AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जगातलं असं एक गाणं, जे ऐकल्यावर लोक द्यायचे जीव, 100 हून अधिक बळी घेणाऱ्या गाण्यावर होती बंदी!

जगात एक असे गाणे आहे, 'Gloomy Sunday', ज्याला ऐकून 100 हून अधिक लोकांनी आयुष्य संपवलं असे मानले जाते. रेज्सो सेरेसने लिहिलेल्या या गाण्यावर जगभरात बंदी घालण्यात आली होती. त्याची दुःखद धून आणि बोल यामुळे अनेकजण नैराश्यात गेले. आजही हे 'शापित गाणे' एक रहस्यच आहे की ते खरोखरच प्राणघातक होते की निव्वळ योगायोग?

जगातलं असं एक गाणं, जे ऐकल्यावर लोक द्यायचे जीव, 100 हून अधिक बळी घेणाऱ्या गाण्यावर होती बंदी!
music instrumentImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 26, 2026 | 3:44 PM
Share

गाणं आणि संगीत हा लोकांच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. संगीत आणि गाणं आवडत नाही असा मनुष्यच विरळा असेल. सुख असो वा दु:खाचा प्रसंग असो, प्रत्येकाला आठवतं ते गाणंच. गाणी ऐकून मनुष्य त्याचं दु:ख विसरतो. तसाच तो गाणी ऐकून आनंदही सेलिब्रेट करत असतो. अनेकदा तर अनेक रुग्ण केवळ गाणं किंवा संगीत ऐकल्याने बरे झाल्याचं पाहायला मिळालं आहे. यावरून संगीत आणि गाण्याची किती ताकद आहे हे दिसून येतं. पण गाणं ऐकल्यावर माणसांनी जीव दिलाय असं कधी ऐकलंय का? आश्चर्य वाटेल. पण हे खरंच आहे. जगातील असं एक गाणं आहे, जे ऐकल्यावर एक दोन नव्हे 100 हून अधिक लोकांनी जीव दिला होता. त्यामुळे या गाण्यावर जगभरात बंदी आणण्यात आली होती. या गाण्याला जगातील सॅड साँग किंवा शापित गाणंही म्हटलं जातं.

1930ची गोष्ट. हंगेरीचा स्ट्रगलर पियानोवादक रेज्सो सेरेस आपल्या घरातील छोट्या खोलीत बसला होता. मनोभंग झाला होता. आयुष्यात आशेचा किरण दिसत नव्हता. त्यावेळी त्याने एक धून तयार केली. एवढी दर्दभरी, एवढी उदास की ऐकणाऱ्यांच्या काळजातच घुसली. रेज्सो सेरेस आणि लैजलो या दोघांनी मिळून हे गाणं लिहिलं. या गाण्याचं नाव होतं “Gloomy Sunday” . 1935 मध्ये जेव्हा या गाण्याचं रेकॉर्ड पहिल्यांदा बाजारात आलं, तेव्हा एकच खळबळ उडाली होती. हे गाणं ऐकणाऱ्यांना या धूनने खोल अंधारात ढकलून दिलं. वर्तमानपत्रांमध्ये बातम्या येऊ लागल्या. हे गाणं आल्यावर ते ऐकल्यानंतर त्याच वर्षी एका व्यक्तीने जीव दिला. त्यानंतर काही महिन्यातच 17 लोकांनी जीव दिला होता. अनेकांनी तर चिठ्ठीमध्ये या गाण्याचे बोल लिहिले होते. एका रिपोर्टनुसार, या गाण्याच्या कंपोजरच्या गर्लफ्रेंडनेही जीवन संपवलं होतं.

ज्याने लॉन्च केलं…

ग्लूमी संडे हे गाणं ऐकल्यानंतर त्याच्या पब्लिशरने पहिल्यादा आयुष्य संपवलं. त्याने सुरुवातीला गाणं खरेदी करण्यास नकार दिला होता. पण नंतर काही काळाने त्याने प्राणत्याग केला. 1933 मध्ये हे गाणं आल्यानंतर केसेस अधिक वाढत गेल्या. 30 मार्च 1936 रोजी टाइम मॅग्जीनमध्ये त्यावर एक रिपोर्ट छापून आला होता. त्यात हे गाणं बाजारात आल्यानंतर दोन वर्षातच 17-18 लोकांनी जीव दिल्याचं म्हटलं होतं. यातील सर्वाधिक प्रकरणं हंगेरीतील होते. त्यानंतर 24 फेब्रुवारी 1936 मध्ये या गाण्यावर एक आर्टिकलही छापून आलं होतं.

अन् गाणं इंग्रजीतही आलं…

गाण्याची लोकप्रियता वाढत होती. त्यामुळे अमेरिकेत हे गाणं इंग्लिश लिरिक्ससह लॉन्च केलं गेलं. 1936मध्ये अमेरिकेत हे गाणं वाजलं. या गाण्याचे बोल सेम एम. लेव्हिस यांनी लिहिले होते आणि हल केंपने हे गाणं गायलं होतं. गाणं इंग्रजीत आल्यावर ते अधिकच लोकप्रिय झालं आणि आयुष्य संपवण्याचे प्रकारही वाढले होते. ज्या मुलीने हे गाणं लिहिलं होतं. तिनेही जगाचा निरोप घेतला होता. नंतरच्या काळात हे गाणं ऐकूण 100 हून अधिक लोकांनी जीव दिला. परिस्थिती एवढी बिघडली की 1941 मध्ये हंगेरी सरकारने या गाण्यावर बंदी घातली. एवढेच नव्हे तर बीबीसीनेही हे गाणं रेडिओवर वाजवण्याची अनेक दशके परवानगी दिली नव्हती. त्यामुळे हे गाणं खरोखरच लोकांचा जीव घ्यायचं की हा केवळ योगायोग होता? याचं रहस्य अजूनही कायम आहे.

मूळ गीतकारानेही घेतला निरोप

1968मध्ये या गाण्याचे मूळ गीतकार रेज्सो यानेही जगाचा निरोप घेतला. त्यानंतर या गाण्यावर बंदी घालण्यात आली होती. मात्र, 62 वर्षानंतर या गाण्यावरील बंदी हटवण्यात आली आहे. आयुष्याचा स्ट्रगल, माणूसकी, दु:ख आणि दर्द याचा मिलाफ म्हणजे हे गाणं आहे. पहिल्या महायुद्धाच्या काळात प्रचंड महागाई वाढली होती. रोजगार नव्हते, भूकबळी वाढले होते. चोऱ्यामाऱ्या होत होत्या. या सर्व पार्श्वभूमीवर हे गाणं लिहिलं गेलं होतं. आज मात्र, या गाण्याचा तसा काहीच रिलेव्हन्स नाहीये.

Follow Us
जपानचे उच्चस्तरीय शिष्टमंडळ मुंबईत दाखल; राहुल नार्वेकरांसोबत बैठक
जपानचे उच्चस्तरीय शिष्टमंडळ मुंबईत दाखल; राहुल नार्वेकरांसोबत महत्त्वपूर्ण चर्चा, कारण काय?
शक्तीपीठ प्रकल्पाविरोधात शेतकरी आक्रमक! सलग तिसऱ्या दिवशीही जमीन मोजणी
शक्तीपीठ प्रकल्पाविरोधात शेतकरी आक्रमक! सलग तिसऱ्या दिवशीही जमीन मोजणी रोखली, पोलिसांशी झटापट
शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा फैसला पुन्हा लांबणीवर; कारण काय?
शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा फैसला पुन्हा लांबणीवर; सुनावणी पुढे ढकलली! कारण काय?
सोलापूर जिल्हा बँक निवडणुकीत मतांची चोरी? संविधान पायदळी तुडवल्याचा...
Solapur : सोलापूर जिल्हा बँक निवडणुकीत मतांची चोरी? धैर्यशील मोहिते पाटलांचा खळबळजनक आरोप; संविधान पायदळी तुडवल्याचा दावा
सुप्रिया सुळे तातडीने ब्रीच कँडी रुग्णालयाकडे रवाना; शरद पवारांच्या...
सुप्रिया सुळे तातडीने ब्रीच कँडी रुग्णालयाकडे रवाना; शरद पवारांच्या प्रकृतीबाबत दिली मोठी अपडेट!
धारावीकरांसाठी उद्धव ठाकरे मैदानात! अदानी प्रकल्पाविरोधात मोठं आंदोलन
धारावीकरांसाठी उद्धव ठाकरे मैदानात! अदानी प्रकल्पाविरोधात मोठं आंदोलन, नेमक्या काय आहेत मागण्या?
10 कोटींच्या मागणीचा व्हिडिओ व्हायरल, देवराम लांडेंचा राष्ट्रवादीला..
10 कोटींच्या मागणीचा व्हिडिओ व्हायरल, देवराम लांडेंचा राष्ट्रवादीला रामराम!
शिवरायांच्या गडकिल्ल्यांसाठी सरकारचा पुढाकार; एकनाथ शिंदेंनी सांगितला
शिवरायांच्या गडकिल्ल्यांसाठी सरकारचा पुढाकार; एकनाथ शिंदेंनी सांगितला खास संकल्प
पुणे कोर्टाबाहेरील हल्ल्यावेळी हल्लेखोरांची घोषणाबाजी; मंदार किवळे....
Pune : शुभम दादा, तुझ्या खुनाचा बदला घेतला... पुणे कोर्टाबाहेरील हल्ल्यावेळी हल्लेखोरांची घोषणाबाजी; मंदार किवळेंच्या जबाबातून धक्कादायक माहिती समोर
शरद पवार पुन्हा ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल, नेमकं कारण काय?
Sharad Pawar : शरद पवार पुन्हा ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल, नेमकं कारण काय?