AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Lucky Ali : आवाजाच्या जादूने बॉलीवूड गाजवणारे गायक लकी अली तीन लग्न करूनही एकटे का पडले? वाचा सविस्तर

90 च्या दशकात लकी अलीचे नाव सर्वांच्याच तोंडात होते. आतापर्यंतची संपूर्ण कारकीर्द अप्रतिम राहिली आहे. पण त्यांचे वैयक्तिक आयुष्यही तितकेच संघर्ष आणि अडचणींनी भरलेले आहे.

Lucky Ali : आवाजाच्या जादूने बॉलीवूड गाजवणारे गायक लकी अली तीन लग्न करूनही एकटे का पडले? वाचा सविस्तर
Lucky AliImage Credit source: Instagram
| Updated on: Sep 19, 2022 | 11:08 AM
Share

गेल्या तीन दशकाहून अधिक काळ आपल्या आवाजाने लाखो लोकांच्या मनावर राज्य करणारा गायक लकी अली (Lucky Ali)आज वयाची 64  वर्षे पूर्ण करतोय. ज्याने बॉलीवूड इंडस्ट्रीला(Bollywood industry) एकापेक्षा एक हिट गाणी (Songs)दिली आहेत.  याच कारणामुळे 90 च्या दशकात या गायकाचे नाव सर्वांच्याच तोंडात होते. त्यांची आतापर्यंतची संपूर्ण कारकीर्द अप्रतिम राहिली आहे. पण त्यांचे वैयक्तिक आयुष्यही तितकेच संघर्ष आणि अडचणींनी भरलेले आहे. 19 सप्टेंबर 1958 रोजी मुंबईत जन्मलेल्या लकीचे खरे नाव मकसूद महमूद अली (Maqsood Mahmood Ali) आहे, त्याने आतापर्यंत तीन लग्ने केली पण यातील एकही लग्न टिकले नाही. यामुळे आज तो एकल आयुष्य जगत आहे.

अभिनेत्री मेघन जेन मॅकक्लेरीच्या प्रेमात पडली

लकी अलीच्या पहिल्या पत्नीचे नाव मेघन जेन आहे. मेघन जेन मॅकक्लेरी मूळची न्यूझीलंड येथील होती. दोघे वायएमसीएमध्ये शिकत असताना दोघांची भेट झाली. दरम्यान, लकीने एका अल्बमद्वारे गायक म्हणून इंडस्ट्रीत प्रवेश केला. या अल्बममध्ये मेघन अभिनेत्री-मॉडेल म्हणून दिसली होती. एकत्र काम करत असताना लकी अली आणि मेघना जवळ आले. एका मुलाखतीत लकी अलीने सांगितले की मेघन भारतात परतल्यानंतर पहिल्यादिवशी भेटलो दुसऱ्या दिवशी प्रपोज केले आणि तिसऱ्या दिवशी दोघांनी लग्न केले. मात्र हे लग्न फार काळ टिकलं नाही. काही काळानंतर दोघे वेगळे झाले.

अनाहिता पारशी दुसऱ्यांदा आयुष्यात आली

त्यानंतर लकी अलीच्या आयुष्यात अनहिता नावाची दुसरी महिला आली. अनाहिता ही पारशी महिला होती. दोघांनीही आपलं नातं गुपचूप सुरू केलं. त्यानंतर दोघांनी लग्न केले. अनाहिता आणि लकी यांना दोन मुले आहेत. मात्र, लकी अलीचे हे नातेही टिकले नाही. एका मुलाखतीत लकी अलीने सांगितले होते की, त्याने अनाहितासोबत बराच वेळ घालवला आहे. मी तिच्याशी  लग्न करेन असं कधीच वाटलं नव्हतं. पण ते घडलं.

लकी अलीसाठी बदलला धर्म

यानंतर लकी अलीच्या आयुष्यात माजी मिस इंडिया केट एलिझाबेथ हलम आली. 2009 मध्ये दोघांची भेट झाली आणि काही काळानंतर दोघांनी बंगळुरू कोर्टात लग्न केले. इतकेच नाही तर केटने आपला धर्म बदलून लकीसाठी अलीशा अली असे नवीन नाव ठेवले आहे. मात्र, या दोघांमधील नातंही टिकू शकले नाही. आज वयाच्या 64 ला लकी अली एकाकी आयुष्य जगत आहे

मला ताकदीची गरज नाही.. मुनगंटीवारांच्या वक्तव्यावर फडणवीस काय म्हणाले?
मला ताकदीची गरज नाही.. मुनगंटीवारांच्या वक्तव्यावर फडणवीस काय म्हणाले?.
काही गोष्टी बोलल्या नाही तर..पराभवानंतर नितेश राणे चव्हाणांच्या भेटीला
काही गोष्टी बोलल्या नाही तर..पराभवानंतर नितेश राणे चव्हाणांच्या भेटीला.
मुंबईत ठाकरेंचा उत्सव, दणक्यात युतीची घोषणा होणार, राऊतांकडून अपडेट
मुंबईत ठाकरेंचा उत्सव, दणक्यात युतीची घोषणा होणार, राऊतांकडून अपडेट.
शिंदेंचा माणूस पुण्याच्या दिशेने, भाजप-शिवसेनेत युती घडवण्यासाठी वेग
शिंदेंचा माणूस पुण्याच्या दिशेने, भाजप-शिवसेनेत युती घडवण्यासाठी वेग.
चर्चेसाठी वेळ द्या....कोण करतंय विनवणी? दादांच्या NCPची नाशकात हतबलता
चर्चेसाठी वेळ द्या....कोण करतंय विनवणी? दादांच्या NCPची नाशकात हतबलता.
सत्तार, हिंदू देव-देवता अन् मामू...दानवेंचा संजय शिरसाटांवर हल्लाबोल
सत्तार, हिंदू देव-देवता अन् मामू...दानवेंचा संजय शिरसाटांवर हल्लाबोल.
गळ्यात सोन्याचं कमळ,नगराध्यक्षा हेमलता सावजींच्या मंगळसूत्राची चर्चा
गळ्यात सोन्याचं कमळ,नगराध्यक्षा हेमलता सावजींच्या मंगळसूत्राची चर्चा.
मी सेलिब्रेशन केलं नाही...मालवणमधील विजयानंतर निलेश राणे काय म्हणाले?
मी सेलिब्रेशन केलं नाही...मालवणमधील विजयानंतर निलेश राणे काय म्हणाले?.
आईचा विजय लेकाला मोठा आनंद, प्रणिता भालके विजयी अन् शौर्यने थोपटले दंड
आईचा विजय लेकाला मोठा आनंद, प्रणिता भालके विजयी अन् शौर्यने थोपटले दंड.
कोकाटेंची आमदारकी वाचली, शिक्षेला स्थगिती मिळाल्यानं 'सर्वोच्च' दिलासा
कोकाटेंची आमदारकी वाचली, शिक्षेला स्थगिती मिळाल्यानं 'सर्वोच्च' दिलासा.