालसा म्हणाली, ‘जर तुम्हाला माझ्या अभिनयावर विश्वास असेल तर, मला कास्ट करा नाही तर, येथून निघण्याचा मार्ग मला माहिती आहे… ‘, एवढंच नाही तर, काही दिवसांनंतर सिनेमाबद्दल मोठी गोष्ट मदालसा हिला कळली. ज्या भूमिकेसाठी मदालसा हिला बोलावण्यात आलं होतं, त्यासाठी त्या दिग्दर्शकाने त्याच्या गर्लफ्रेंडला कास्ट केलं होतं.

मदालसा हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, ‘अनुपमा’ मालिकेतून अभिनेत्री घराघरात पोहोचली. ‘काव्या’ या भूमिकेतून तिला नवीन ओळख मिळाली. स्वतःच्या कष्टाच्या जोरावर तिने टीव्ही विश्वात भक्कम ओळख निर्माण केली आहे. मदालसा सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.

Follow Us
मुंबईत येणं महागलं! पाचही टोलनाक्यांवर टोलवाढ; तब्बल एवढ्या टक्क्यांनी
Mumbai Toll Tax : मुंबईत येणं महागलं! पाचही टोलनाक्यांवर टोलवाढ; तब्बल एवढ्या टक्क्यांनी टोल महागले....
ठाकरे बंधू एकवटले! 4 ऑक्टोबरच्या मोर्चाची टॅगलाईन ठरली; लोकशाही आणि...
Raj Thackeray : Uddhav Thackeray : ठाकरे बंधू एकवटले! 4 ऑक्टोबरच्या मोर्चाची टॅगलाईन ठरली; लोकशाही आणि संविधान.....
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
Sanjay Raut At Thane : ते आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा...
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा; कापूरबावडी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडतंय?
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!CM फडणवीसांच्या बैठकीत..
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! CM फडणवीसांच्या बैठकीतील ‘हे’ 5 महत्त्वाचे निर्णय
सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
Sachin Waze | सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश...
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न: पुढे जे घडलं ते...
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश काय?
मातोश्री'वर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर...
मातोश्री बंगल्यावर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर राऊत आणि नार्वेकर... नेमकं काय घडतंय?