
Shah Rukh Khan : अभिनेता शाहरुख खान याला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. अभिनेत्याने अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं… फक्त भारतातच नाही तर, साता समुद्रापार देखील शाहरुख खान याच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. शाहरुख खान फक्त त्याच्या प्रोफेशनल आयुष्यामुळेच नाही तर, खासगी आयुष्यामुळे देखील कायम चर्चेत असतो. किंग खानच्या लव्हस्टोरीबद्दल सर्वांना माहिती आहे. शाहरुख आणि गौरी यांच्या लग्नाला आता 33 वर्ष झाली आहेत. पण एकमेकांच्या कठीण परिस्थितीत देखील दोघांनी एकमेकांची साथ सोडली नाही. तर अभिनेत्याच्या लग्नाबद्दल एक महत्त्वाची गोष्ट जाणून घेऊ…
शाहरुख खान आणि गौरी खान यांच्या नात्याबद्दल सांगायचं झालं तर, पहिल्या ओळखीनंतर भेटी वाढल्या आणि त्याचं रुपांतर प्रेमात झालं. पण दोघांचे धर्म वेगळे असल्यामुळे गौरी हिच्या कुटुंबियांना त्याचं नातं मान्य नव्हतं. दोघांच्या नात्याला कुटुंबियांचा स्पष्ट नकार होता. एवढंच नाही तर, गौरीच्या भावाने किंग खानला धमकी देखील दिलेली.
‘King of Bollywood: Shah Rukh Khan and the Seductive World of Indian Cinema’, या पुस्तकात शाहरुख खान याच्या खासगी आयुष्याबद्दल सांगितलं आहे. गौरीचा भावा विक्रांत छिब्बर याने किंग खानवर बंदुकीने निशाना साधला आणि ‘माझ्या बहिणीपासून दूर राहा…’ अशी धमकी दिली होती.
गौरी आणि शाहरुख यांच्या रिसेप्शन दरम्यानचा एक किस्सा आहे… याबद्दल खुद्द शाहरुख खान याने एका मुलाखतीत सांगितलं होतं. अभिनेता म्हणालेला, ‘रिसेप्शनच्या दिवशी गौरी खान हिचे कुटुंबिय पंजाबीमध्ये बोलत होते. तेव्हा मी म्हणालो, ‘गौरी बुरखा घाल चल आपण नमाज पठण करू… संपूर्ण कुटुंबाचं लक्ष आमच्याकडे होतं. तेव्हा मी म्हणालेलो, ‘आतापासून गौरी रोज बुरखा घालेल, जेव्हा ती घरातून बाहेर पडेल तेव्हा तिचं नाव आजपासून आयेश खान असं असेल…’ पण नंतर अभिनेत्याने सर्वांना सांगितल हा फक्त एक विनोद आहे…
सांगायचं झालं तर, शाहरुख खान याने कधीच गौरी खान हिला धर्म बदलण्यास सांगितलं नाही. आजही किंग खानच्या घराच्या घरात पूजा आणि नमाज पठण होतं… एवंढच नाही तर ‘आपला कोणताच धर्म नाही, आपण भारतीय आहोत..’ असं किंग खान त्याच्या मुलांना सांगत असतो.
अभिनेता शाहरुख खान याच्या आगामी सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, किंग खान लवकरच ‘किंग’ सिनेमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. सिनेमात अभिनेत्री सुहाना खान पहिल्यांदा वडिलांसोबत स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे. सोशल मीडियावर देखील शाहरुख खान आणि सुहाना खान यांचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात.