Armaan Malik | अरमान मलिक पाचव्यांदा होणार पिता; दुसऱ्या पत्नीने बाळंतपणाच्या 5 महिन्यांतच दिली गुड न्यूज

प्रसिद्ध युट्यूबर अरमान मलिक त्याच्या खासगी आयुष्यामुळे सतत चर्चेत असतो. डिलिव्हरीच्या पाच महिन्यांतच अरमानची दुसरी पत्नी कृतिका दुसऱ्यांदा आई होणार आहे. यावर अरमानची पहिली पत्नी पायल तिच्यावर नाराज झाली आहे.

Armaan Malik | अरमान मलिक पाचव्यांदा होणार पिता; दुसऱ्या पत्नीने बाळंतपणाच्या 5 महिन्यांतच दिली गुड न्यूज
Youtuber Armaan MalikImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Sep 11, 2023 | 8:57 AM

मुंबई | 11 सप्टेंबर 2023 : अरमान मलिक हे नाव युट्यूब विश्वात फार प्रसिद्ध आहे. हैदराबादचा हा युट्यूबर त्याच्या खासगी आयष्यामुळे सर्वाधिक चर्चेत असतो. पायल आणि कृतिका या त्याच्या दोन पत्नी आहेत. काही महिन्यांपूर्वीच या दोघी एकत्र गरोदर होत्या. युट्यूब व्लॉगद्वारे हे तिघं त्यांच्या खासगी आयुष्यातील अनेक गोष्टी युजर्ससोबत शेअर करत असतात. एप्रिल महिन्यात पायल आणि कृतिकाने तीन मुलांना जन्म दिला. पायलने तिच्या जुळ्या मुलांचं नाव अयान आणि तुबा असं ठेवलं. तर कृतिकाने तिच्या मुलाचं नाव जैद असं ठेवलं. आता अरमानची दुसरी पत्नी कृतिका मलिक ही पुन्हा एकदा आई होणार असल्याचं कळतंय. याबद्दलचा खुलासा खुद्द कृतिकाने तिच्या नव्या व्लॉगमध्ये केला आहे.

कृतिका पुन्हा होणार आई

कृतिकाने नुकताच एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये ती म्हणतेय, “तुम्हा सर्वांसाठी एक गुड न्यूज आहे. पण मला समजत नाहीये की मी ते कसं सांगू? मी पुन्हा एकदा आई होणार आहे. मी गरोदर आहे.” यानंतर ती अरमान मलिकला आणि इतर सर्व कुटुंबीयांना ही गोड बातमी सांगते. यावर पायल आणि अरमान सोडून घरातील इतर सदस्य कृतिकाला म्हणतात, की किमान जैद सहा महिने होईपर्यंत तरी वाट पाहायची होती. हे ऐकल्यानंतर कृतिका डॉक्टरांना भेटायला जाते. या व्लॉगमध्ये पुढे पायल कृतिकाला म्हणते की, ती तिच्यावर नाराज आहे. कारण कृतिकाने गरोदर असल्याची बातमी सर्वांत आधी तिला नाही सांगितली. यानंतर चिकू म्हणतो की तो त्याची आई पायलसोबत घर सोडून निघून जाईल.

हे सुद्धा वाचा

अरमान मलिकचे तीन लग्न

अरमान मलिकने दोन लग्न केले आहेत. पायल ही त्याची पहिली पत्नी असून तिच्याशी त्याने 2011 मध्ये लग्न केलं होतं. तर दुसरी पत्नी कृतिका मलिक आहे. अरमानने कृतिकाने 2018 मध्ये लग्न केलं. दुसरीकडे कृतिका आणि पायल यांना दावा केला होता की अरमानने वयाच्या 17 व्या वर्षीच पायलच्याही आधी आणखी एक लग्न केलं होतं. इतकंच नव्हे तर पहिल्या पत्नीपासून त्याला मुलंही आहेत. अरमानच्या पहिल्या पत्नीचं नाव त्यांनी सुमित्रा असं सांगितलं.

Non Stop LIVE Update
अत्यंत किळसवाणा प्रकार.. हा व्हिडीओ बघा, तुम्ही समोसा खाणच सोडून द्याल
अत्यंत किळसवाणा प्रकार.. हा व्हिडीओ बघा, तुम्ही समोसा खाणच सोडून द्याल.
संजय राऊत यांची पंतप्रधान मोदींवर टीका, 'या' नेत्यानं काढली लायकी
संजय राऊत यांची पंतप्रधान मोदींवर टीका, 'या' नेत्यानं काढली लायकी.
आमदार नीट वागत नाही, कारवाई करा; नार्वेकरांचा थेट राज्यपालांना मेल?
आमदार नीट वागत नाही, कारवाई करा; नार्वेकरांचा थेट राज्यपालांना मेल?.
मानेंच्या बॅनरवर विकासकामांची माहिती देणारं QR कोड, पण स्कॅन केलं अन..
मानेंच्या बॅनरवर विकासकामांची माहिती देणारं QR कोड, पण स्कॅन केलं अन...
'तू बदनाम कर, तेरी औकात...', कुठे झळकले भावना गवळी यांचे बॅनर्स?
'तू बदनाम कर, तेरी औकात...', कुठे झळकले भावना गवळी यांचे बॅनर्स?.
... अन् बिबट्यानं ठोकली धूम, वनविभागाकडून शोधमोहीम सुरू
... अन् बिबट्यानं ठोकली धूम, वनविभागाकडून शोधमोहीम सुरू.
पोलीस भरतीची तयारी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी, राज्यभरात आजपासून...
पोलीस भरतीची तयारी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी, राज्यभरात आजपासून....
पवार काका-पुतणे भविष्यात एकत्र येणार? अजितदादा स्पष्टच म्हणाले, आमचं..
पवार काका-पुतणे भविष्यात एकत्र येणार? अजितदादा स्पष्टच म्हणाले, आमचं...
कोल्हे Vs दादा; पवारांच्या टीकेवर लाव रे तो व्हिडीओनं कोल्हेंचं उत्तर
कोल्हे Vs दादा; पवारांच्या टीकेवर लाव रे तो व्हिडीओनं कोल्हेंचं उत्तर.
महायुतीच्या जागेचा फॉर्म्युला, शाहांच्या उपस्थितीत शिक्कामोर्तब होणार
महायुतीच्या जागेचा फॉर्म्युला, शाहांच्या उपस्थितीत शिक्कामोर्तब होणार.