AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nana Patekar : नाना पाटेकरांची ती मदत शाहरुख खान आजही विसरू शकणार नाही; काय होता तुरुंगातील किस्सा?

नाना पाटेकर यांच्या निधनानंतर अभिनेता शाहरुख खानची एक क्लिप प्रचंड व्हायरल झाली आहे. एकदा त्याला जेलमध्ये जाव लागलं, तेव्हा नाना यांनीच आपल्याला तिथून बाहेर काढल्याचं शाहरुखने त्यात सांगितलं. पण तो तुरूंगात का गेला, नेमकं काय घडलं होतं ?

Nana Patekar : नाना पाटेकरांची ती मदत शाहरुख खान आजही विसरू शकणार नाही; काय होता तुरुंगातील किस्सा?
Image Credit source: TV9 Marathi
| Updated on: Oct 09, 2026 | 9:03 PM
Share

बॉलीवूडचे प्रसिद्ध कलाकार नाना पाटेकर ( Nana Patekar) आता या जगात नाहीत. काल, गुरूवात 8 ऑक्टोबरच्या पहाटे त्यांचं निधन झाले. 75 व्या वर्षी त्यांनी गोव्यातील घरात अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या अकस्मात निधनामुळे संपूर्ण इंडस्ट्री आणि देशात शोककळा पसरली. नानांनी त्यांच्या अभिनयाने त्यांच्या लाखो चाहत्यांचे मनोरंजन केले. वैयक्तिकदृष्ट्या ते आता आपल्यात नसले तरीही त्यांचे चित्रपट, समाजकार्य, त्यांची कला या माध्यमातून ते नेहमी आपल्यात जिवंत राहतील.

मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्ट्तील दिग्गज अभिनेते असलेले नाना पाटेकर यांचा इंडस्ट्रीतील अनेक कलाकार आदर करतात. सुपरस्टार शाहरुख खानही (Shah Rukh Khan) त्यांच्यापैकी एक आहे. करिअरच्या सुरुवातीच्या काळात शाहरुखने नानांसोबत काम केलं होतं. नानांकडून त्याला अभिनयासोबतच आयुष्यातील महत्त्वाचे धडेही शिकायला मिळाले. एका जुन्या व्हिडिओमध्ये शाहरुखने नाना पाटेकर यांच्याशी संबंधित एक खास आठवण सांगितली होती. या प्रसंगात नानांनी त्याला कठीण परिस्थितीत मदत केल्याचं त्याने नमूद केलं होतं.

जेव्हा नानांनी केली शाहरुख खानची मदत

या व्हिडिओमध्ये शाहरुख खानने आपल्या आयुष्यातील एका जुन्या प्रसंगाचा खुलासा केला होता. एका मासिकात शाहरुख आणि त्याच्या एका को-स्टारच्या अफेअरविषयी विनोदी स्वरूपात बातमी प्रसिद्ध झाली होती. त्यावेळी शाहरुख आणि गौरी खान यांचं नुकतेच लग्न झाले होते. ही बातमी वाचून गौरीला खूप वाईट वाटलं होतं, आणि ते पाहून शाहरुख संतापला होता. शाहरुखने संबंधित पत्रकाराला फोन करून या बातमीबाबत जाब विचारला. तेव्हाय, त्या पत्रकाराने ही बातमी केवळ एक विनोद असल्याचे स्पष्ट केले. मात्र, त्याचे उत्तर ऐकून शाहरुखचा राग आणखी वाढला. नंतर शाहरुखने स्वतःही कबूल केले होते की, त्या वेळी त्याचं वागणं योग्य नव्हतं. हा वाद इतका वाढला की पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आणि शाहरुखला लॉकअपमध्ये जावं लागलं.

लॉकअपमधूनही पत्रकाराला केला फोन

या वादाचे रूपांतर गंभीर प्रकरणात झाले आणि शाहरुखला पोलिसांनी ताब्यात घेतले. लॉकअपमध्ये असताना त्याला फोन करण्याची संधी मिळाली. मात्र, कुटुंबीयांना किंवा वकिलांना संपर्क करण्याऐवजी त्याने पुन्हा त्याच पत्रकाराला फोन केला. या वेळीही त्याने पत्रकाराला धमकी दिली होती. मात्र, त्यानंतर शाहरुखला जामीन मिळाला. या संपूर्ण प्रकरणात नाना पाटेकर यांनी त्याला मदत केल्याचं शाहरुखने आपल्या आठवणीत सांगितलं. नानांनी दाखवलेल्या माणुसकीबद्दल त्याने त्यांचे आभार मानले आणि ते अतिशय चांगल्या स्वभावाचे असल्याचं नमूद केलं होतं.

या प्रसंगानंतर शाहरुख खानने स्वतःच्या स्वभावात बदल करण्याचा प्रयत्न केला. रागाच्या भरात लगेच प्रतिक्रिया देण्याची आपली सवय चुकीची असल्याची जाणीव त्याला झाली. कालांतराने त्याने आपल्या रागावर नियंत्रण ठेवायला आणि परिस्थिती अधिक समजूतदारपणे हाताळायला शिकल्याचेही त्याने सांगितलं.

Follow Us
मोदीजी, बीपी चेक करत राहा; अभिजीत दीपकेंचा पंतप्रधानांना टोला
Abhijeet Dipke : मोदीजी, बीपी चेक करत राहा; अभिजीत दीपकेंचा पंतप्रधानांना टोला, मेट्रो-रेल्वे बंदीवरून सरकारवर निशाणा
रेल्वे, मेट्रो बंदच्या निर्णयाविरोधात कोर्टात सुनावणी; कोर्टाने....
CJP Protest : सीजेपीचं उद्या दिल्लीत आंदोलन, रेल्वे, मेट्रो बंदच्या निर्णयाविरोधात कोर्टात सुनावणी; कोर्टाने केंद्राला काय सांगितलं?
गजानन कीर्तिकर ठाकरेंच्या सेनेत घरवापसी करणार? स्वतःच केला मोठा खुलासा
Gajanan Kirtikar : Shivsena : गजानन कीर्तिकर ठाकरेंच्या सेनेत घरवापसी करणार? स्वतःच केला मोठा खुलासा, म्हणाले...
एवढीच भीती वाटते तर...; दिल्लीतील बंदोबस्तावर दीपकेंचा सरकारला टोला
Abhijeet Dipake : एवढीच भीती वाटते तर...; दिल्लीतील बंदोबस्तावर अभिजित दीपकेंचा सरकारला टोला
ठाकरे की शिंदे? शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा फैसला लवकरच....
Shivsena : ठाकरे की शिंदे? शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा फैसला लवकरच, सर्वोच्च न्यायालयाकडून तारीख जाहिर
गाढव म्हणताय? आता ऐका माझं उत्तर; विवेकानंद पाटलांचा बण यांच्यावर....
Vivekanand Patil : गाढव म्हणताय? आता ऐका माझं उत्तर; विवेकानंद पाटलांचा नवनाथ बण यांच्यावर पलटवार, फडणवीसांनाही केलं आवाहन
CJP आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत मोठे बदल, व्हिडिओ बघाच
CJP Delhi Andolan : CJP आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत मोठे बदल, व्हिडिओ बघाच
दिल्लीतील इंडिया आघाडीच्या आंदोलनाकडे ठाकरे सेनेची पाठ?
Thackeray Group On Delhi Andolan : दिल्लीतील इंडिया आघाडीच्या आंदोलनाकडे ठाकरे सेनेची पाठ? राष्ट्रपतींच्या भेटीवेळीही प्रतिनिधी....
सहन होत नाही आणि सांगता येत नाही... एमपीएससी आंदोलनावरून राऊतांनी...
Sanjay Raut : सहन होत नाही आणि सांगता येत नाही... एमपीएससी आंदोलनावरून संजय राऊतांनी सरकारला घेरलं
SIR मुद्द्यावरून फडणवीसांचा काँग्रेसवर पलटवार; सिब्बलांचा जुना व्हिडिओ
Devendra Fadnavis : SIR मुद्द्यावरून फडणवीसांचा काँग्रेसवर पलटवार; कपिल सिब्बलांचा जुना व्हिडिओ शेअर करत म्हणाले...