Akshaye Khanna : अक्षय खन्नाने एक-दोन नव्हे लगावल्या तब्बल 17 थप्पडा; ‘त्या’ कलाकाराचा चेहरा सुजून लालेलाल, सेटवर उडाली खळबळ

काही फिल्मी सीन असे असतात, जे पडद्यावर फक्त काही सेकंद दिसतात, पण ते शूट करण्यामागची कहाणी खूप रंजक असते. विशेषत: तो सीन जेव्हा दोन मोठ्या कलाकारांमधला टक्करीचा असतो.. बॉलिवूडमधली ्सीच एक यादगार फिल्म आहे, त्यातला थप्पड वाल्या सीनची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.

Akshaye Khanna : अक्षय खन्नाने एक-दोन नव्हे लगावल्या तब्बल 17 थप्पडा; ‘त्या’ कलाकाराचा चेहरा सुजून लालेलाल, सेटवर उडाली खळबळ
Akshaye Khanna slapped this star 17 times
| Updated on: Sep 04, 2026 | 8:23 PM

हिंदी चित्रपटसृष्टीतील अतिशय लोकप्रिय आणि कल्ट चित्रपटांमध्ये गणला जाणारा ‘दिल चाहता है’  (Dil Chahta Hai) प्रदर्शित होऊन नुकतीच 25 वर्षं पूर्ण झाली. या खास सिल्व्हर जुबिलीच्या निमित्ताने चित्रपटाची संपूर्ण स्टारकास्ट आणि निर्माते पुन्हा एकत्र आले. यावेळी त्यांनी चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान घडलेल्या अनेक मजेदार आणि आजवर फारशा चर्चेत न आलेल्या आठवणी सांगितल्या. याचदरम्यान दिग्दर्शक फरहान अख्तर आणि आमिर खान या दोघांनी चित्रपटातील एका गाजलेल्या थप्पड सीनमागची रंजक गोष्ट सांगितली. या सीनमध्ये अक्षय खन्नाने आमिर खानला 1-2 नव्हे तर तब्बल 17 थप्पड मारल्या होत्या. विशेष म्हणजे, शूटिंग पूर्ण होईपर्यंत आमिरचा गाल सुजून लालेलाल झाला होता.

फरहानने अक्षयसोबत आखला होता खास प्लॅन

एका यूट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत फरहान अख्तरने या सीनच्या शूटिंगची आठवण सांगितली. सीन अधिक खराखुरा वाटावा आणि आमिरच्या चेहऱ्यावरचे भाव अगदी नैसर्गिक यावेत, यासाठी त्याने अक्षय खन्नासोबत एक गुप्त प्लॅन आखला होता. फरहानने अक्षयला सांगितलं होतं की, आमिरला वाटेल की तुमचा संवाद संपल्यानंतर त्याला थप्पड बसणार आहे. मात्र, त्याला अनपेक्षित धक्का देण्यासाठी, तुमचा संवाद सुरू असतानाच थप्पड मार, त्यामुळे आमिरच्या चेहऱ्यावरचे आश्चर्याचे भाव अगदी खरे दिसतील, असा सल्ला फरहानने दिला.

परफेक्ट शॉटसाठी आमिर होता आग्रही

यानंतर परफेक्ट शॉट देण्यासाठी आमिर खान यानेही खरीखुरी थप्पड खाण्याची तयारी दाखवली. विशेषतः ओव्हर-द-शोल्डर शॉटमध्ये प्रत्यक्ष थप्पड बसल्यास तो भूमिका साकारत असलेल्या ( आकाशची)  प्रतिक्रिया अधिक नैसर्गिक आणि भावनिक होईल, असं आमिरचं मत होतं. ‘जेव्हा तुम्हाला ला खरचं कोणी कानफटात मारतं ना, तेव्हा तुमच्या भावना आणि रिॲक्शन पूर्णपणे बदलतात’ असंही आमिर म्हणाला होता.

17 वेळा थप्पड बसल्यावर सुजला होता चेहरा

याच हट्टामुळे या सीनसाठी आमिरला तब्बल 17 खऱ्या थप्पडा खाव्या लागल्या आणि शूटिंग संपेपर्यंत त्याचा गाल लालेलाल होऊन चेहऱ्यावर सूज आली होती. याबद्दल फरहानने सांगितलं की, ‘ मला आठवतंय, जेव्हा शूटिंग संपलं तेव्हा आमिरच्या चेहऱ्यावर थपडेचे वळ उठले होते आणि त्याचा चेहरा एका साईडने पूर्ण सुजला होता.’

चित्रपटातील हा प्रसंग कथानकाच्या दृष्टीनेही महत्त्वाचा होता. सिडचं (अक्षय खन्ना) तारावर (डिंपल कपाडिया) प्रेम असतं, तो ते मित्रांना सागंत असतो.  मात्र, आकाश (आमिर खान) या नात्याबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी करतो. त्यामुळे संतापलेला सिड आकाशला थप्पड मारतो.  या एका थप्पडीमुळे तीन मित्रांच्या नात्यातील भावनिक तणाव प्रेक्षकांसमोर ठळकपणे येतो.

या सीनमध्ये मोठ्या प्रमाणावर मारामारी किंवा हिंसा न दाखवण्यामागचं कारणही फरहान अख्तरने स्पष्ट केलं. दोन जवळच्या मित्रांमध्ये एकाने दुसऱ्याला थप्पड मारणे हीच खूप मोठी आणि भावनिक घटना असते, असं त्याचं मत होतं. मित्रांमधील संघर्ष दाखवण्यासाठी मोठ्या हिंसक प्रसंगाची गरज नाही. अनेकदा एक साधी थप्पडही नात्यातील राग, दुखावलेपणा आणि भावनिक तणाव व्यक्त करण्यासाठी पुरेशी ठरते, असं फरहानने नमूद केलं.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us