Video | शहनाज गिल हिच्या लूकवर चाहते फिदा, ग्रीन ड्रेसमध्ये अभिनेत्रीचा जलवा, चाहते थेट म्हणाले…
शहनाज गिल ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत असते. शहनाज गिल हिला खरी ओळख ही बिग बाॅस 13 मधून मिलाळी. शहनाज गिल हिची जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही सोशल मीडियावर बघायला मिळते. नुकताच एक व्हिडीओ शहनाज गिल हिने शेअर केला आहे.

मुंबई : बिग बॉस 13 मधून जर कोणाला खरी ओळख मिळाली असेल तर ते नाव फक्त आणि फक्त शहनाज गिल हे आहे. शहनाज गिल ही बिग बॉस 13 (Bigg Boss 13) मध्ये सहभागी झाली. बिग बॉस 13 नंतर शहनाज गिल हिचे आयुष्यच बदलून गेले. बिग बॉस 13 नंतर शहनाज गिल हिच्या फॅन फाॅलोइंगमध्ये जबरदस्त अशी वाढ झाली. बिग बॉस 13 मध्ये सहभागी होण्याच्या अगोदर शहनाज गिल (Shehnaaz Gill) हिला फक्त पंजाबमध्ये ओळखले जायचे. मात्र, आता संपूर्ण देशामध्ये शहनाज गिल हिचे चाहते हे मोठ्या प्रमाणात बघायला मिळतात.
बिग बॉस 13 मध्ये धमाकेदार गेम खेळताना शहनाज गिल दिसली. बिग बॉस 13 मध्ये शहनाज गिल आणि सिद्धार्थ शुक्ला यांची लव्ह स्टोरी चाहत्यांना बघायला मिळाली. विशेष म्हणजे यांच्या जोडीला प्रेक्षकांचे उदंड असे प्रेम मिळाले. मात्र, अचानकच सिद्धार्थ शुक्ला याने जगाचा निरोप घेतला. यानंतर शहनाज गिल पूर्णपणे तुटलेली दिसली.
सिद्धार्थ शुक्लाच्या अशा जाण्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला. शहनाज गिल हिने नुकताच सलमान खान याचा चित्रपट किसी का भाई किसी की जान मधून बाॅलिवूडमध्ये पर्दापण केले आहे. सलमान खान यानेच शहनाज गिल हिला बाॅलिवूडमध्ये लाॅन्च केले. विशेष म्हणजे या चित्रपटातील शहनाज गिलच्या अभिनयाचे काैतुकही चाहत्यांकडून करण्यात आले.
View this post on Instagram
शहनाज गिल हिचा चाहता वर्ग अत्यंत मोठा असून तिने शेअर केलेले फोटो आणि व्हिडीओ कायमच सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. नुकताच शहनाज गिल हिने एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. विशेष म्हणजे शहनाज गिल हिचा हा व्हिडीओ तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडल्याचे दिसत आहे.
या व्हिडीओमध्ये शहनाज गिल ही जलवा दाखवताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये शहनाज गिल ही ग्रीन रंगाच्या शॉर्ट डीपनेक ड्रेसमध्ये दिसत आहे. या व्हिडीओमध्ये खास पोझ देताना शहनाज गिल ही दिसत आहे. विशेष म्हणजे शहनाज गिल हिचा हा व्हिडीओ तिच्या चाहत्यांना जबरदस्त आवडत आहे.
शहनाज गिल हिच्या या व्हिडीओवर कमेंट करत एकाने लिहिले की, मी या शहनाज गिलचा मोठा चाहता आहे. दुसऱ्याने लिहिले की, उफ्फ तेरी अदा. तिसऱ्याने लिहिले की, अत्यंत बोल्ड आणि ग्लॅमरस दिसत आहे शहनाज गिल या व्हिडीओमध्ये. या व्हिडीओवर चाहते मोठ्या प्रमाणात कमेंट करताना दिसत आहेत.
