
अभिनेत्री सारा अली खान आज तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यात आनंदी आहे. पण एक काळ असा होता, जेव्हा अभिनेत्री दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्यासोबत असलेल्या नात्यामुळे चर्चेत आली होती. सुशांत याच्या निधनानंतर एमसीबीकडून साराची चौकशी देखील करण्यात आली. तेव्हा सुशांत याच्यासोबत असलेलं नातं अभिनेत्रीने मान्य केलं होतं. ‘सुशांत नात्यांमध्ये निष्ठावंत नसल्यामुळे आमचं ब्रेकअप झालं…’ असं देखील सारा म्हणाली होती.
अशात सारा आणि सुशांत यांची पहिली भेट कशी झाली? असा प्रश्न देखील तुम्हाला पडला असेल. तर सारा – सुशांत यांची पहिली भेट दिग्दर्शक करण जोहर याच्या घरी झाली होती. तेव्हा सारा हिने बॉलिवूडमध्ये पदार्पण देखील केलं नव्हतं… एका मुलाखतीत सारा हिने सुशांत सोबतच्या पहिल्या भेटीबद्दल सांगितलं होतं.
सांगायचं झालं, अभिनेता सुशांत सिंह राजपूत स्टारर ‘राब्ता’ सिनेमातील ‘मैं तेरा बॉयफ्रेंड… ना ना ना ना’ गाणं सारा हिला प्रचंड आवडलं होतं. ‘गाण्यात सुशांतचा डान्स पाहून मी पूर्णपणे वेडी झाली होती. मला ते गाणं फार आवडलं होतं. मला सुशांतला भेटायचं होतं. करणच्या घरी आमची पहिली भेट झाली.’
‘पहिली भेट झाल्यानंतर मी सुशांतला सांगितलं मला तुचे एब्स आणि कृतीचे पाय प्रचंड आवडले… मला आठवत आहे की मी सुशांत – क्रिती यांना सांगितलं होतं… गाणं प्रचंड जबरदस्त आहे… पण ज्याप्रकारे सुशांत माझ्यासोबत बोलत होता त्यामुळे मला कळलं होतं की, हा प्रचंड हुशार आहे…’
‘मला कळून चुकलं होतं की सावधान राहायला हवं कारण मुलगा प्रचंड स्मार्ट आहे… खूप हुशार आहे… ‘ असं देखील सारा म्हणाली होती. त्यानंतर अभिनेता सुशांत याच्यासोबत सारा हिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. ‘केदारनाथ’ सिनेमात दोघांनी एकत्र स्क्रिन शेअर केली होती.
‘केदारनाथ’ सिनेमाच्या शुटिंग दरम्यान सारा आणि सुशांत यांच्या नात्याच्या चर्चांनी देखील जोर धरला होता. शिवाय अनेक ठिकाणी दोघांना एकत्र स्पॉट देखील करण्यात आलं होतं. सुशांत याच्या मृत्यूनंतर सारा महत्त्वाच्या दिवशी अभिनेत्यासोबत असलेल्या आठवणी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसोबत शेअर करते.