झहीर इक्बाल सोबत लग्नानंतर सोनाक्षी सिन्हा धर्म बदलणार का? महत्त्वाची माहिती आली समोर
सोनाक्षी सिन्हा लवकरच लग्न बंधनात अडकणार आहे. तिने तिचा बॉयफ्रेंड जहीर इक्बाल सोबत विवाह करण्याचा निर्णय घेतला आहे. या लग्नावरुन सोनाक्षीच्या कुटुंबात मतभेद असल्याचं पुढे आलं होतं. आता सोनाक्षी धर्म बदलणार का याबाबत तिच्या होणाऱ्या सासऱ्यांनी स्पष्ट सांगितले आहे.

सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल 23 जून रोजी लग्न करणार आहेत. त्यांचा विवाह हा झहीर इक्बालच्या घरीच होणार आहे. दोघेही रजिस्टर मॅरेज करणार आहेत. ज्यामध्ये दोन्ही कुटुंबातील लोकं उपस्थित राहणार आहेत. सोनाक्षी आणि झहीरच्या लग्नाबाबत सिन्हा कुटुंबिय नाराज असल्याची देखील चर्चा सुरु आहे. सोनाक्षीची आई आणि भाऊ सोनाक्षीच्या या निर्णय़ावर नाराज असल्याची माहिती पुढे आली आहे. सोनाक्षीचे वडील शत्रुघ्न सिन्हा यांनी मात्र झहीर इक्बालच्या घरी जाऊन त्याची भेट घेतल्यानंतर ते या लग्नासाठी तयार झाल्याचं बोललं जात आहे. पण दुसरीकडे सोनाक्षीच्या या लग्नाच्या निर्णय़ावर सोशल मीडियावर अनेक जण तिला ट्रोल देखील करत आहे. हा आपला वैयक्तिक निर्णय असल्याचं सोनाक्षीने म्हटलं होतं. आता लग्नानंतर सोनाक्षी इस्लाम धर्म स्वीकारणार असल्याचे बोलले जात होते.
सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांच्या लग्नाच्या बातम्या बऱ्याच दिवसांपासून येत आहेत. मात्र कुटुंबाकडून काहीही दुजोरा देण्यात आला नव्हता. या लग्नावरून कुटुंबात मतभेद असल्याचे देखील पुढे आले होते. शत्रुघ्न सिन्हा यांनी एका मुलाखतीत स्पष्ट केले की कुटुंबात काही मतभेद होते पण आता ठीक आहे आणि सर्वजण लग्नाला उपस्थित राहतील.
सोनाक्षीचे होणारे सासरे काय म्हणाले
झहीर इक्बालच्या वडिलांनी सोनाक्षी सिन्हासोबत मुलाच्या लग्नाबद्दल सांगितले की, ‘यात हिंदू किंवा मुस्लिम प्रथा नसतील. हे एक सिव्हिल विवाह असेल. सोनाक्षीचे होणारे सासरे म्हणजेच झहीर इक्बालचे वडील इक्बाल रतनसी यांनी लग्न कोणत्या प्रकारे होणार आणि सोनाक्षी इस्लाम का स्वीकारणार नाही याबाबत देखील त्यांनी खुलासा केलाय.
लग्नानंतर सोनाक्षी धर्म बदलणार का?
सोनाक्षीने लग्नानंतर इस्लाम धर्म स्वीकारणार असल्याच्या वृत्तावर झहीर इक्बालच्या वडिलांनी सांगितले की, ‘ती धर्मांतर करणार नाही आणि हे निश्चित आहे. हे अंतःकरणाचे मिलन आहे आणि त्यात धर्माची भूमिका नाही. माझा मानवतेवर विश्वास आहे. हिंदू देवाला देव म्हणतात आणि मुस्लिम देवाला अल्ला म्हणतात. पण शेवटी, आपण सर्व मानव आहोत. माझे आशीर्वाद झहीर आणि सोनाक्षीला आहेत.
सोनाक्षी आणि झहीर इक्बाल यांचा नुकताच हळदी आणि मेहंदी समारंभ झाला, ज्याचे फोटो सोशल मीडियावर समोर आले. हे सेलिब्रिटी स्टायलिस्ट सनम रतनसीचे मित्र जफर अली मुन्शी यांनी शेअर केले आहेत. सनम रतनसी ही झहीर इक्बालची बहीण आहे. जहीर इक्बालने सेलिब्रेशनचा एक फोटो शेअर करत लिहिले की, मी खूप उत्साहित आहे आणि शेवटी सोना अधिकृतपणे बँडस्टँड इमारतीच्या ए क्लॅनमध्ये आली आहे. झहीर इक्बालच्या घराचा हा पत्ता आहे.
सोनाक्षीचे घरही उजळून निघाले असून नातेवाईकही यायला लागले आहेत. शत्रुघ्न सिन्हा यांचा भाऊही आपल्या भाचीच्या लग्नात सहभागी होण्यासाठी अमेरिकेहून येत आहे. रॅपर आणि गायक यो यो हनी सिंग व्यतिरिक्त, अभिनेत्री पूनम ढिल्लन आणि सलमान खान देखील लग्नाला उपस्थित राहणार आहेत. 23 जून रोजी संध्याकाळी शिल्पा शेट्टीच्या बास्टियन रेस्टॉरंटमध्ये लग्नाचे रिसेप्शन होणार आहे.
