AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Dharmendra | ‘हिरोईन को झप्पी तो डाल…’, इंटिमेट सीन देताना धर्मेंद्र यांनी सनी देओल यांना सांगितलेली ‘ती’ गोष्ट…

इंटिमेट सीन देताना लाजणाऱ्या सनी देओल यांना वडिलांनी सांगितली 'ती' खासगी गोष्ट ; सनी देओल यांनी 'या' अभिनेत्रीसोबत दिलेल्या इंटिमेट सीनमुळे उडाली सर्वत्र खळबळ

Dharmendra | 'हिरोईन को झप्पी तो डाल...', इंटिमेट सीन देताना धर्मेंद्र यांनी सनी देओल यांना सांगितलेली 'ती' गोष्ट...
| Updated on: Jul 05, 2023 | 10:17 AM
Share

मुंबई | अभिनेते धर्मेंद्र (Dharmendra) कायम त्यांच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असतात. अता देखील धर्मेंद्र एका मोठ्या कारणामुळे चर्चेत आले आहेत. सध्या सर्वत्र धर्मेंद्र आणि त्यांच्या मोठा मुलगा सनी देओल यांची चर्चा सुरु आहे. एक काळ असा होता जेव्हा धर्मेंद्र आणि त्यांच्यानंतर सनी देओल यांनी बॉलिवूडवर राज्य केलं. धर्मेंद्र यांनी प्रत्येक भूमिका ज्या पद्धतीने साकारल्या… प्रत्येक सीनला त्यांनी दिलेला योग्य न्याय आजही त्यांचे सिनेमे पाहिल्यानंतर दिसून येतो. पण सनी देओल जेव्हा बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत इंटिमेट सीन देत होते, तेव्हा ते लाजत असल्यामुळे धर्मेंद्र यांनी लेकाला रागात मोठा सल्ला दिला.

धर्मेंद्र यांनी सनी देओल यांना १९८३ साली बॉलिवूडमध्ये लॉन्च केलं. ‘बेताब’ सिनेमाच्या माध्यमातून सनी देओल यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. सिनेमात सनी देओल यांच्यासोबत अभिनेत्री अमृता सिंग महत्त्वाच्या भूमिकेत होती. सिनेमात सनी देओल आणि अमृता सिंग यांचे अनेक रोमाँटिक सीन आहेत. पण अमृता हिच्यासोबत रोमाँटिक सीन देताना सनी देओल प्रचंड लाजत होते.

सनी देओल सतत टेक घेत असल्यामुळे धर्मेंद्र रागावले आणि लेकाला ओरडले. ‘बेताब’ सिनेमातील हा किस्सा धर्मेंद्र यांनी २००९ साली अभिनेता सलमान खान याचा शो ‘दस का दम’मध्ये सांगितलं. शोमध्ये धर्मेंद्र आणि सनी देओल उपस्थित होते. तेव्हा धर्मेंद्र ‘बेताब’ सिनेमातील एक किस्सा सांगितला.

धर्मेंद्र म्हणाले, ‘तेव्हा सनी देओल याला काही सांगूच शकलो नाही. सिनेमातील गाण्याचा अर्थ नक्की काय आहे. समोर अमृता सिंग होती… अभिनेत्री पूर्ण भिजलेली होती… तू अभिनेत्रीला मिठी तरी मार.. एक सीनसाठी रिटेक घ्यावे लागले होते… त्या जागी मी असतो अभिनेत्रीसोबत मुलीला सोडलं नसतं…’ असं देखील धर्मेंद्र म्हणाले.

पुढे सनी देओल याच्याबद्दल सांगताना धर्मेंद्र म्हणाले, ‘सनी खूप लाजाळू आहे… आजही तो तसाच आहे… त्याच्यामध्ये काहीही फरक पडलेला नाही.’ सांगायचं झालं तर, सनी देओल आणि धर्मेंद्र स्टारर ‘बेताब’ सिनेमा १९८३ साली प्रदर्शित झाला होता. बॉक्स ऑफिसवर सिनेमाने तुफान कमाई केली. एवढंच नाही तर, दोघांची केमिस्ट्री चाहत्यांना प्रचंड आवडली.

सनी देओल यांचे अनेक सिनेमा चाहते आजही तितक्याच आवडीने पाहतात. सनी देओल आता लवकरच ‘गदर २’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहेत. सिनेमात अभिनेत्री अमिषा पटेल देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे. सिनेमाचं टीझर आणि पहिलं गाणं प्रदर्शित झाल्यानंतर चाहते ट्रेलरच्या प्रतीक्षेत आहेत..

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?