मराठमोळ्या अभिनेत्रीचा पूर्व पतीकडून मानसीक, शारीरिक छळ आणि…, घटस्फोटावर पहिल्यांदा म्हणाली…
'लग्नाचा माझा निर्णय चुकला...', घटस्फोटानंतर पहिल्यांदा व्यक्त झाली मराठमोळी अभिनेत्री... पूर्व पतीकडून मानसीक, शारीरिक छळ आणि..., सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अभिनेत्रीच्या खासगी आयुष्याची चर्चा...

लग्न झाल्यानंतर मुलींच्या आयुष्यात अनेक गोष्टी बदलतात आणि तो बदल मुलींना स्वीकारावा लागतो… काही दिवसांनंतर सर्वकाही ठिक होऊन जाईल… असं मुलींना लग्नानंतर सांगण्यात येतं… पण जोडीदार चांगला असला तर, गोष्टी सहज सोप्या होतात. पण जोडीदार निवडताना चूक झाली तर, आयुष्यात पुन्हा ते पाऊल उचलायचं का? असा प्रश्न निर्माण होतो. पण अनेक मुली समोरच्याला अनेक संधी देतात. ज्यामुळे त्यांना अनेक संकटांचा समाना करावा लागतो…
असंच काही ‘अस्मिता’ फेम अभिनेत्री मयुरी वाघ हिच्यासोबत झालं आहे. मालिकेत काम करत असताना मयुरी हिची ओळख अभिनेता पियुष रानडे याच्यासोबत झाली. मैत्रीचं रुपांतर प्रेमात झाली आणि दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. पण दोघांचं लग्न फार काळ टिकलं नाही.
लग्नानंतर प्रत्येक मुलगी सुखी संसाराचे स्वप्न पाहत असते. पण मयुरीसोबत असं झालं नाही. सतत होणारा त्रास असह्य झाल्यानंतर अभिनेत्रीने घटस्फोटाचा निर्णय घेतलं. घटस्फोटानंतर मयुरी हिने पहिल्यांदा खासगी आयुष्याबद्दल मोठा खुलासा केला आहे. पियुष याने अभिनेत्रीता मानसीक आणि शरीरिक छळ देखील केला. यावर मयुरी म्हणाली, ‘माझ्या आईला सकाळी 10 वाजेपर्यंत फोन केला नाही तर ती घाबरायची… ती मला विचारायची भांडण झालं आहे का, तू ठिक आहेस ना… आणि एक क्षण आला जेव्हा मला हे सर्व थांबलं पाहिजे असं वाटलं…’
View this post on Instagram
‘समोरच्या व्यक्तीने माझ्या वडिलांनी काही अपशब्द बोलले. ते मला बिलकूल आवडलं नाहीत. कारण जोपर्यंत माझ्यापर्यंत होतं, तोपर्यंत ठिक होतं… आई – वडिलांना माझ्या दुसरं कोणी बोलेल मला सहन नाही होणार… त्याआधी बऱ्याच गोष्टी घडून गेलेल्या. माझे आई – वडील त्यातून मला बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होते. पण मी त्याला संधी देत राहिले…’
पुढे अभिनेत्री म्हणाली, ‘सहा महिन्यात मला कळलं की माझा लग्नाचा निर्णय चुकला आहे. पण मला ते कळायला आणि स्वीकारायला उशीर झाला.’ एवढंच नाही तर, मुलाखती दरम्यान, तुझा शारीरिक छळ झाला का? असा प्रश्नदेखील अभिनेत्रीला विचारण्यात आला. यावर मयुरी ‘हो’ म्हणाली… ‘कोरोना काळात मी एकटी असायचे ज्यामुळे माझ्या आईला खूप काळजी वाटायची…’ असं देखील मयुरी वाघ नुकताच झालेल्या मुलाखतीत म्हणाली.
