बॉलिवूडचे ‘हे’ सेलिब्रिटी संरक्षणासाठी स्वतःकडे ठेवतात हत्यार, यादीत प्रसिद्ध सेलिब्रिटी

Bollywood Celebs: फक्त गोविंदाच नाही तर, बॉलिवूडच्या 'या' सेलिब्रिटींकडे संरक्षणासाठी असतात हत्यार, यादीत प्रसिद्ध सेलिब्रिटींची नावे... जाणून तुम्हाला देखील बसेल धक्का..

बॉलिवूडचे 'हे' सेलिब्रिटी संरक्षणासाठी स्वतःकडे ठेवतात हत्यार, यादीत प्रसिद्ध सेलिब्रिटी
Follow us
| Updated on: Oct 01, 2024 | 11:43 AM

Bollywood Celebs: अभिनेता गोविंदाच्या गुडघ्याला गोळी लागली असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटना सकाळी पाच वाजताच्या सुमारास घडली आहे. गोविंदा कोलकात्याला जाण्याच्या तयारीत होता. दरम्यान, अभिनेता आपले परवाना असलेलं रिव्हॉल्व्हर ठेवत होता, त्यावेळी त्याच्या हातातून रिव्हॉल्व्हर निसटली आणि एक गोळी त्याच्या पायाला लागली. गोळी लागल्यानंतर अभिनेत्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. डॉक्टरांनी अभिनेत्याच्या पायातील गोळी काढली असून, गोविंदाची प्रकृती आता स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.

सांगायचं झालं तर, गोविंदा याच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. त्यामुळे चाहत्यांनी देखील चिंता व्यक्त केली आहे. पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे, गोविंदा हा इंडस्ट्रीतील एकमेव स्टार नाही ज्याच्याकडे स्वतःच्या संरक्षणासाठी हत्यार आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, इतर सेलिब्रिटी देखील त्यांच्या संरक्षणासाठी शस्त्रे ठेवतात. अशाच सेलिब्रिटींबद्दल आज जाणून घेऊ…

अभिनेता सनी देओल – रिपोर्टनुसार अभिनेता सनी देओल यांच्याकडे रिव्हॉल्वर आहे. अभिनेत्याने ‘सिंह साहब’ सिनेमाच्या शुटिंग दरम्यान देखील अभिनेत्याने त्याच्या रिव्हॉल्वरचा वापर केला आहे. सनी कायम स्वतःच्या संरक्षणासाठी रिव्हॉल्वर ठेवतात.

अभिनेता सलमान खान याला देखील सतत जीवेमारण्याच्या धमक्या येत असतात. त्यामुळे अभिनेत्याला रिव्हॉल्वर ठेवण्यासाठी परवाना देखील मिळाला आहे. सलमान खानला बिश्नोई टोळीकडून अनेक धमक्या आल्या आहेत. अभिनेत्याच्या कुटुंबियांना देखील धमक्या मिळत असतात.

अभिनेत्री पुनम ढिल्लो यांच्याकडे देखील स्वतःच्या संरक्षाणासाठी हत्यार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, माजी फेमिना मिस इंडिया आणि अभिनेत्री पूनम ढिल्लो सुरक्षेसाठी स्वतःकडे बंदूक ठेवतात. एका मुलाखतीत त्यांनी याचा खुलासा केला होता.

महानायक अमिताभ बच्चन यांच्याकडे देखील रिव्हॉल्वर आहे. खऱ्या जीवनातही त्यांच्याकडे परवानाधारक हत्यार आहे. रिपोर्ट्सनुसार, मुंबईत 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यानंतर अमिताभ बिग बी यांनी बंदूक खरेदी केली होती. त्याच्याकडे .32 रिव्हॉल्वर आहे.

'कारण टायगर अभी जिंदा है...',अमोल कोल्हेंची फटकेबाजी, बघा काय म्हणाले?
'कारण टायगर अभी जिंदा है...',अमोल कोल्हेंची फटकेबाजी, बघा काय म्हणाले?.
उद्धव ठाकरेंवर अ‍ॅन्जिओप्लास्टी शस्त्रक्रिया, डॉक्टरांचा सल्ला काय?
उद्धव ठाकरेंवर अ‍ॅन्जिओप्लास्टी शस्त्रक्रिया, डॉक्टरांचा सल्ला काय?.
भाजप आमदारासमोर महिलांना वाटलेल्या साड्या मराठा आंदोलकांनी पेटवल्या अन
भाजप आमदारासमोर महिलांना वाटलेल्या साड्या मराठा आंदोलकांनी पेटवल्या अन.
UP च्या बहरइचमध्ये देवी विसर्जनावेळी गोळीबार, संतप्त जमावाकडून जाळपोळ
UP च्या बहरइचमध्ये देवी विसर्जनावेळी गोळीबार, संतप्त जमावाकडून जाळपोळ.
सिद्दीकींच्या हत्येचा कट याच घरात शिजला; बघा एक्सक्ल्युझिव्ह व्हिडीओ
सिद्दीकींच्या हत्येचा कट याच घरात शिजला; बघा एक्सक्ल्युझिव्ह व्हिडीओ.
बाबा सिद्दीकींसह झिशान यांच्याही हत्येचा होता कट, आरोपींची मोठी कबुली
बाबा सिद्दीकींसह झिशान यांच्याही हत्येचा होता कट, आरोपींची मोठी कबुली.
राज ठाकरे राजकीय सस्तन प्राणी, जे साडेचार वर्षे..अंधारेंची बोचरी टीका
राज ठाकरे राजकीय सस्तन प्राणी, जे साडेचार वर्षे..अंधारेंची बोचरी टीका.
आचारसंहितेपूर्वी मंत्रिमंडळ बैठकीत निर्णयाचा धडाका, 19 निर्णय जारी
आचारसंहितेपूर्वी मंत्रिमंडळ बैठकीत निर्णयाचा धडाका, 19 निर्णय जारी.
सरकारकडून टोलमाफी अन् राज ठाकरे म्हणाले, 'ही आनंदाची बाब, पण फक्त...'
सरकारकडून टोलमाफी अन् राज ठाकरे म्हणाले, 'ही आनंदाची बाब, पण फक्त...'.
सरकारकडून टोलमाफी अन् मनसेचा एकच जल्लोष; अविनाश जाधव म्हणाले...
सरकारकडून टोलमाफी अन् मनसेचा एकच जल्लोष; अविनाश जाधव म्हणाले....