दिलीपकुमार यांचे धाकटे बंधू अस्लम खान यांचे निधन, 88 व्या वर्षी अखेरचा श्वास

अस्लम खान यांची कोव्हिड चाचणी पॉझिटिव्ह आल्याशिवाय त्यांना मधुमेह, उच्च रक्तदाब आणि हृदयरोग होता

दिलीपकुमार यांचे धाकटे बंधू अस्लम खान यांचे निधन, 88 व्या वर्षी अखेरचा श्वास
Follow us
| Updated on: Aug 21, 2020 | 11:27 AM

मुंबई : ज्येष्ठ अभिनेते दिलीपकुमार यांचे धाकटे बंधू अस्लम खान यांचे निधन झाले. मुंबईतील लीलावती रुग्णालयात त्यांनी आज सकाळी अखेरचा श्वास घेतला. दिलीपकुमार यांचे दोन भाऊ एहसान खान आणि अस्लम खान यांना गेल्या आठवड्यात रुग्णालयात दाखल करण्यात आले. 16 ऑगस्ट रोजी त्यांच्या कोरोना चाचणीचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. (Younger brother of Veteran actor Dilip Kumar Aslam Khan passed away)

दिलीपकुमार यांच्या दोन्ही भावांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सुरुवातीला सांगण्यात आले होते. मात्र सर्वात धाकटे असलेल्या अस्लम खान यांची प्राणज्योत शुक्रवारी सकाळी मालवली. ते 88 वर्षांचे होते.

लीलावती रुग्णालयाच्या माहितीनुसार अस्लम खान यांची कोव्हिड चाचणी पॉझिटिव्ह आल्याशिवाय त्यांना मधुमेह, उच्च रक्तदाब आणि हृदयरोग होता. याशिवाय वयोमानापरत्वे त्यांच्या प्रकृतीविषयी चिंता व्यक्त केली जात होती.

श्वासोच्छवास घेण्यास त्रास झाल्याने शनिवारी रात्री उशिरा एहसान खान आणि अस्लम खान या दोघांना रुग्णालयात दाखल केले होते. त्यांना  रुग्णालयात दाखल केल्यानंतर दिलीपकुमार यांची पत्नी आणि ज्येष्ठ अभिनेत्री सायरा बानू यांनी वृत्त्ताला अधिकृत दुजोरा दिला होता. “डॉक्टर जलील पारकर आणि हृदय रोग तज्ज्ञ नितीन गोखले त्यांच्यावर उपचार करत आहेत” असे सायरा बानू यांनी सांगितले होते.

दरम्यान, दिलीपकुमार यांचे दुसरे बंधू एहसान खान यांचीही प्रकृती चिंताजनक आहे. ते 90 वर्षांचे आहेत. तर 97 वर्षीय दिलीपकुमार यांना घरी आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले असून ते सुखरुप आहेत. (Younger brother of Veteran actor Dilip Kumar Aslam Khan passed away)

संबंधित बातमी :

ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार सेल्फ क्वारंटाईन, दोघा भावांना कोरोनाची लागण 

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.