IND vs SA Super 8 T20 WC Live Score Updates : टीम इंडियाची कडक सुरुवात, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध जबरदस्त बॉलिंग
India vs South Africa, T20 world Cup 2026 Live Score Updates: टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका दोन्ही संघ साखळी फेरीत अजिंक्य आहेत. त्यामुळे आता सुपर 8 फेरीत कोणता संघ विजयी सलामी देतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

LIVE Cricket Score & Updates
-
IND vs SA Super 8 T20 WC Live Score Updates : बुमराहचा धमाका, दक्षिण आफ्रिकेला तिसरा झटका, रायन रिकेल्टन आऊट
जसप्रीत बुमराह याने रायन रिकेल्टन याला आऊट करत दुसरी विकेट मिळवली. टीम इंडियाने यासह दक्षिण आफ्रिकेला तिसरा झटका दिला. बुमराहने रायन रिकेल्टन याला 7 धावांवर शिवम दुबे याच्या हाती कॅच आऊट केलं.
-
IND vs SA Super 8 T20 WC Live Score Updates : अर्शदीपचा धमाका, दक्षिण आफ्रिकेच्या कॅप्टनची शिकार, एडन मार्करम आऊट
जसप्रीत बुमराह याच्यानंतर अर्शदीप सिंह याने आपली पहिली विकेट मिळवून दक्षिण आफ्रिकेला दुसरा आणि मोठा झटका दिला आहे. अर्शदीपने दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एडन मार्करम याला 4 रन्सवर हार्दिक पंड्या याच्या हाती कॅच आऊट केलं आहे. अर्शदीपची एडनला आऊट करण्याची ही सातवी वेळ ठरली आहे.
-
-
IND vs SA Super 8 T20 WC Live Score Updates : क्विंटन डी कॉक बोल्ड, बुमराहकडून दक्षिण आफ्रिकेला पहिला झटका
टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेला 10 धावांवर पहिला झटका दिला आहे. भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याने क्विंटन डी कॉक याला बोल्ड केलं आहे. डी कॉकने 6 धावा केल्या.
-
IND vs SA Super 8 T20 WC Live Score Updates : एडन मार्करम आणि क्विंटन डी कॉक जोडी मैदानात
दक्षिण अफ्रिकेकडून एडन मार्करम आणि क्विंटन डी कॉक जोडी मैदानात उतरली आहे. पावर प्लेमध्ये किती धावा करतात याकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष आहे. तर भारतीय गोलंदाजी किती विकेट काढणार? आणि दबाव टाकणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
-
IND vs SA Super 8 T20 WC Live Updates : दक्षिण अफ्रिकेची प्लेइंग 11
दक्षिण आफ्रिका (प्लेइंग इलेव्हन): एडेन मार्कराम (कर्णधार), क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), रायन रिकेल्टन, डेवाल्ड ब्रेव्हिस, डेव्हिड मिलर, ट्रिस्टन स्टब्स, मार्को जॅन्सन, कॉर्बिन बॉश, केशव महाराज, कागिसो रबाडा, लुंगी एनगिडी
-
-
IND vs SA Super 8 T20 WC Live Updates : भारताची प्लेइंग 11
भारत (प्लेइंग इलेव्हन): अभिषेक शर्मा, इशान किशन (विकेटकीपर), तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), हार्दिक पंड्या, शिवम दुबे, रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती -
IND vs SA Super 8 T20 WC Live Updates : सूर्यकुमार यादव म्हणाला की…
सूर्यकुमार यादव म्हणाला की, आम्हीही प्रथम फलंदाजी करण्याचा विचार करत होतो, सर्वांना येऊन आमच्याकडे काय आहे ते दाखवण्याची ही चांगली संधी आहे. आमच्याकडे मैदानावर चांगली ऊर्जा आहे आणि आमच्याकडे जे काही येईल ते आम्ही स्वीकारू. प्रथम गोलंदाजी करण्यास आनंद झाला. अक्षर पटेलवर खूप कठोर, आम्ही त्याच संघासह जात आहोत. त्यामुळे कोणतेही बदल नाहीत.
-
-
IND vs SA Super 8 T20 WC Live Updates : कर्णधार एडन मार्करम म्हणाला की..
दक्षिण अफ्रिकेचा कर्णधार एडन मार्करम म्हणाला की, आम्ही प्रथम फलंदाजी करणार आहोत, खरोखरच चांगली खेळपट्टी आहे आणि आम्ही पाहिलेल्यापेक्षा खूपच कोरडी आहे. मुले चांगल्या स्थितीत दिसत आहेत आणि सध्या ही चांगली जागा आहे. आम्हाला येथे काही सामने खेळण्याचे भाग्य लाभले आहे, ही काळ्या मातीची खेळपट्टी आहे. आम्ही मागील सामन्यापेक्षा 4 बदल केले आहेत. केश, लुंगी आणि मार्को परत आले आहेत.
-
IND vs SA Super 8 T20 WC Live Updates : नाणेफेकीचा कौल दक्षिण अफ्रिकेच्या बाजूने, प्रथम फलंदाजी निवडली
नाणेफेकीचा कौल दक्षिण अफ्रिकेच्या बाजूने लागला. या सामन्यात दक्षिण अफ्रिकेने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे धावांचा पाठलाग करून विजय मिळवण्याचं आव्हान टीम इंडियासमोर असेल.
-
IND vs SA Super 8 T20 WC Live Updates : टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेवर वरचढ
टीम इंडिया टी 20i क्रिकेटमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वरचढ असल्याचं स्पष्ट आहे. भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात एकूण 35 टी 20i सामने खेळवण्यात आले आहेत. भारताने याने 35 पैकी 21 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. तर दक्षिण आफ्रिकेने 13 सामने जिंकले आहेत. तर उभयसंघातील 1 सामन्याचा निकाल लागला नाही.
-
IND vs SA Super 8 T20 WC Live Updates : टी 20i वर्ल्ड कपसाठी दक्षिण आफ्रिका टीम
एडन मार्करम (कर्णधार), क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), रायन रिकेल्टन, डेवाल्ड ब्रेव्हीस, ट्रिस्टन स्टब्स, जेसन स्मिथ, जॉर्ज लिंडे, कॉर्बिन बॉश, कागिसो रबाडा, एनरिक नॉर्खिया, क्वेना माफाका, डेव्हिड मिलर, लुंगी एनगिडी, केशव महाराज आणि मार्को जॅन्सन.
-
IND vs SA Super 8 T20 WC Live Updates : आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेसाठी टीम इंडिया
अभिषेक शर्मा, इशान किशन (विकेटकीपर), तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), शिवम दुबे, हार्दिक पंड्या, रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती, संजू सॅमसन, कुलदीप यादव, अक्षर पटेल आणि मोहम्मद सिराज.
-
IND vs SA Super 8 T20 WC Live Updates : टीम इंडिया सुपर 8 साठी सज्ज, दक्षिण आफ्रिकेला रोखणार?
टीम इंडियाने सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात साखळी फेरीतील सलग 4 सामने जिंकले आहेत. त्यामुळे टीम इंडिया सुपर 8 फेरीतही विजयी सलामी देत सलग पाचवा सामना जिंकणार का? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील साखळी फेरीची सांगता झाल्यानंतर आता सुपर 8 चा थरार सुरु आहे. सुपर 8 मधील पहिला सामना हा पावसामुळे वाया गेला. तर टीम इंडियासमोर सुपर 8 फेरीतील आपल्या पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळत आहे. हा सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमध्ये आयोजित करण्यात आला आहे. हा सामना कोण जिंकणार? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागून आहे. या सामन्यातील प्रत्येक अपडेट या लाईव्ह ब्लॉगद्वारे जाणून घेणार आहोत.
Published On - Feb 22,2026 6:08 PM
