अमिताभ बच्चन झालेले कर्जबाजारी, शिव्या देऊन जायची लोकं, पण ऐश्वर्या रायमुळे…

Amitabh Bachchan : सून नसताना ऐश्वर्या रायच्या एक गोष्टीचा बच्चन कुटुंबियांना झालेला मोठा फायदा, ...जेव्हा कर्जबाजारी अमिताभ बच्चन यांना शिव्या देऊन जायची लोकं..., फार कमी लोकांमा माहितीये किस्सा...

अमिताभ बच्चन झालेले कर्जबाजारी, शिव्या देऊन जायची लोकं, पण ऐश्वर्या रायमुळे...
फाईल फोटो
| Updated on: Oct 11, 2025 | 10:08 AM

Amitabh Bachchan : एक चांगलं आणि वाईट पाऊल तुमचं सर्व आयुष्य बदलून टाकतं… महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबत देखील असंच काही झालं. बिग बींच्या आयुष्यात एक अशी वेळ आली, जेव्हा त्यांना स्टाफ कडून पैसे उधार म्हणून घ्यावे लागलेले. अमिताभ बच्चन यांनी आर्थिक परिस्थितीचा देखील सामना केला. बिग बी यांच्या दारात कर्जदारांची रांग लागली होती… पण वाईट दिवस शेवटपर्यंत राहत नाही असं म्हणतात.. असंच काही अमिताभ बच्चन यांच्यासोबत देखील झालं…

अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan Company) यांच्या कंपनीचा 1990 साली दिवाळा निघाला होता.. एक मुलाखतीत बिग बी यांनी यावर मोठा खुलासा देखील केला अमिताभ बच्चन म्हणाले, ‘माझ्याविरोधात 55 कायदेशीर खटले होते. 90 लाख रुपयांचं कर्ज होतं.. कर्जदार दररोज दारात यायचे….’ ही गोष्ट अमिताभ बच्चन यांच्यासाठी अतिशय लाजिरवाणी आणि अपमानास्पद होती. जे लोक पूर्वी त्याच्या कंपनीत सामील होण्यासाठी खूप उत्सुक होते त्यांनी अचानक त्यांचे वर्तन बदललं असं देखील बिग बी म्हणाले… तेव्हा बिग बी यांच्याबद्दल अनेक चर्चा रंगल्या…

अमिताभ बच्चन यांना या कठीण परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी दिग्दर्शक यश चोप्रा यांनी मदत केली. यश चोप्रा यांनी बिग बी यांना ‘मोहब्बतें’ सिनेमात काम करण्याची संधी दिली.. सिनेमाने बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई केली. ज्याचा फायदा अमिताभ बच्चन यांना झाला..

‘मोहब्बतें’ सिनेमात ऐश्वर्या हिने ‘मेघा’ ही भूमिका बजावली होती. सिनेमाने बॉक्स ऑफिसवर तेव्हा 41 कोटींहून अधिक रुपयांचा गल्ला जमा केला. रिपोर्टनुसार सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वी अमिताभ बच्चन यांच्यावर कर्जाचं डोंगर होतं. पण सिनेमाला मिळालेल्या यशानंतर बिग बी यांचं कर्ज फिटलं असं देखील सांगण्यात येत. शिवाय निर्माते देखील ‘मोहबतें’ सिनेमामुळे मालामाल झाल्याची माहिती समोर आली होती.

ऐश्वर्या – शाहरुख यांनी 2000 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘मोहबतें’ सिनेमात एकत्र स्क्रिन शेअर केली. सिनेमात ऐश्वर्या हिची भूमिका फार लहान होती. पण त्याच भूमिकेमुळे सिनेमा वेगळ्या उंचीवर पोहोचला. सिनेमाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली आणि याचा फायदा महानायक अमिताभ बच्चन यांना झाला.