हार्दिक पंड्यासोबतचा फोटो वादात, WWE सुपरस्टार रणवीरवर कायदेशीर कारवाई करणार?

रणवीरने भारत-पाकिस्तानच्या खेळाडूंची गळाभेटही घेतली. रणवीरने हार्दिक पंड्यासोबत शेअर केलेला सेल्फी वादात अडकला आहे.

हार्दिक पंड्यासोबतचा फोटो वादात, WWE सुपरस्टार रणवीरवर कायदेशीर कारवाई करणार?

मुंबई : बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह हा विश्वचषकात भारत-पाकिस्तान सामन्यादरम्यान भारताला सपोर्ट करताना दिसला. मैदानात मजा मस्ती करतानाच रणवीरने दिग्गज क्रिकेटर्ससोबत कॉमेंट्रीही केली. रणवीरने भारत-पाकिस्तानच्या खेळाडूंची गळाभेटही घेतली. रणवीरने हार्दिक पंड्यासोबत शेअर केलेला सेल्फी वादात अडकला आहे. हा फोटो शेअर करताना रणवीरने कॅप्शनमध्ये Eat. Sleep. Dominate. Repeat. The name is Hardik. Hardik Pandya असं लिहिलं.

मात्र रणवीरने दिलेलं हेच कॅप्शन आता त्याच्यासाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे. WWE सुपरस्टार ब्रॉक लेसनरचा वकील पॉल हेमॅनने त्याला आक्षेप घेतला आहे. पॉल हेमॅनने रणवीरच्या ट्विटला कोट करत तू मस्करी करत आहेस का? असं विचारत त्याने ब्रॉक लेसनरचं वाक्य “It’s Eat Sleep CONQUER Repeat.” सांगितलं.


नेमका आक्षेप काय?

रणवीरने पंड्यासोबतच्या फोटोला जे कॅप्शन दिलं आहे, तो WWE सुपरस्टार ब्रॉक लेसनरचा लोकप्रिय डायलॉग आहे. ब्रॉक लेसनर आल्यानंतर wwe च्या रिंगमध्ये Eat Sleep CONQUER Repeat हे ऐकायला मिळतं. त्यामुळे रणवीरने हे वाक्य उचलून कॉपी केल्याचा आरोप आहे, त्यामुळे ब्रॉक लेसनरच्या वकिलाने कॉपीराईटचा दावा केला आहे.

अर्थात रणवीरला लेसनरच्या वकिलाने अद्याप कोणतीही कायदेशीर नोटीस पाठवलेली नाही. त्यामुळे पॉल हेमॅनने खरोखरच रणवीरवर आक्षेप घेतला आहे की त्याने मस्करीत म्हटलं हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *