AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कांद्यापासून ते बटाटे, स्किन केअर करताना या भाज्यांच्या रस पण उपयुक्त

त्वचा असो किंवा केस काळजी घेताना नैसर्गिक घटकांचा वापर करणे अधिक फायदेशीर असतो. कारण यामुळे कोणतेही दुष्परिणाम होत नाही. तर आजच्या लेखात आपण त्वचेवर वेगवेगळ्या भाज्यांचे रस वापरून आपले सौंदर्य कसे खुलवता येते ते जाणून घेऊयात.

कांद्यापासून ते बटाटे, स्किन केअर करताना या भाज्यांच्या रस पण उपयुक्त
| Edited By: | Updated on: Feb 22, 2026 | 5:56 PM
Share

तंदुरस्त राहण्यासाठी आपण योग्य आहार घेत असतो. त्यात वेगवेगळ्या भाज्यांचा समावेश करतोच. तर भाज्या हे जीवनसत्त्वे आणि खनिजांचा एक उत्तम स्रोत आहेत, म्हणून तुमच्या रोजच्या आहारात विविध प्रकारच्या हंगामी भाज्यांचा समावेश करणे महत्वाचे आहे. यामुळे तुमच्या एकूण आरोग्याला फायदा होतो, जो तुमच्या चेहऱ्यावर दिसून येतो. कारण प्रत्येक भाज्यांमध्ये वेगवेगळे गुणधर्म असतात जे तुमची त्वचा आतून निरोगी ठेवते, सोबतच नैसर्गिक चमक देते. तसेच योग्य प्रमाणात भाज्यांचे सेवन त्वचेवरील मुरुम, डाग, रंगद्रव्य, केस गळणे आणि कमकुवत नखे यासारख्या सौंदर्य समस्या टाळण्यास देखील मदत करते. भाज्या खाल्ल्या जाऊ शकतात आणि त्या त्वचेवर लावू देखील शकतो. कारण काही भाज्यांमधील रस हे त्वचेवरील अनेक समस्या सोडवू शकतात.

तुमचे केस निरोगी बनवण्यापासून ते चमकदार त्वचा आणि नखे मजबूत करण्यापर्यंत भाज्या प्रभावी आहेत. कांद्यापासून ते लसूण, बटाटे, टोमॅटो आणि काकडीपर्यंत… चला जाणून घेऊयात वेगवेगळ्या भाज्यांचे रस तुमचे सौंदर्य कसे वाढवू शकतात.

बटाट्याचा रस तुमचा चेहरा उजळवेल

बटाट्याचा रस त्वचेला त्वरित उजळवतो. यासाठी बटाटा किसून किंवा त्याचे बारीक पातळ काप करून थेट तुमच्या चेहऱ्यावर लावू शकता किंवा बटाट्याचा रस, टोमॅटोचा रस, तांदळाचे पीठ आणि कोरफडीचे जेल मिक्स करून नंतर त्यात गुलाबजल टाका. हा फेस पॅक तुम्ही आठवड्यातून दोनदा चेहऱ्यावर लावल्याने उत्कृष्ट परिणाम पाहायला मिळेल. यामुळे टॅनिंग दूर होते आणि तुमची त्वचा नैसर्गिकरित्या चमकदार राहते.

कांद्याचा रस

कांद्याच्या रसाचे केसांसाठी आश्चर्यकारक फायदे आहेत, कारण त्यात सल्फर असते, जे केराटिनच्या निर्मितीस मदत करते. यामुळे केस मजबूत, जाड, चमकदार आणि काळे होतात. कांद्याच्या रसाचा योग्य प्रमाणात वापर केल्यास कोंडा देखील कमी होतो. तुम्ही कापसाच्या मदतीने तुमच्या स्कॅल्पला कांद्याचा रस लावू शकता आणि शॅम्पू करण्यापूर्वी एक तास तसेच राहू द्या.

टोमॅटो त्वचेवरील डाग दूर करतील

टोमॅटोच्या रसात बेसन आणि चिमूटभर हळद मिक्स करून तयार मिश्रण चेहऱ्यावर लावल्याने त्वचेवरील डाग हळूहळू कमी होतील आणि तुमची त्वचा स्वच्छ दिसेल. शिवाय टोमॅटो कापून एक तास रेफ्रिजरेटरमध्ये ठेवून नंतर तो गोलाकार हालचालीत चेहऱ्यावर हलका हाताने मसाज केल्यास छिद्रे घट्ट होतील आणि तुमचा चेहरा तेजस्वी दिसेल.

नखांसाठी लसूण उपयुक्त

तुम्ही लसणाचा रस काढून त्यात तुमचे नखे थोडा वेळ बुडवू शकता. नंतर 10 मिनिटांनी नखं धुवा आणि त्यांना चांगले मॉइश्चरायझर लावा. यामुळे तुमचे नखे चमकदार आणि मजबूत होतील. तुम्ही लसणाच्या पाकळ्या सोलून थेट तुमच्या नखांवर लावू शकता.

काकडीचा रस अद्भुत आहे

तुम्ही काकडी किसून डोळ्यांवर ठेवू शकता. यामुळे डोळ्यांना थंडावा मिळतोच आणि काळी वर्तुळे रोखण्यासाठी देखील प्रभावी काम करते. तुमच्या पायांची त्वचा खूप कोरडी झाली असेल तर तुम्ही ती हायड्रेट करण्यासाठी काकडीचा रस वापरू शकता. यासाठी, लिंबू आणि काकडीचा रस किंवा त्याची पेस्ट ऑलिव्ह ऑइलमध्ये मिक्स करा आणि तुमच्या त्वचेला लावा. अशा प्रकारे वेगवेगळ्या भाज्या तुमचे सौंदर्य वाढवण्यासाठी खूप प्रभावी ठरू शकतात.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

Follow Us
सावधान! अशुद्ध खाद्यपदार्थांवर ब्रँडेड टॅग? छापा टाकताच फॅक्टरीत भयंकर
सावधान! अशुद्ध खाद्यपदार्थांवर ब्रँडेड टॅग? छापा टाकताच फॅक्टरीत भयंकर.
महागाईविरोधात पवारांच्या राष्ट्रवादीचा एल्गार! नवी मुंबईत रस्त्यावर...
महागाईविरोधात पवारांच्या राष्ट्रवादीचा एल्गार! नवी मुंबईत रस्त्यावर....
नागरिकांनो पुढील 48 तास महत्त्वाचे! पावसामुळे अंधेरीसह उपनगरीय भागात..
नागरिकांनो पुढील 48 तास महत्त्वाचे! पावसामुळे अंधेरीसह उपनगरीय भागात...
अखिल भारतीय महापौर परिषदेच्या अध्यक्षपदी रितू तावडेंची वर्णी
अखिल भारतीय महापौर परिषदेच्या अध्यक्षपदी रितू तावडेंची वर्णी.
कोल्हापूर हादरलं! बॉयफ्रेंडसह 4 जणांचं तरुणीसोबत भयंकर कृत्य,
कोल्हापूर हादरलं! बॉयफ्रेंडसह 4 जणांचं तरुणीसोबत भयंकर कृत्य,.
एका क्षणात होत्याचं नव्हतं!; एसटीच्या भीषण अपघाताने महाराष्ट्र हादरला
एका क्षणात होत्याचं नव्हतं!; एसटीच्या भीषण अपघाताने महाराष्ट्र हादरला.
मॉन्सूनच्या आधीच मुंबईत पावसाची एंट्री! उष्णतेपासून मुंबईकरांना दिलासा
मॉन्सूनच्या आधीच मुंबईत पावसाची एंट्री! उष्णतेपासून मुंबईकरांना दिलासा.
मुंबईकरांनो सावधान! पावसामुळे होतोय वेस्टर्न एक्सप्रेसवेवर भीषण अपघात
मुंबईकरांनो सावधान! पावसामुळे होतोय वेस्टर्न एक्सप्रेसवेवर भीषण अपघात.
CBSE च्या पोर्टलवर मोठ्या सायबर हल्ल्याचा प्रयत्न, फक्त दोनच मिनिटांत
CBSE च्या पोर्टलवर मोठ्या सायबर हल्ल्याचा प्रयत्न, फक्त दोनच मिनिटांत.
कचऱ्याने हैराण नागरिक आक्रमक; MIDC कार्यालयाबाहेर टाकला कचऱ्याचा ढीग,
कचऱ्याने हैराण नागरिक आक्रमक; MIDC कार्यालयाबाहेर टाकला कचऱ्याचा ढीग,.