मित्रासाठी अभिनेत्याची मंदिरात पूजा; पावती लीक होताच धर्मावरून मोठा वाद, काय आहे संपूर्ण प्रकरण?

मल्याळम चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते मोहनलाल यांनी मित्र मम्मूटी यांच्यासाठी शबरीमला मंदिरात प्रार्थना केल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. मोहनलाल यांच्या पूजेची पावती सोशल मीडियावर लीक झाली आहे. हा वाद नेमका काय आहे, त्याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात..

मित्रासाठी अभिनेत्याची मंदिरात पूजा; पावती लीक होताच धर्मावरून मोठा वाद, काय आहे संपूर्ण प्रकरण?
Mohanlal and Mammootty
Image Credit source: Instagram
| Updated on: Mar 28, 2025 | 11:53 AM

आपल्या एका मित्रासाठी मंदिरात प्रार्थना केल्यामुळे वाद होऊ शकतो का, असा प्रश्न सहसा सर्वसामान्यांना पडणार नाही. पण हाच प्रश्न दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील एका सुपरस्टारला पडला आहे. या सुपरस्टारचा चाहतावर्ग केवळ दक्षिणेतच नाही तर संपूर्ण भारतात आणि भारताबाहेरही आहे. मोहनलाल असं त्यांचं नाव आहे. मल्याळम चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते मोहनलाल यांनी नुकतंच त्यांचा खास मित्र आणि अभिनेता मम्मूटी यांच्यासाठी शबरीमला मंदिरात प्रार्थना केली. परंतु याच प्रार्थनेवरून नवा वाद निर्माण झाला आहे. मोहनलाल यांनी मम्मूटी यांच्यासाठी शबरीमला मंदिरात ‘उषा पूजा’ केली होती. यावरून काही लोक मोहनलाल यांच्यावर टीका करत आहेत, कारण मम्मूटी मुस्लीम आहेत. मम्मूटी यांचा धर्म त्यांना अल्लाशिवाय दुसरीकडे कुठेच प्रार्थना करण्याची परवानगी देत नाही, असं टीकाकारांचं म्हणणं आहे. परंतु अनेकांनी या दोघांच्या मैत्रीचंही कौतुक केलंय. प्रसिद्ध गीतकार आणि लेखक जावेद अख्तर यांनी मोहनलाल आणि मम्मूटी यांच्या मैत्रीचं कौतुक करत टीकाकारांच्या मानसिकतेवर निशाणा साधला...

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी TV9 अ‍ॅप डाऊनलोड करा

एक्सक्लुसिव्ह बातम्यांचे अनलिमिटेड अ‍ॅक्सेस टीव्ही9 अ‍ॅपवर सुरू ठेवा