Heart Attack : अभिनेता श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक येण्यापूर्वी नेमकं काय झालं? जाणून घ्या

| Updated on: Dec 15, 2023 | 12:09 AM

हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेता श्रेयस तळपदे याला हृदयविकाराचा झटका आल्याने खळबळ उडाली आहे. नेमकं काय झालं म्हणून सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलं आहे. सध्यातरी त्याची प्रकृती स्थिर असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत.

Heart Attack : अभिनेता श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक येण्यापूर्वी नेमकं काय झालं? जाणून घ्या
Heart Attack : श्रेयस तळपदेला हृदयविकाराचा झटका आल्याने खळबळ, नेमकं कधी आणि काय झालं ते जाणून घ्या
Follow us on

मुंबई : धकाधकीची जीवनशैली आणि निसर्गाच्या विरुद्ध जाऊन करत असलेल्या कामांमुळे माणसाचं जीवन बेभरवशाचं राहिलं आहे. कामाचा तणाव यामुळे तर कमी वयात हृदयविकाराचे झटके येण्याचं प्रमाण वाढलं आहे. अशा बातम्या आपण रोजच वाचत ऐकत असतो. पण अभिनेता श्रेयस तळपदे याला हृदयविकाराचा झटका आल्याची बातमी आली आणि प्रत्येकाच्या पायाखालची वाळू सरकली. हा हा करता ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. ४७ वर्षीय श्रेयस तळपदे याला शुटिंग दरम्यान हृदयविकाराचा झटका आला. मुंबईत शूटिंग संपल्यानंतर श्रेयसला अस्वस्थ वाटू लागलं आणि बेशुद्ध झाला. त्यामुळे जवळ असलेल्यांनी तात्काळ रुग्णालयात दाखल केलं. श्रेयसला हृदयविकाराचा झटका होता असं रुग्णालयात दाखल केल्यानंतर केलं. त्यानंतर तात्काळ अँजियोप्लास्टची सर्जरी करण्याचा निर्णय घेतला. मीडिया रिपोर्टनुसार श्रेयस तळपदे वेलकम टू द जंगल या चित्रपटाचं शूटिंग करत होता.

एका सू्त्रांनी हिंदुस्तान टाईम्सला दिलेल्या माहितीनुसार, “त्याने पूर्ण दिवस शूटिंग केली. तो एकदम व्यवस्थित होता. त्याने अॅक्शन सीनही शूट केला होता. शूटिंग संपल्यानंतर तो घरी गेला आणि पत्नीला सांगितलं अस्वस्थ वाटत आहे. अशात पत्नीने तात्काळ रुग्णालयात दाखल केलं. इतकंच काय तर रुग्णालयात नेताना बेशुद्धही झाला.”

श्रेयस तळपदे वेलकम टू द जंगल या चित्रपटाचं शूटिंग मुंबईत करत होता. या चित्रपटात मोठी स्टारकास्ट आहे. या चित्रपटात अक्षय कुमार, जॅकलीन फर्नांडिस, दिशा पटानी, संजय दत्त, आर्शद वारसी, सुनील शेट्टी, रवीना टंडन, लारा दत्ता, जॉनी लीवर, राजपाल यादव, किकू शारदा, कृष्णा अभिषेक, परे रावल, तुषार कपूर, मीका सिंह आणि दलेर मेहंदी असे स्टार कलाकार आहेत. हा चित्रपट 20 डिसेंबर 2024 ला रिलीज होणार आहे. त्यासाठी आतापासून शूटिंग सुरु झालं आहे.