सकाळी 8 वाजता उठणारा गोविंदा आज पहाटे 5 वाजता का उठला? गोळी लागल्याच्या घटनेनंतर संशय वाढला; सत्य काय?

Govinda News: कशी लागली गोविंदाला गोळी, कोणाची होती रिल्हॉल्वर? पोलिसांच्या ताब्यात आहे आता रिव्हॉल्वर... गोळी लागल्याच्या घटनेनंतर संशय वाढला; सत्य काय? सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त गोविंदा याच्या प्रकृतीची चर्चा...

सकाळी 8 वाजता उठणारा गोविंदा आज पहाटे 5 वाजता का उठला? गोळी लागल्याच्या घटनेनंतर संशय वाढला; सत्य काय?
| Updated on: Oct 01, 2024 | 2:04 PM

बॉलिवूड अभिनेता गोविंदा याच्या पायाला गोळी लागली आहे. गोळी लागल्यामुळे अभिनेत्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून अभिनेत्याची प्रकृती आता स्थिर आहे. गोविंदाच्या पायाला गोळी लागल्याचा दावा त्याच्या मॅनेजरने केला आहे. अभिनेत्याला गोळी लागल्यानंतर सर्वत्र खळबळ माजली. गोविंदाला गोळी कशी लागली? खरंच त्याने स्वतःच्या परवाना असलेल्या रिव्हॉल्व्हरने गोळी झाडली होती का? गोळी लागली तेव्हा तो काय करत होता? असे अनेक प्रश्न सध्या उपस्थित होत आहेत.

मंगळवारी सकाळी अभिनेता गोविंदा याला गोळी लागली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोविंदाकडे परवानाधारक रिव्हॉल्व्हर आहे. याच परवानाधारक रिव्हॉल्व्हरमधून चुकून ही गोळी सुटली आणि थेट गोविंदाच्या पायाला लागली. रिव्हॉल्व्हरचं लॉक उघडे असल्याचा दावाही केला जात आहे. घटना घडली तेव्हा पहाटेचे पाच वाजले होते. अभिनेता तेव्हा विमानतळावर जाण्याच्या तयारीत होता.

 

 

कशी लागली गोळी?

गोविंदा सकाळी 4.45 मिनिटांनी जुहू येथील राहत्या घरातून निघण्याची तयारी करत होता. अभिनेता कोलकाता जाण्यासाठी विमातून प्रवास करणार होता. तेव्हाच अचानक अभिनेत्याच्या पायाला अचानक गोळी लागली. पण अद्याप गोविंदाने घडलेल्या घटनेप्रकरणी तक्रार दाखल केलेली नाही.

अभिनेत्याच्या मॅनेजरने दिलेल्या माहितीनुसार, ‘रिव्हॉल्वर कपाटात ठेवत असताना गोविंदाच्या हातातून रिव्हॉल्वर खाली पडली आणि गोळी अभिनेत्याच्या पायाला लागली. रिव्हॉल्वरचं लॉक सुरु असल्यामुळे गोळी लागली..’ सध्या सर्वत्र गोविंदा याची चर्चा रंगली आहे.

पोलिसांनी रिव्हॉल्वर घेतली ताब्यात

घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांचं पथक तात्काळ घटना स्थळी पोहोचलं. पोलिसांनी घटनेची चौकशी केली आणि रिव्हॉल्वर ताब्यात घेतली. सध्या याप्रकरणी पोलीस तपास करत आहेत. यावर अभिनेत्याच्या कुटुंबियांकडून अधिकृत वक्तव्य करण्यात आलेलं नाही.