प्ले स्टोरवर नाही दिसणार Ullu , Altt ॲप, पण इथून कंटेंट हटवणं कठीण?

उल्लू आणि एएलटीटी सारखे ॲप प्ले स्टोअरवरून काढून टाकले आहेत. त्यांचा कंटेंट आता कुठे उपलब्ध असेल ते जाणून घ्या, ते व्हीपीएन किंवा इंस्टाग्रामद्वारे अॅक्सेस करता येईल का? सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या...

प्ले स्टोरवर नाही दिसणार Ullu , Altt ॲप, पण इथून कंटेंट हटवणं कठीण?
फाईल फोटो
| Updated on: Jul 26, 2025 | 1:15 PM

सरकारने अश्लीलता परसवणाऱ्या 25 ॲप्सवर बंदी घातली आहे. यामध्ये सर्वात प्रसिद्ध ॲप Ullu, ALTT यांसारख्या नावांचा समावेश आहे. अश्लीलता परसवणारे ॲप लवकरच Google Play Store आणि Apple App Store मधून हटवले जाणार आहेत. Ullu , Altt ॲप येथील येथील कंटेंट हटवल्यानंतर कुठे पाहता येईल असा प्रश्न देखील अनेकांना पडला आहे. Ullu , Altt ॲप हटवण्याचा निर्णय घेतल्यामुळे सर्वत्र चर्चांना उधाण आलं आहे.

बंदी का लादण्यात आली?

हे ॲप्स अश्लील आणि आक्षेपार्ह वेब सिरीज आणि व्हिडिओ कंटेंट दाखवत होते. ते आयटी कायदा 2000, आयटी नियम 2021 आणि माहिती आणि प्रसारण कायद्यांचे उल्लंघन करत होते. या प्लॅटफॉर्मवरील कंटेंटचकोणतंही निरीक्षण किंवा सेन्सॉरशिप नव्हती. ॲप्स हटवण्याचा अर्थ असा होतो की, फोनमध्ये तुम्ही ॲप्स इंस्टॉल करु शकणार नाही. आधीच इंस्टॉल केलेले ॲप्सचं हळूहळू काम करणं थांबेल किंवा अपडेट केलं जाणार नाहीत. अ‍ॅप्ससाठी टेक्निकल सपोर्ट देखील बंद होऊ शकतो…

कुठे पाहता येणार कंटेंट?

VPN वर पाहता येईल कंटेंट? बहुतेक लोकांच्या मनात येणारा पहिला विचार म्हणजे VPN नेटवर्क. तांत्रिकदृष्ट्या पाहिलं तर हो, काही लोक VPN (व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क) द्वारे या अॅप्सच्या वेबसाइट्स किंवा ॲप्सपर्यंत पोहोचू शकतात. पण सरकारने पूर्णपण ॲप्सला ब्लॉक केलं तर, असं करणं कायद्याच्या विरोधात असेल. डिजिटल सायबर कायदा तज्ञांच्या मते, VPN द्वारे प्रतिबंधित सामग्रीमध्ये प्रवेश करणं धोकादायक असू शकतं.

इन्स्टाग्राम किंवा सोशल मीडियावर मिळेल कंटेंट?

Instagram, Telegram, Facebook यांसारख्या सोशल मीडियावर प्लॅटफॉर्मवर कंटेंटचे लहान व्हिडीओ पाहता येतील. पण पूर्ण कंटेंट सोशल मीडियावर पाहाता येणार नाही. सोशल मीडियावर शेअर होणाऱ्या क्लिप्स कधीकधी कॉपीराइट किंवा कायद्याच्या कक्षेत येतात. अशा परिस्थितीत सोशल मीडियावर उपलब्ध असलेल्या क्लिप्स देखील काढून टाकल्या जातील की नाही सांगणं कठीण आहे.

ALTT आणि Ullu ने काय सांगितलं?

आतापर्यंत या ॲप्सकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. परंतु हे शक्य आहे की या कंपन्या त्यांच्या प्लॅटफॉर्मचे रीब्रँडिंग करतील किंवा परदेशी सर्व्हरवर शिफ्ट होऊन त्यांची सामग्री सुरू ठेवतील.

या गोष्टीची घ्या विशेष काळजी…

जर तुम्ही VPN किंवा कोणत्याही थर्ड पार्टी अॅपद्वारे हे अॅप्स वापरण्याचा विचार करत असाल तर सावधगिरी बाळगा, ही पद्धत कायदेशीररित्या चुकीची असू शकतं. असं केल्यानं तुमच्या डिव्हाइसची सुरक्षा आणि वैयक्तिक डेटा धोक्यात येऊ शकतो. या अॅप्समध्ये मालवेअर किंवा डेटा लीक झाल्याच्या तक्रारी यापूर्वीही आल्या आहेत.