Yo Yo Honey Singh: यो यो हनी सिंहचा बायकोसोबत संसार मोडला, अखेर एवढे कोटी रुपये तिला पोटगी देणार

मी गेल्या 15 वर्षांपासून इंडस्ट्रीत आहे आणि मी देशभरातील संगीतकार आणि कलाकारांसोबत काम केले आहे. माझ्या पत्नीशी माझे नाते कसे आहे हे सर्वांना माहीत आहे. माझ्या पत्नीशी माझे नाते कसे आहे, हे सर्वांना माहीत आहे. एका दशकाहून अधिक काळ ती माझ्या क्रूचा एक मोठा भाग होती.

Yo Yo Honey Singh: यो यो हनी सिंहचा बायकोसोबत संसार मोडला, अखेर एवढे कोटी रुपये तिला पोटगी देणार
Yo Yo Honey Sing
Image Credit source: Instagram
| Updated on: Sep 10, 2022 | 3:36 PM

पंजाबी गायक आणि रॅपर यो यो हनी सिंग (Yo Yo Honey Singh)आणि पत्नी शालिनी तलवार (Shalini Talwar) यांचा नुकताच घटस्फोट झाला आहे. दिल्लीच्या साकेत जिल्हा न्यायालयाच्या कौटुंबिक न्यायालयाने 8 सप्टेंबर रोजी या प्रकरणाची सुनावणी झाली. दिल्लीच्या साकेत न्यायालयाचे (Saket Court) न्यायाधीश विनोद कुमार यांच्या न्यायालयात ही सुनावणी झाली यादरम्यान हनी सिंगने शालिनी तलवार यांना पोटगी म्हणून सीलबंद कव्हरमध्ये एक कोटी रुपयांचा धनादेश दिला आहे. यो यो हनी सिंग आणि शालिनी तलवार यांच्यातील उलट-सुलट आरोपानंतर हे प्रकरण कोर्टात मिटले. त्यानंतर दोघांमध्ये 1 कोटींच्या पोटगीचा करार झाला आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 20 मार्च 2023 रोजी होणार आहे.

घरगुती हिंसाचाराचा आरोप

2021 मध्ये हनी सिंगवर घरगुती हिंसाचाराचा आरोप झाला होता. सोशल मीडियावर शालिनीने दावा केला होता, की हनीने तिचे शारीरिक आणि मानसिक शोषण केले होते. त्याचवेळी हनीने आ पैसे घेऊन फसवणूक केल्याचा दावा पत्नीने केला होता. हनी सिंगने हे सर्व आरोप खोटे असल्याचे सांगत फेटाळून लावले आहेत. शालिनीने दिल्लीतील तीस हजारी कोर्टात हनीविरोधात घरगुती हिंसाचाराचा खटला दाखल केला होता. यावर हनी सिंगनेहीआपले मौन सोडले आहे. त्याने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे की , ‘माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर झालेल्या गंभीर आरोपांमुळे मला खूप दु:ख झाले आहे. मी माझ्या गाण्यांच्या बोलांचा निषेध केला, त्याने तब्येतीच्या अफवांवर आणि मीडियाच्या नकारात्मक कव्हरेजवर कधीही विधान केले नाही. मात्र, या आरोपांसमोर गप्प बसणे मला योग्य वाटले नाही. हनी सिंग आणि शालिनी तलवार 20 वर्षे एकत्र होते. त्यांनी आपल्या निवेदनात पुढे म्हटले आहे.

“मी गेल्या 15 वर्षांपासून इंडस्ट्रीत आहे आणि मी देशभरातील संगीतकार आणि कलाकारांसोबत काम केले आहे. माझ्या पत्नीशी माझे नाते कसे आहे हे सर्वांना माहीत आहे. माझ्या पत्नीशी माझे नाते कसे आहे, हे सर्वांना माहीत आहे. एका दशकाहून अधिक काळ ती माझ्या क्रूचा एक मोठा भाग होती. ती माझ्यासोबत मीटिंग्ज, इव्हेंट्स आणि शूटिंगला जात असे मी हे सर्व आरोप फेटाळतो. माझा या देशाच्या न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे.