
Celebrity Break Up & Divorce 2025 : डिसेंबरचे 10 दिवस संपले , आता अवघ्या 20-21 दिवसांत हा महीना तर संपेलच पण 2025 हे वर्षही सरेल. जानेवारी 2026 उजाडेल तो नव्या संधी, उद्दिष्ट घेऊन पण सरत्या वर्षातील काही आठवणीही अशा आहेत ज्या विसरू म्हटल्या तरी विसरता येणार नाहीत. 20205 हे वर्ष फक्त बॉक्स ऑफीसच्या आकडेवारीसाठी नव्हे तर मनोरंजन क्षेत्रातील अनेक खळबळजनक ब्रेकअपसाठीही लक्षात राहील. फिल्म इंडस्ट्री ते टीव्ही, ओटीटी सह अनेक हाय-प्रोफाईल स्टार्सची जन्म-जन्मांतरीची नाती तुटली. यावर्षी अनेक सेलिब्रिटींनी त्यांचं ब्रेकअप, घटस्फोटाचा बातम्या चाहत्यासंह शेअर केल्या. 2025 मध्ये चर्चेत राहिलेल्या काही ब्रेकअप्सवर नजर टाकूया..
2025 या वर्षात सर्वात जास्त चर्चेत राहिलेले सेपरेशन होतं ते क्रिकेटर युजवेंद्र चहल आणि डिजिटल इन्फ्लुएन्सर धनश्री वर्मा या दोघांचं. अनेक महिन्याच्या चर्चा, अटकळी, अफवा यांच्यानंतर 2025 च्या सुरूवातीलाच दोघांचा अधिकृत घटस्पोट झाला. वेगळं झाल्यावर धनश्रीने मूव्ह ऑन करत करिअरवर फोकस करण्याचा निर्णय घेतला.
पलाश मुच्छल-स्मृति मानधना
भारतीय स्टार क्रिकेटपटू स्मृती मानधनाचे लग्नाच्या काही तास आधी संगीतकार पलाश मुच्छलशी ब्रेकअप झाले आणि ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. बराच काळ याबद्दल मौन बाळगल्यानंतर, हे लग्न मोडल्याचं आधी स्मृतीने नंतर पलआशने अधिकृतपणे जाहीर केलं. त्यांनी मूव्ह ऑनचा निर्णय घेतला.
तमन्ना-विजयचं ब्रेकअप
बॉलिवूडमधील स्टायलिश जोडपे, तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा यांनीही 2025 मध्ये त्यांचं नातं संपवलं. ते इंडस्ट्रीतील सर्वाधिक फॉलोअर्स असलेल्या जोडप्यांपैकी एक होते. विजयने तमन्नाला धोका दिल्याने ते दोघे वेगळे झाल्याचा दावा करण्यात आला. पण दोघांनाही यावर अद्याप मौन बाळगलं आहे.
सेलिना जेटली- पीटर हाग
बॉलिवूडची माजी अभिनेत्री सेलिना जेटली हिने अलीकडेच तिचा पती पीटर हागपासून घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे. तिने तिच्या पतीवर मारहाण, मानसिक छळ आणि मालमत्ता हडपल्याचा आरोप केला .
मीरा वासुदेवन-विपिन पुथियांकम
दक्षिण भारतीय (मल्याळम आणि तमिळ) अभिनेत्री मीरा वासुदेवन हिने नोव्हेंबर 2025 मध्ये तिचा तिसरा पती विपिन पुथियाकम याच्याशी झालेलं लग्न मोडल्याची पुष्टी केली. हा घटस्फोट मानसिकदृष्ट्या चॅलेंजिंग असल्याचं तिने म्हटलं होतं.
जी वी प्रकाश कुमार-सैंधवी
संगीतकार-अभिनेता जी.व्ही. प्रकाश कुमार आणि गायिका सैंधवी यांचे 12 वर्षांचे वैवाहिक जीवन, ते 2025 मध्ये संपुष्टात आले. 24 मार्च रोजी, या जोडप्याने चेन्नई कुटुंब न्यायालयात परस्पर संमतीने घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला.
शुभांगी अत्रे-पीयूष पूरी
‘भाभीजी घर पर हैं’ फेम अभिनेत्री शुभांगी अत्रे हिला फेब्रुवारी 2025मध्ये पियुष पुरीपासून घटस्फोट मिळाला. समेटाचे प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतर न्यायालयाने हा निकाल दिला.
संजीव सेठ आणि लता सभरवाल
‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेमुळे घरोघरी पोहोचलेल, प्रसिद्ध जोडपं संजीव सेठ आण लता सभरवाल यांनी जून 2025 मध्ये सोशल मीडियावर घटस्फोटाची अधिकृत घोषणा केली.
मुग्धा चाफेकर आणि रवीश देसाई
टीव्हीवरील आणखी एक प्रसिद्ध जोडपं असलेले, मुग्धा चाफेकर आणि रवीश देसाई यांनीही 2025 मध्ये त्यांचे नऊ वर्षांचे वैवाहिक जीवन संपुष्टात आल्याचे जाहीर केलं. हा घटस्फोट टीव्ही इंडस्ट्री तसेच दोघांच्या चाहत्यांसाठी मोठा धक्का होता.