Dashavatar: ‘दशावतार’चा बॉक्स ऑफिसवर बोलबाला, 10 कोटींच्या दिशेने सिनेमाची वाटचाल, कमाईत इतकी वाढ
Dashavatar: बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई करतोय 'दशावतार' सिनेमा, सिनेमाची 10 कोटींच्या दिशेने सिनेमाची वाटचाल, कमाईत इतकी वाढ... सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त 'दशावतार' सिनेमाची चर्चा...

Dashavatar Box Office Collection Day 7 : सुबोध खानोलकर दिग्दर्शित ‘दशावतार’ सिनेमाची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. बॉक्स ऑफिसवर देखील सिनेमा बक्कळ कमाई करताना दिसत आहे. सिनेमाचं सर्व शो हाऊसफुल ठरत आहेत. या मराठी थ्रिलर सिनेमाने चाहत्यांच्या मनावर आणि बॉक्स ऑफिसवर राज्य करताना दिसत आहे. सिनेमा लवकरच 10 कोटी रुपयांचा टप्पा पार करेल असं देखील सांगण्यात येत आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त ‘दशावतार’ सिनेमाची चर्चा रंगली आहे.
सिनेमाच्या सातव्या दिवसाच्या कमाईचे आकडे समोर आले आहे. सॅकनिल्क वेबसाइटच्या सुरुवातीच्या अंदाजानुसार, सिनेमाने सातव्या दिवशी सुमारे 1.20 कोटी रुपये कमावले. यामुळे भारतात दशावतार सिनेमाची एकूण कमाई 9.25 कोटी रुपये झाली आहे. त्यामुळे सिनेमा 10 कोटींचा टप्पा पार करेल असा देखील अंदाज वर्तवण्यात येत आहे. सर्वच स्तरातून सिनेमाचं कौतुक होत आहे.
सोशल मीडियावर देखील सध्या फक्त आणि फक्त दशावतार सिनेमाची चर्चा रंगली आहे. अशात शनिवार – रविवार असल्यामुळे येत्या काळात सिनेमा किती कोटींचा गल्ला जमवेल पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. अनेक सेलिब्रिटी देखील सिनेमा चित्रपटगृहात जावून पाहण्याची विनंती करत आहे.
सिनेमा ऑनलाईन झालाय लीक…
दिग्गज अभिनेते दिलीप प्रभावळकर यांनी साकारलेली भूमिका आणि कोकणातील परंपरेची झलक दाखवणारा सिनेमा ऑनलाईन लीक झाला आहे. बॉक्स ऑफिसवर सिनेमा तगडी कमाई करत असताना लिक झाल्यामुळे सिनेमाच्या टीमने चिंता व्यक्त केली आहे. एवढंच नाही तर, ऑनलाईन सिनेमा लिक करु नका… अशी विनंती देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून केली आहे.
सिनेमातील कलाकार
‘दशावतार’ सिनेमात दिलीप प्रभावळकर, महेश मांजरेकर, भरत जाधव, विजय केंकरे, सिद्धार्थ मेनन, प्रियदर्शिनी अशी कलाकारांची फौज या चित्रपटात आहे. थिएटरमध्ये ‘दशावतार’ चित्रपटाचे शोज हाऊसफुल्ल होत आहेत.
