मला लग्नाशिवाय प्रेग्नंट… तनुश्री दत्ता डिसेंबरमध्ये लग्न करणार? साध्वीने केलेलं भाकित तनुश्रीने स्वत:च सांगितलं

अभिनेत्री तनुश्री दत्ता नक्कीच काहीना काही कारणाने चर्चेत असते. ती आता पुन्हा एकदा एका वक्तव्यामुळे चर्चेत आली आहे. तिच्या लग्नाबद्दल आणि तिच्या प्रेग्नंसीबद्दल एक 90 वर्षाच्या साध्वीने केलेलं भाकित ऐकून तनुश्रीला धक्काच बसला. तिने याबद्दल स्वत:च एका मुलाखतीत सांगितलं आहे.

मला लग्नाशिवाय प्रेग्नंट... तनुश्री दत्ता डिसेंबरमध्ये लग्न करणार? साध्वीने केलेलं भाकित तनुश्रीने स्वत:च सांगितलं
Will Tanushree Dutta get married in December
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 23, 2025 | 6:26 PM

बॉलिवूडची बोल्ड अभिनेत्री तनुश्री दत्ता कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. ती तिच्या चित्रपटांपेक्षाही जास्त तिच्या वैयक्तिक आयुष्यासाठी जास्त चर्चेत असते. बऱ्याच काळापासून चित्रपटांपासून दूर आहे, पण ती कधीही चर्चेतून दूर राहिली नाही. “आशिक बनाया आपने” गाणं असो किंवा मग नाना पाटेकरांसोबतचे वाद असोत. तनुश्री नेहमीच यामुळे चर्चेत राहिली आहे. दरम्यान आता तनुश्री पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. ते तिने केलेल्या एका विधानामुळे.

90 वर्षांच्या साध्वीने नक्की काय सांगितलं?

तनुश्रीने लग्नाबद्दल आणि आई होण्याच्या इच्छेबद्दल उघडपणे चर्चा केली आहे. अलिकडच्या एका मुलाखतीत तनुश्री दत्ताने खुलासा केला की तिला लवकरच लग्न करायचं आहे आणि लग्नासोबतच तिला मुलगाही होणार आहे. यामागील नेमकं सत्य काय आहे याचं स्पष्टिकरण तिने स्वत:चं दिलं आहे. तनुश्रीने खुलासा केला की, माँ कामाख्या देवीच्या दर्शनादरम्यान तिला 90 वर्षांची एक साध्वी भेटल्या ज्या गेल्या 40 वर्षांपासून माँ ताराची पूजा करत आहेत. जेव्हा तनुश्रीने त्यांच्याकडे आशीर्वाद मागितला तेव्हा साध्वी म्हणाल्या, “तुम्हाला मुलगा होईल.” हे ऐकून तनुश्री हसली आणि म्हणाली, “आधी मला लग्नाचे आशीर्वाद दे, कारण जर लग्नाशिवाय काही घडले तर ते खूप कठीण होईल.” साध्वी हसल्या आणि म्हणाल्या “बरं, तू अजून लग्न केलेलं नाहीस? ठीक आहे, तू डिसेंबरमध्ये लग्न करशील.” तथापि, त्यांनी कोणत्या डिसेंबरमध्ये याचा मात्र उल्लेख केलेला नाही.


“तुझ्याभोवती एक आत्मा आहे”

त्यानंतर तनुश्रीने शिर्डीतील साई बाबा मंदिराला भेट दिली. तिथे एका ख्रिश्चन टॅरो कार्ड रीडरशी जेव्हा तिची भेट झाली तेव्हा तिने म्हटलं की, “तुझ्याभोवती एक आत्मा आहे, जो मुलाच्या रूपात दिसत आहे. तू गर्भवती आहेस का?” दोन्ही ठिकाणी तीच गोष्ट ऐकल्यामुळे तनुश्रीला धक्का बसला.

“मला लग्नाशिवाय प्रेग्नंट राहून…”

तनुश्रीने स्पष्टपणे सांगितले आहे की तिला सध्या कोणत्याही नात्यात राहायचे नाही. तिला वाटते की ती फक्त अशा व्यक्तीसोबतच नात्यात राहील जी लग्नासाठी पूर्णपणे तयार असेल. ती म्हणाली, “मला लग्नाशिवाय प्रेग्नंट राहून मला अडचणीत वाढवायच्या नाहीयेत. आधी लग्न मग नंतर बाकी सर्व काही.” असं म्हणत तनुश्रीने स्पष्ट केलं की तिला लग्न करायचं आहे. त्याची ती आतुरतेने वाट पाहत आहे.