AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अमिताभ बच्चन यांची पत्नी किंवा कोणाची सासू म्हटल्यावर जया बच्चन का भडकतात? या फॅशन डिझायनर्सनी केला खुलासा

जया बच्चन या नेहमीच पापाराझींवर तसेच फोटो काढत असताना चाहत्यांवर सतत चिडचिड करताना दिसतात. अनेकदा त्यांना ट्रोलही केलं जातं. पण त्या इतका राग का करतात याबद्दल अनेकांना पश्न पडलेला आहे. याबद्दलचा खुलासा दोन प्रसिद्ध फॅशन डिझायनर्सनी केला आहे.

अमिताभ बच्चन यांची पत्नी किंवा कोणाची सासू म्हटल्यावर जया बच्चन का भडकतात? या फॅशन डिझायनर्सनी केला खुलासा
Why does Jaya Bachchan get angry when she is called Amitabh Bachchan wife or someone mother-in-law?Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 01, 2025 | 5:36 PM
Share

सोशल मीडियावर पापाराझींवर , चाहत्यांवर सेलिब्रिटी अनेकदा चिडताना दिसतात. पण त्यांच्यापैकी एक अभिनेत्री ज्यांचे व्हिडीओ सोशल मीडियावर कायमच चर्चेत असतात. त्या म्हणजे अभिनेत्री जया बच्चन. त्यांचे व्हिडीओ सोशल मीडियावर सतत व्हायरल होत असतात. कधी चाहत्यांवर ओरडतानाचे, तर कधी पापाराझींवरल रागवताना जया बच्चन दिसतात.

अमिताभ बच्चन यांची पत्नी किंवा ऐश्वर्याची सासू म्हटल्यावर जया यांना राग का येतो?

यासाठी त्यांना अनेकदा ट्रोल केले जाते आणि त्यांच्याबद्दल असंख्य मीम्स तयार केले जातात.सोशल मीडियावर त्यांच्यावर नेहमीच टीका होताना दिसते. तसेच जया बच्चन या नेहमीच रागात का असतात असही नेटकरी विचारताना दिसतात. एवढंच नाही तर जया बच्चन यांना कोणी जया बच्चन न म्हणता जर कोणी अमिताभ बच्चन यांची पत्नी किंवा ऐश्वर्याची सासू म्हणून उल्लेख केला तरी त्यांना राग येतो. पण यामगील कारण काय आहे? याचा खुलासा डिझायनर्स अबू जानी आणि संदीप खोसला यांनी केला आहे.

जया बच्चन यांच्याबद्दल मीडियाचे किंवा लोकांचे बरेच गैरसमज आहेत.

त्यांनी म्हटलं आहे की जया बच्चन यांच्याबद्दल मीडियाचे किंवा लोकांचे बरेच गैरसमज आहेत. अबू जानी आणि संदीप या दोघांनीही जया यांच्यासोबत बराच काळ काम केले आहे आणि त्यांना जयीबच्चनबद्दल बरेच काही माहित आहे. त्यांनी स्पष्ट केले की जयाला कोणाची पत्नी किंवा सासू म्हणवून घेणे आवडत नाही. तिला एक व्यक्ती म्हणून ओळखले जाणे आवडते.

जर तुम्ही त्यांच्याशी प्रामाणिकपणे बोललात तर….

एका मुलाखतीत अबू जानी आणि संदीप खोसला यांनी जया बच्चनबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. त्या नेहमीच पापाराझींसमोर असे काही बोलतात किंवा करतात की ज्यामुळे त्या अनेकदा चर्चेत येतात. याबद्दल ते म्हणाले, “त्या खूप मीडिया-फ्रेंडली आहे.” ते पुढे म्हणाले, “आमच्यासाठी, त्या एक मार्गदर्शक आहे… लोक खूप निर्णय घेणारे असतात आणि ती अशी व्यक्ती आहे जी तिच्या स्वतःच्या स्पेसमध्ये राहणे पसंत करते. तिला अजिबात कोणी तिच्या मागे मागे राहणे आवडत नाही. जर तुम्ही त्यांच्याशी प्रामाणिकपणे बोललात तर त्या तुमच्याशी बोलण्यास खूप आनंदी असतील. पण जर तुम्ही त्यांच्याशी ती कोणाची आई आहे, कोणाची सासू आहे किंवा कोणाची पत्नी म्हणून बोलत असाल तर त्याबाबत त्यांचा दृष्टिकोन वेगळा असेल.”

जया म्हणतात ,” माझ्याशी जयासारखे बोलायचे असेल तर…”

अधिक माहिती देताना अबू जानी आणि संदीप खोसला म्हणाले, “त्यांना लोकांना स्पष्ट सांगायचे आहे की, ‘जर तुम्हाला माझ्याशी अमिताभ बच्चन यांची पत्नीम्हणून काही प्रश्न विचारायचे असतील तर तशाच पद्धतीचे प्रश्न विचारा. पण जर तुम्हाला माझ्याशी जयासारखे बोलायचे असेल तर माझ्याशी जयासारखेच बोला. जर तुम्हाला माझ्या आयुष्यातील इतर लोकांबद्दल जाणून घ्यायचे असेल तर माझ्याशी जयासारखे बोलू नका.’ असं त्यांचं म्हणणं असतं.”

त्यांच्याभोवती येऊन फोटो काढणे आवडत नाही

जया बच्चनशी असलेल्या त्याच्या नात्याबद्दल पुढे बोलताना अबू जानी आणि संदीप म्हणाले, “त्या खूप साध्या आहेत आणि त्यांना लोक त्यांच्याभोवती येऊन फोटो काढणे आवडत नाही.जर जया तुमच्याशी मैत्री करत असेल किंवा तुमच्यावर विश्वास ठेवत असेल, तर कोणीही तिचा विचार बदलू शकत नाही.” अबू आणि संदीप म्हणाले की जया जेव्हा जेव्हा काही चांगले करतात तेव्हा त्यांना प्रोत्साहन देतात. त्या नेहमी म्हणतात, “मी त्या दिवशी मान्य करेल की तुम्ही यशस्वी आहात ज्या दिवशी तुमच्याकडे तुमचे स्वतःचे खाजगी जेट असेल.” तर अशा पद्धतीने जया बच्चन यांच्या रागाबद्दल किंवा त्यांच्या ओरडण्याबद्दल मीडियामध्ये अनेक गैरसमज असल्याचं अबू जानी आणि संदीप खोसला यांनी म्हटलं आहे.

'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.