सेटवर गाण्याचं पेमेंट घ्यायला गेले, निळूभाऊंनी थेट सिनेमात कामच दिलं; वाचा, पुणेकरांचा अफलातून किस्सा

अभिनय सम्राट निळू फुले यांच्या सिनेमा आणि नाटकातील खलनायकाच्या भूमिका प्रचंड गाजल्या. (when dnyanesh punekar met nilu phule he offered movie)

सेटवर गाण्याचं पेमेंट घ्यायला गेले, निळूभाऊंनी थेट सिनेमात कामच दिलं; वाचा, पुणेकरांचा अफलातून किस्सा
dnyanesh punekar
Follow us
| Updated on: May 04, 2021 | 2:56 PM

मुंबई: अभिनय सम्राट निळू फुले यांच्या सिनेमा आणि नाटकातील खलनायकाच्या भूमिका प्रचंड गाजल्या. त्या इतक्या की निळू भाऊ खरोखरच खलनायक असल्याचं अनेकांना वास्तवात वाटायचं. इतके ते भूमिकेशी समरस व्हायचे. परंतु, प्रत्यक्ष जीवनात ते अत्यंत प्रेमळ होते. लोकांच्या मदतीसाठी ते रात्रीअपरात्री धावून जात. एखाद्याने एखादं चांगलं काम केलं असेल तर त्याची मुक्तकंठाने स्तुती करत. स्वत: गीतकार ज्ञानेश पुणेकर यांना त्याचा अनुभव आला आहे. (when dnyanesh punekar met nilu phule he offered movie)

काय होता किस्सा?

‘कडक लक्ष्मी’ या सिनेमात ज्ञानेश पुणेकर यांना गीत लिहिण्याची संधी मिळाली. त्यांचं गीत ऐकून निळूभाऊ फुले खूश झाले होते. त्यांनी पुणेकरांना स्वत: जवळ बोलावून त्यांचं कौतुक केलं होतं. असंच लिहीत राहा, प्रगती करा, असं ते म्हणाले होते. त्यानंतर ‘तुही तू’ या हिंदी सिनेमासाठीही पुणेकरांनी गाणी लिहिली. या सिनेमाचं चित्रीकरण सुरू असताना पेमेंट घेण्यासाठी ते सेटवर गेले होते. त्यावेळी निळूभाऊंनी थेट पुणेकरांना कंपाऊंडरचं काम दिलं. त्यामुळे सिनेमात गाणी लिहिण्याबरोबर काम करण्याची हौसही भागल्याचं पुणेकर सांगतात.

लोच्या झाला रे…

पुणेकर यांनी अनेक सिनेमांसाठी गाणी लिहिली. त्यात ‘कडक लक्ष्मी’, ‘सदा उचापते’, ‘घाबरायचं नाही’, ‘वऱ्हाडी झटका पुणेरी फटका’, ‘मोसंबी नारंगी’ आणि ‘लोच्या झाला रे’ सह आठ मराठी सिनेमात गाणी लिहिली. तसेच ‘तुही तू’ या हिंदी सिनेमासाठीही त्यांनी गाणी लिहिली.

लोच्या झाला रे झाला, मोठ्या डौलात गोविंदा आला, वरती चढला, धपकन पडला, दहिहंडीचा चुराडा केला, लोच्या झाला रे झाला….

हे ‘लोच्या झाला रे झाला’ सिनेमासाठी त्यांनी लिहिलेलं गीत सुदेश भोसले यांनी गायलं आहे. या गाण्याने एकेकाळी धुमाकूळ घातला होता.

अन् पैशांचा पाऊस पडला

पुणेकर यांननी हजारो गाणी लिहिली आहे. मराठी, हिंदी, कोळी, गुजराती आणि उर्दू भाषेवर प्रभूत्त्व आहे. त्यांनी या भाषांचा अत्यंत चांगल्या पद्धतीने वापर करून घेतला आहे. सिनेगीतांपासून ते गझल आणि कोळी गीतांपासून ते आंबेडकरी गीते लिहितांना त्यांना या भाषा प्रभुत्त्वाचा चांगलाच फायदा झाला आहे. इतर भाषा येत असल्याचा त्यांना अनेकदा फायदाही झाला आहे. एकदा सूरतमध्ये त्यांचा गायिका शीलादेवींबरोबर गाण्याचा सामना होता. काय कार्यक्रमाला गुजरातचे एक मंत्री सोलंकी आले होते. त्यावेळी पुणेकरांनी थेट गुजरातीतूनच गाणं गायलं.

धरणी दिपावे भीमनी करणी, रहशे जग मे तमाम रे, थया भीमनू अमर तेचू नाम रे…

पुणेकरांनी स्वत: लिहिलेलं हे गाणं गायलं अन् त्यांच्यावर पैशांचा एकच पाऊस सुरू झाला. कार्यक्रमाला उपस्थित असलेल्यांनी प्रत्येक शब्दावर पुणेकरांना पैसे दिले. एवढेच नव्हे तर मंत्री सोलंकी यांनीही त्यांच्यावर पैशाची उधळण केली होती.

उषा मंगेशकर, महेंद्र कपूर, उत्तरा केळकर, शकुंतला जाधव, कविता पौडवाल, वैशाली सामंत, जयवंत कुलकर्णी, स्वप्नील बांदोडकर, प्रल्हाद शिंदे, आनंद शिंदे, मिलिंद शिंदे, गोविंद म्हशीलकर, श्रावण यशवंते, शकीला पुनवी, सुलोचना चव्हाण, निशा भगत, आशालता भगत, चंद्रशेखर गाडगीळ, पुष्पा पागधरे, अनुपमा देशपांडे आणि विनय मांडकेंसह अनेक गायकांनी त्यांची गाणी गायली आहेत. मी केवळ सात मिनिटात गाणं लिहितो, असं ते अभिमानाने सांगतात. तसेच आपला स्वभाव खडूस असल्याचंही ते मान्य करतात. त्याचे अनेक फायदे आणि तोटे झाल्याचंही ते सांगतात.

सर्वात वाईट वर्ष

1992 हे वर्ष पुणेकरांसाठी अत्यंत वाईट ठरलं. यावर्षी त्यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला. आई-वडील, पत्नी आणि मुलगा सुनील यांचे आकस्मिक निधन झालं. हा धक्का ते सहन करू शकले नाही. त्यामुळे त्यांची मनस्थिती बिघडली. त्यांचं कामात मन लागे ना. त्यामुळे त्यांनी कामावर जायचं बंद केलं. पुढे त्यांना शिवडी टीबी रुग्णालयाच्या नोकरीतून काढून टाकण्यात आलं. ते मानसिकदृष्ट्या प्रचंड खचले होते. ते इतके की कवी मित्र साजन शिंदे यांना बोलावून मला ठाण्याच्या मेंटल हॉस्पिटलमध्ये अॅडमिट करा, अशी विनवणी त्यांनी ढसाढसा रडत केली होती. काही वर्षांनी ते पूर्णपणे सावरले. मात्र, या बैचेन अवस्थेतच त्यांनी भोईवाड्यातील घर विकलं होतं. राहण्यासाठी जागा नसल्याने मधल्या काळात ते वडाळ्याच्या सिद्धार्थ विहार हॉस्टेलमध्ये राहत होते. (साभार, आंबेडकरी कलावंत) (when dnyanesh punekar met nilu phule he offered movie)

संबंधित बातम्या:

‘या’ पाच गाण्यांनी ज्ञानेश पुणेकर घराघरात पोहोचले, तुम्हीही म्हणाल, वाह क्या बात है!

लिहीत राहा, प्रगती करा, साक्षात निळूभाऊंकडून कौतुक; वाचा, कोण आहेत ज्ञानेश पुणेकर

विद्यार्थीदशेतच तबला वाजवण्याचा छंद जडला, वर्गातही बाकं वाजवायचे; वाचा, दत्ता शिंदेंचे किस्से

(when dnyanesh punekar met nilu phule he offered movie)

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.