Shehnaaz Gill | कोणत्याही प्रकारचा व्यायाम न करता शहनाज गिल हिने केले तब्बल 12 किलो वजन कमी, ‘हा’ डाएट आणि

शहनाज गिल हिने अत्यंत कमी कालावधीमध्ये एक वेगळी ओळख निर्माण केलीये. शहनाज गिल हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. शहनाज गिल ही सोशल मीडियावरही कायमच सक्रिय असते. शहनाज गिल हिने बाॅलिवूडमध्येही धमाका केलाय.

Shehnaaz Gill | कोणत्याही प्रकारचा व्यायाम न करता शहनाज गिल हिने केले तब्बल 12 किलो वजन कमी, हा डाएट आणि
| Updated on: Sep 07, 2023 | 4:24 PM

मुंबई : शहनाज गिल हिने अत्यंत कमी कालावधीमध्ये एक वेगळी ओळख ही नक्कीच निर्माण केलीये. शहनाज गिल हिला खरी ओळख ही बिग बाॅस 13 (Bigg Boss 13) मधूनच मिळालीये. शहनाज गिल हिची जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग सोशल मीडियावर आज बघायला मिळते. बिग बाॅस 13 मध्ये सहभागी होण्याच्या अगोदर पंजाबमधील लोक फक्त शहनाज गिल (Shehnaaz Gill)  हिला ओळख होते. मात्र, बिग बाॅस 13 मध्ये धमाका करताना शहनाज गिल ही दिसली. बिग बाॅस 13 मध्ये चाहत्यांना शहनाज गिल आणि सिद्धार्थ शुक्ला यांची जोडी प्रचंड आवडली.

बिग बाॅस 13 मध्ये शहनाज गिल हिचा एक बिनधास्त स्वभाव बघायला मिळाला. मात्र, सिद्धार्थ शुक्ला याच्या निधनानंतर शहनाज गिल ही पूर्णपणे तुटलेली दिसली. काही दिवसांपूर्वीच आता शहनाज गिल हिने बाॅलिवूडमध्ये पर्दापण केले आहे. सलमान खान याच्या चित्रपटामध्ये थेट काम करण्याची संधी ही शहनाज गिल हिला मिळाली.

शहनाज गिल ही किसी का भाई किसी की जान या चित्रपटात धमाल करताना दिसली. शहनाज गिल हिला सलमान खान यानेच बाॅलिवूडमध्ये लाॅन्च केले आहे. शहनाज गिल ही तिचा आगामी चित्रपट Thank You For Coming मुळे चर्चेत आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च करण्यात आलाय. यावेळी शहनाज गिल ही जबरदस्त लूकमध्ये दिसली.

यावेळी शहनाज गिल हिने मोठा खुलासा हा केलाय. शहनाज गिल हिला यावेळी तिच्या वजनाबद्दल विचारण्यात आले. शहनाज गिल म्हणाली की, मी माझे तब्बल 6 महिन्यात 12 किलो वजन कमी केले आहे. विशेष म्हणजे मी कोणत्याही प्रकारचा व्यायाम केला नाही. मी माझे वजन कमी करण्यासाठी लाॅकडाऊनचा काळ निवडला.

मी फक्त आणि फक्त डाएट करूनच माझे वजन कमी केले. असेही नाही की, मी फार काही वेगळे खाल्ले. मला ज्या गोष्टी खाण्यामध्ये आवडतात, त्याच मी डाएटमध्ये घेतल्या. फक्त मी त्याचे प्रमाण कमी केले. म्हणजे अगोदर जर मी दोन पराठे खात असेल तर मी वजन कमी करण्याच्या प्रवास तो एकच खात असे.

शहनाज गिल हिची जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. शहनाज गिल हिच्याकडे बऱ्याच बाॅलिवूड चित्रपटांच्या आॅफर असल्याचे देखील सांगितले जात आहे. यामुळे शहनाज गिल हिच्या चाहत्यांमध्ये मोठा उत्साह हा बघायला मिळतोय. शहनाज गिल हिचे अनेक गाणे देखील काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आले.