AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इतक्या घाणेरड्या पद्धतीने..; आमिर खानच्या भाचीचा व्हिडीओ चुकीच्या अँगलने शूट, कॅमेरामनवर भडकले नेटकरी

'डकैत' या चित्रपटाच्या ट्रेलर लाँच कार्यक्रमातील एका अभिनेत्रीचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकरी कॅमेरामनवर चिडले आहेत. अत्यंत घाणेरड्या पद्धतीने शूट केल्याचं नेटकरी म्हणत आहेत.

इतक्या घाणेरड्या पद्धतीने..; आमिर खानच्या भाचीचा व्हिडीओ चुकीच्या अँगलने शूट, कॅमेरामनवर भडकले नेटकरी
झैन मेरी खानImage Credit source: Instagram
| Updated on: Apr 07, 2026 | 9:39 AM
Share

मृणाल ठाकूर आणि अदिवी शेष यांच्या ‘डकैत’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. हा चित्रपट येत्या 10 एप्रिल रोजी देशभरात प्रदर्शित होणार आहे. परंतु त्यापूर्वी ट्रेलर लाँचच्या कार्यक्रमातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. अभिनेत्री झैन मेरी खानचा हा व्हिडीओ आहे. झैन ही आमिर खानची भाची आहे. ट्रेलर लाँचच्या कार्यक्रमात ती साडी नेसून आली होती. त्यावर तिने डीप नेक ब्लाऊज घातला होता. कार्यक्रमात मृणाल ठाकूर, अनुराग कश्यप आणि अतुल कुलकर्णी हे कलाकारसुद्धा उपस्थित होते. परंतु तिथल्या एका कॅमेरामनने झैनवर फोकस करून असा व्हिडीओ शूट केला, ज्यावरून आता नेटकरी त्याला ट्रोल करत आहेत. या व्हिडीओ क्लिपवर अनेकांनी राग व्यक्त केला आहे.

‘डकैत’चा ट्रेलर रविवारी 5 एप्रिल रोजी प्रदर्शित झाला. एकीकडे चित्रपटाचा ट्रेलर चर्चेत असताना कार्यक्रमातील एका व्हिडीओ क्लिपमध्ये झैन मेरी खान लगेचच ट्रेंडिंग टॉपिक बनली आहे. व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये झैन स्टेजवर बसलेली दिसत आहे. मात्र कॅमेराचा फोकस वारंवार तिच्या कपड्यांकडे होतोय. कॅमेरामन सतत झैनच्या डीप नेक ब्लाऊजवर झूम इन करून व्हिडीओ शूट करत असल्याचं नेटकऱ्यांच्या लक्षात आलं. यावरून अनेकांनी कॅमेरामनवर संताप व्यक्त केला.

पहा व्हिडीओ-

‘हा नीच कॅमेरामन पैसे कमावण्यासाठी अशा विचित्र अँगलने शूटिंग करत आहे’, असं एकाने लिहिलं. तर ‘अशा लोकांना कुठेच काम मिळायला नको’, असं दुसऱ्याने म्हटलंय. ‘त्या कॅमेरामनला अजिबात लाज नाही’, अशा शब्दांत नेटकऱ्यांनी राग व्यक्त केला आहे. तर काहींनी यात झैनचीही चूक असल्याचं म्हटलंय. ‘केवळ प्रसिद्धीसाठी अंगप्रदर्शन करणारे कपडे परिधान केले आहेत’, असं एका युजरने लिहिलं आहे. ट्रेलरपेक्षा सोशल मीडियावर झैनचीच अधिक चर्चा होत असल्याने हे सर्व प्रकाशझोतात येण्यासाठी केल्याची टीका काही नेटकरी करत आहेत.

झैन मेरी खान ही अभिनेता आणि दिग्दर्शक मन्सूर खानची मुलगी आहे. मन्सूर खान हा आमिर खानचा चुलत भाऊ आहे. त्याने ‘कयामत से कयामत तक’, ‘जो जीता वही सिकंदर’ आणि ‘अकेले हम अकेले तुम’ यांसारख्या सुपरहिट चित्रपटांचं दिग्दर्शन केलं आहे. आमिर खानची भाची झैन ही 31 वर्षांची असून तिचा जन्म 20 मार्च 1995 रोजी मुंबईत झाला.

Follow Us
साखरेची साठा मर्यादा निम्म्यावर, 15 सप्टेंबरपासून नवा नियम लागू
Sugar | साखर व्यापाऱ्यांना केंद्राचा मोठा झटका! साखरेची साठा मर्यादा निम्म्यावर, 15 सप्टेंबरपासून नवा नियम लागू
जरांगेंच्या भेटीला जिल्हाधिकारी-एसपी, पण तोडगा नाहीच; अधिकारी नको...
Manoj Jarange | जरांगेंच्या भेटीला जिल्हाधिकारी-एसपी, पण तोडगा नाहीच; अधिकारी नको, सरकारी शिष्टमंडळ पाठवा!
शाळकरी मुलांना आता वडापाव-समोसा बंद!; बबन वडापावने घेतला मोठा निर्णय!
FDA | शाळकरी मुलांना आता वडापाव-समोसा बंद!; FDAच्या आदेशानंतर अंबरनाथमधील बबन वडापावने घेतला मोठा निर्णय!
मृत्यू समोर दिसत होता... पण नववधूने ओढणी फेकली अन् दुचाकीस्वाराचा...
मृत्यू समोर दिसत होता... पण नववधूने ओढणी फेकली अन् दुचाकीस्वाराचा जीव वाचवला, व्हिडिओ बघाच!
सुप्रीम कोर्टातील सुनावणीआधी शिंदेंची मोठी प्रतिक्रिया; म्हणाले...
Eknath Shinde | सुप्रीम कोर्टातील सुनावणीआधी शिंदेंची मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, बाळासाहेबांना हे चिन्ह...
अपघाताच्या चौकशीबाबत सरकारकडून माहिती नाही; सुप्रिया सुळे यांचा संताप
अपघाताच्या चौकशीबाबत सरकारकडून माहिती नाही; सुप्रिया सुळे यांचा संताप
लक्ष्मण हाके यांचा सरकारला इशारा; ओबीसी काय करेल, हे आम्ही दाखवून देऊ
लक्ष्मण हाके यांचा सरकारला इशारा; ओबीसी काय करेल, हे आम्ही दाखवून देऊ...
शिवसेना पक्षचिन्हावर उद्या सुनावणी; एकनाथ शिंदे दिल्लीत दाखल
शिवसेना चिन्हाच्या सुनावणीपूर्वी एकनाथ शिंदे दिल्लीत; म्हणाले, धनुष्यबाण गोठवणे दुर्दैवी
अनावश्यक सोने खरेदी आणि परदेशी प्रवास टाळा, पंतप्रधान मोदींचे आवाहन
अनावश्यक सोने खरेदी आणि परदेशी प्रवास टाळा, पंतप्रधान मोदींचे आवाहन
नवी मुंबईत एक्सपायरी डेट बदलून खाद्यपदार्थांची विक्री
नवी मुंबईत एक्सपायरी डेट बदलून खाद्यपदार्थांची विक्री; एफडीए आणि गुन्हे शाखेची मोठी कारवाई