AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तनुश्री दत्ताकडून बॉलिवूड माफियांची पोलखोल; म्हणाली, आमच्या फार्महाऊसवर आल्याशिवाय तू…

Bollywood Actress Tanushree Dutta: बॉलिवूडमध्ये अभिनेत्रींना कसं मिळतं यश? तनुश्री दत्ताने केली बॉलिवूड माफियांची पोलखोल, म्हणाली, 'आमच्या फार्महाऊसवर आल्याशिवाय तू..., आणि...', सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अभिनेत्रीच्या वक्तव्याची चर्चा...

तनुश्री दत्ताकडून बॉलिवूड माफियांची पोलखोल; म्हणाली, आमच्या फार्महाऊसवर आल्याशिवाय तू...
फाईल फोटो
| Updated on: Sep 19, 2025 | 1:13 PM
Share

Bollywood Actress Tanushree Dutta: ‘आशिक बनाया आपने’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री तनुश्री दत्ताने अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. पण आता तनुश्री तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे कमी पण खासगी आयुष्यामुळे अधिक चर्चेत असते. अभिनेत्री कायम बॉलिवूडचं काळं सत्य सांगताना दिसते. आता देखील अभिनेत्रीने बॉलिवूड माफियांबद्दल धक्कादायक खुलासा केला आहे. आता तनुश्री हिने बॉलिवूड माफियांवर संताप व्यक्त केला आहे.

नुकताच झालेल्या एका मुलाखतीत तनुश्री दत्ता हिने इंडस्ट्रीतील अनेक रहस्य उघड केली. अभिनेत्री म्हणाली, ‘आमचे तळवे चाटल्या शिवाय तुला यश मिळेल… आमच्या फार्महाऊसमध्ये आली नाही तरी कशी हिरोईन झालीस…, बॉलिवूडमध्ये हिरोईनचा दर्जा तुला कोणी दिला… आमच्या शिफारसीनुसार तुला हिरोईन कोणी केलं… ही गोष्ट त्यांना सहन होत नव्हती…’

अभिनेत्री पुढे म्हणाली, ‘अनेकांना माझं यश पाहिलं गेलं नाही. अभिनेता सुशांत सिंह राजपूत याचं यश कोणाला आवडलं नाही… हे सर्व काही फक्त बॉलिवूड माफियांसाठी आहे आणि तुमच्या बेकायदेशीर बापांसाठी आहे… ज्यांनी तुम्हाला दत्तक घेतलं आहे… आता अशी वेळ आली आाहे, त्यांनी त्यांच्या कर्माचा विचार केला पाहिजे…’, तनुश्री कायम बॉलिवूड सेलिब्रिटींवर निशाणा साधताना दिसते.

तनुश्री दत्त हिचे सिनेमे

तनुश्री दत्ता हिच्या सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेता इमरान हाश्मी याच्यासोबत ‘आशिक बनाया आपने’ सिनेमातून तनुश्री हिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. 2005 मध्ये सिनेमा प्रदर्शित झाला. त्यानंतर अभिनेत्रीने ’36 चायना टाऊन’, ‘भागम भाग’, ‘रिस्क’ आणि अन्य सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारली. त्यानंतर 2013 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘सुपर कॉप्स वर्सेस सुपर विलेंस’ मध्ये देखील अभिनेत्रीने काम केलं.

MeToo मोहिमेमुळे देखील तनुश्री चर्चेत आली. भिनेत्री तनुश्री दत्ता हिने 2018 मध्ये MeToo मोहिमेअंतर्गत दिग्गज अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर लैंगिक अत्याचाराचे आरोप केले होते. 2008 मध्ये ‘हॉर्न ओके प्लीज’ सिनेमाची शुटिंग सुरु असताना नाना पाटेकर यांनी लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला होता… असं वक्तव्य तनुश्री हिने केलं होतं. नाना पाटेकर यांच्यावर अभिनेत्रीने गंभीर आरोप केले होते.

वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.