‘अल्लाह रोटी देता है, तू नहीं’… जेव्हा सरोज खान यांनी सलमानला सुनावले होते खडे बोल

When Saroj Khan slammed Salman Khan : सरोज खान या बॉलिवूडमधील प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शिक होत्या. मात्र एकदा त्यांचे अभिनेता सलमान खानशी जोरदार भांडण झाले होते, तेव्हा त्यांनी त्याला चांगलंच झापलं होतं.

'अल्लाह रोटी देता है, तू नहीं'... जेव्हा सरोज खान यांनी सलमानला सुनावले होते खडे बोल
Follow us
| Updated on: Jun 03, 2023 | 5:12 PM

मुंबई : नृत्यदिग्दर्शक सरोज खान यांनी २०२० मध्ये या जगाचा निरोप घेतला होता. त्यांच्या निधनाने संपूर्ण इंडस्ट्रीलाच नव्हे तर चित्रपट जगताबाहेरील लोकांनाही मोठा धक्का बसला होता. सरोज खान (Saroj Khan) यांना बॉलीवूडची ‘मदर ऑफ कोरिओग्राफी’ असेही म्हटले जायचे, त्यांनी इंडस्ट्रीतील प्रत्येक मोठ्या स्टारला तिच्या तालावर नाचायला लावले. सरोज खान आज या जगात नसतील, पण आजपर्यंत चाहते आणि स्टार्स त्यांना विसरलेले नाहीत. नृत्यासोबतच सरोज खान या त्यांच्या निडर आणि दमदार शैलीसाठी ओळखल्या जात होत्या. त्यांच्या समोर कोणीही असो, त्यांना काही वाईट वाटलं किंवा आवडलं नाही, तर त्या ते बिनधास्तपणे व्यक्त करायच्या. कधीही मागे हटायच्या नाहीत.

त्यांच्या स्टाइलची ओळख करून देणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये सरोज खान बॉलिवूडच्या दबंग स्टार म्हणजेच सलमान खानसोबतच्या (salman khan) वादाबद्दल बोलत होत्या. खरंतर हे संपूर्ण प्रकरण खूप जुनं आहे. ही कथा 1994 मध्ये आलेल्या सलमान खान आणि आमिर खान स्टारर ‘अंदाज अपना अपना’शी संबंधित आहे. या चित्रपटात सरोज खान या, सलमान खान आणि आमिर खानची यांची डान्स कोरिओग्राफर होत्या आणि या चित्रपटादरम्यान असे काही घडले की सरोज खान आणि सलमान खान यांनी पुन्हा एकत्र काम केले नाही.

काय आहे संपूर्ण प्रकरण ?

एका मुलाखतीदरम्यान सरोज खान यांनी ‘अंदाज अपना अपना’नंतर सलमान खानसोबत कधीही काम न करण्याचे कारण सांगितले. तेव्हा त्या म्हणाल्या की, – ‘तो (सलमान खान) माझ्याकडे आला आणि शिवीगाळ करत म्हणाला की, मी टॉप अभिनेता झाल्यावर तुझ्यासोबत काम करणार नाही.’ सरोज खान या अंदाज अपना अपना मध्‍ये कोरिओग्राफर होत्या आणि गाण्‍याच्‍या शूटिंगच्‍या वेळी सरोज खान आमिर खानला सर्व चांगल्या स्टेप्स देत आहेत. आवळ णि आपल्या गळ्यात ड्रम लटकत आहे, असे सलमानला वाटले होते. त्यामुळेच सलमानला सरोज खान यांचा राग आला होता.

काय म्हणाल्या सरोज खान ?

त्यावरून सलमान खान आणि सरोज खान यांच्यात वादावादी झाली असता डायरेक्टरने जे सांगितले, तेच (काम) मी करत आहे, असे सरोज खान यांनी स्पष्ट केले. तुला वाईट वाटलं असेल तर ठीक आहे. तू माझ्या सोबत काम करणार नसशील तर काहीच हरकत नाही. रोटी अल्लाह देता है, तू नहीं. (जेवण, काम हे देव देतो, तू नव्हेस) असे त्यांनी सलमान खानला सुनावले होते. हे ऐकून सलमान खान सरोज खानवर इतका चिडला होता की त्याने पुन्हा कधीच सरोज खानसोबत काम केले नाही.

पण, कारकिर्दीच्या उत्तरार्धात सरोज खान यांना जेव्हा कोणत्याही चित्रपटात काम मिळत नव्हते, तेव्हा सलमान खान हा एकमेव स्टार होता ज्याने सरोज खान यांना मदत केली होती. आणि याचा उल्लेख खुद्द सरोज खान यांनीच एका मुलाखतीत केला होता.

Non Stop LIVE Update
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.