Dilip Kumar Brothers | ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार सेल्फ क्वारंटाईन, दोघा भावांना कोरोनाची लागण

Dilip Kumar Brothers | ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार सेल्फ क्वारंटाईन, दोघा भावांना कोरोनाची लागण
जेष्ठ अभिनेते दिलीपकुमार यांना रुग्णालयातून डिस्चार्ज

बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांच्या दोघा भावांना कोरोनाची लागण झाली (Dilip Kumar Brothers Tested Corona Positive) आहे.

Namrata Patil

|

Aug 17, 2020 | 12:13 AM

मुंबई : बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांच्या दोघा भावांना कोरोनाची लागण झाली आहे. एहसान खान आणि असलम खान यांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. त्यांच्यावर लिलावती रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यामुळे दिलीप कुमार यांना क्वारंटाईन करण्यात आलं आहे. (Actor Dilip Kumar Brothers Tested Corona Positive)

मिळालेल्या माहितीनुसार, एहसान खान आणि असलम खान यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. त्या दोघांना डॉक्टर नितीन गोखले यांच्या सल्ल्यानुसार रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यावेळी त्यांची कोरोना चाचणी केली असता, त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्या दोघांना अतिदक्षता कक्षात ठेवण्यात आलं असून ते व्हेंटिलेटरवर आहेत, अशी माहिती डॉक्टरांनी दिली.

दिलीप कुमार यांचे वय 97 आहे. तर त्यांचे भाऊ एहसान खान यांचे वय 90 असून असलम खान यांचे वय त्यापेक्षा थोडे कमी आहे. त्यांना हृदयविकार आणि रक्तदाबाचाही त्रास आहे, असे डॉक्टरांनी सांगितले. दरम्यान दिलीप कुमार यांना आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे. (Actor Dilip Kumar Brothers Tested Corona Positive)

दिलीप कुमार यांच्या पत्नी सायराबानो यांनी असलम आणि एहसान हे लवकरच बरे होऊन घरी परततील, अशी आशा व्यक्त केली आहे.

दरम्यान दिलीप कुमार यांनी काही महिन्यांपूर्वी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी चाहत्यांना घरी राहण्याचे आवाहन केले होते. “मी तुम्हा सर्वांना आवाहन करतो की शक्यतो घरी राहून स्वतःचे व इतरांची काळजी घ्या. कोरोना विषाणू सर्व मर्यादा ओलांडतो. त्यामुळे आरोग्य विभागाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करा,” असे ट्विट दिलीप कुमार यांनी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केले होते.

याआधी बॉलिवूडच्या अनेक कलाकारांना कोरोनाची लागण झाली आहे. बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्या कुटुंबियाला कोरोनाची लागण झाली होती. अमिताभ बच्चन यांच्यासह मुलगा अभिषेक बच्चन, सून ऐश्वर्या बच्चन, नात आराध्या बच्चन या चौघांना कोरोना झाला होता. मात्र आता सर्व बच्चन कुटुंबिय कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. (Actor Dilip Kumar Brothers Tested Corona Positive)

संबंधित बातम्या : 

ऐश्वर्या आणि आराध्याची कोरोनावर मात, अभिषेक बच्चनचे ट्वीट

Amitabh Bachchan | बिग बींनी कोरोनाला हरवलं, अमिताभ बच्चन यांना डिस्चार्ज

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें