मी जिवंत असे पर्यंत तरी हे होऊ देणार नाही, श्रीदेवींच्या या प्रश्नावर का चिडले बोनी कपूर

श्रीदेवी यांच्या निधनानंतर ही त्यांच्या चाहत्यांच्या त्या आठवणीत आहेत. श्रीदेवी यांनी अनेक हिट चित्रपट केले आहेत. श्रीदेवी यांनी त्यांच्या अभिनयाने अनेकांच्या हृदयात स्थान मिळवले आहे. आता बोनी कपूर यांना जेव्हा श्रीदेवी यांच्याबाबत प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्यांनी काय उत्तर दिले जाणून घ्या.

मी जिवंत असे पर्यंत तरी हे होऊ देणार नाही, श्रीदेवींच्या या प्रश्नावर का चिडले बोनी कपूर
श्रीदेवी, बोनी कपूर
Follow us
| Updated on: Apr 03, 2024 | 5:18 PM

बोनी कपूर यांचा ‘मैदान’ हा चित्रपट रिलीज होणार आहे. या सिनेमात अजय देवगण हा मुख्य भूमिकेत आहे. सध्या या सिनेमाचे जोरदार प्रमोशन सुरु आहे. आता नुकताच बोनी कपूर यांना श्रीदेवीच्या बायोपिकबद्दल प्रश्न विचारण्यात आला. श्रीदेवी यांचा बायोपिक बनवावा, अशी चाहत्यांची इच्छा आहे असा प्रश्न विचारताच त्यानी याला नकार दिला. कदाचित हे उत्तर ऐकून श्री देवी यांच्या चाहत्यांना पण धक्का बसेल.

बोनी कपूर म्हणाले की, ‘श्रीदेवी अतिशय खाजगी व्यक्ती होती आणि तिचे आयुष्य खाजगी ठेवले पाहिजे. त्यामुळे तिच्यावर बायोपिक बनण्याची शक्यता नाही आणि मी जिवंत असेपर्यंत तरी असं होऊ देणार नाही.

राष्ट्रीय पुरस्कार

दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांनी आपल्या करिअरमध्ये अनेक उत्कृष्ट चित्रपट दिले आहेत. 2017 मध्ये प्रदर्शित झालेल्या मा या चित्रपटात त्या दिसल्या होत्या. या सिनेमातील श्रीदेवीच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले. ज्यासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला होता. मात्र, पुरस्कार मिळण्यापूर्वीच श्रीदेवी यांचे निधन झाले होते. श्रीदेवी यांच्या निधनामुळे नंतर बोनी कपूर, जान्हवी आणि खुशी यांना हा पुरस्कार स्वीकारला होता. 2018 साली प्रदर्शित झालेल्या झिरो चित्रपटात श्रीदेवी कॅमिओ करताना दिसल्या होत्या.

श्रीदेवी यांचे 2018 मध्ये निधन

24 फेब्रुवारी 2018 रोजी श्रीदेवी यांचे दुबईत निधन झाले होते. त्यांच्या निधनाच्या बातमीने चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. श्रीदेवी यांचे पार्थिव त्यानंतर भारतात आणण्यात आले होते आणि येथेच त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

बोनी कपूर यांनी श्रीदेवी यांच्यासोबत दुसरे लग्न केले होते. बोनी कपूर म्हणाले की, “मी माझ्या पहिल्या पत्नीशी प्रामाणिक होतो. लग्नाआधी श्रीही मोनासोबत घरी राहायची. त्यावेळी माझ्या आईने श्रीच्या हातात थाळी दिली आणि मला राखी बांधायला सांगितली होती. बोनी कपूर यांच्या श्रीदेवीबद्दल असलेल्या भावना त्यांना माहित होत्या. तेव्हा बोनी कपूर म्हणाले की, थाट ठेव. तुला काही करण्याची गरज नाही. कारण मोनाला माझ्या आणि श्रीबद्दल सगळं माहीत होतं, पण मी काहीच करू शकत नव्हतो. कारण आम्ही एकमेकांवर प्रेम करतो.”

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.