AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रसिद्ध अभिनेता श्रेयस तळपदे याला ह्रदयविकाराचा तीव्र झटका, नेमकं काय झालं? कशी आहे प्रकृती?

Shreyas Talpade heart attack : प्रसिद्ध अभिनेता श्रेयस तळपदे याला ह्रदयविकाराचा तीव्र झटका आला आहे. चित्रपटाच्या शुटींगनंतर त्याला अस्वस्थ वाटू लागल्यावर तो खाली कोसळला होता. रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

प्रसिद्ध अभिनेता श्रेयस तळपदे याला ह्रदयविकाराचा तीव्र झटका, नेमकं काय झालं? कशी आहे प्रकृती?
Harish Malusare
Harish Malusare | Updated on: Dec 15, 2023 | 12:06 AM
Share

मुंबई। 14 डिसेंबर 2023 : मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता श्रेयस तळपदे याला ह्रदयविकाराचा तीव्र झटका आला आहे. शुटिंग संपून घरी आल्यावर श्रेयसला अस्वस्थ वाटू लागलं. त्यामुळे तो जागीच कोसळला. ह्रदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. श्रेयसची अँजिओप्लास्टीही तातडीने करण्यात आली. त्याच्यावर उपचार सुरू असून डॉक्टरांची टीम त्याच्यावर लक्ष ठेवून आहे.

बॉलिवूड सुपरस्टार अभिनेता अक्षय कुमारसोबत ‘वेलकम टू द जंगल’ या चित्रपटाचे शूटिंग करत होता. श्रेयसला रुग्णालयात नेण्यात आल्यावर तेथे त्याची अँजिओप्लास्टी करण्यात आली. अंधेरी पश्चिम येथील बेलेव्ह्यू रुग्णालयात नेले असता त्याला हृदयविकाराचा झटका आल्याचं समजलं. सध्या त्याची प्रकृती सुधारत असल्याची माहिती समजत आहे.

दरम्यान, श्रेयसच्या चाहत्यांना या घटनेमुळे मोठा धक्का बसला आहे. श्रेयसचे चाहते निरोगी आयुष्यासाठी प्रार्थना करत आहेत. अनेकांनी सोशल मीडियावर श्रेयसच्या प्रकृती चिंता व्यक्त करत पोस्ट शेअर केल्या आहेत. हिंदी आणि मराठी सिनेमांमध्ये श्रेयसने धमाकेदार भूमिका निभावत चाहत्यांची जिंकली आहेत. मराठीपासून बॉलिवूडपर्यंत आपल्या ठसकेदार अभिनयाचा ठसा उमटवला आहे.

Follow Us
उदय सामंत: 'एमआयडीसीच्या समस्यांवर लक्ष, मराठी भाषेला प्राधान्य'
उदय सामंत: एमआयडीसीच्या समस्यांवर लक्ष, मराठी भाषेला प्राधान्य
मराठीची सक्ती नाही मराठीची भक्ती आहे
'मराठीची सक्ती नाही मराठीची भक्ती आहे', रिक्षाचालकांच्या मराठी सक्तीवरून शिंदेंची प्रतिक्रिया
मराठी न बोलल्यास परवाना रद्द करण्याच्या धमक्यांवरचा दुबेंचा इशारा
संजय दुबे यांचा प्रताप सरनाईक यांच्या मराठी भाषेच्या सक्तीला थेट विरोध
प्रवीण दरेकर यांचा नवनाथ वाघमारे यांच्या वक्तव्यावर हल्लाबोल
प्रवीण दरेकर यांचा नवनाथ वाघमारे यांच्या वक्तव्यावर हल्लाबोल:
शरद पवार एनडीएमध्ये जाणार नाहीत, विरोधातच राहणार
पवारांकडून एनडीएमध्ये जाण्याच्या चर्चा फेटाळल्या; पक्ष कार्यकर्त्यांना दिले स्पष्ट निर्देश
देशमुखांचं कारागृह महानिरीक्षकांना पत्र; गैरप्रकारांच्या चौकशीची मागणी
धनंजय देशमुखांचे बीड कारागृह महानिरीक्षकांना पत्र: गैरप्रकार चौकशी आणि आरोपी स्थलांतराची मागणी
भाजप-शिवसेनेतील सुप्त संघर्ष पुन्हा चव्हाट्यावर
भाजप-शिवसेनेतील सुप्त संघर्ष पुन्हा चव्हाट्यावर? ठाण्यातील कार्यक्रमात भाजप नेत्यांची अनुपस्थिती
बेस्ट कामगारांचा बेमुदत संप; प्रलंबित मागण्यांसाठी कर्मचारी आक्रमक
बेस्ट कामगारांचा मंगळवारपासून बेमुदत संप: प्रलंबित मागण्यांसाठी कर्मचारी आक्रमक
पालकमंत्री महाजनांच्याविरोधात पहिल्याच दिवशी ठाकरे गटाचे आंदोलन
नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याविरोधात पहिल्याच दिवशी ठाकरे गटाचे आंदोलन
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून गरजू रुग्णांना मदत
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून गरजू रुग्णांना अवयव प्रत्यारोपणासाठी मदत