Zee Marathi Awards | ‘सर्वोत्कृष्ट सुने’चा पुरस्कार नेमका कोणाचा? जुन्या शुभ्राचा की नव्या? पाहा काय म्हणाल्या अभिनेत्री…

नुकताच ‘झी मराठी अवॉर्ड्स 2020-21’ (Zee Marathi Awards) या रंगतदार सोहळ्याचा पूर्वार्ध पार पडला. या सोहळ्यात प्रेक्षकांच्या लाडक्या मालिका आणि त्यातील सर्वोकृष्ट व्यक्तिरेखा यांना पुरस्काराने गौरवण्यात आले होते.

Zee Marathi Awards | ‘सर्वोत्कृष्ट सुने’चा पुरस्कार नेमका कोणाचा? जुन्या शुभ्राचा की नव्या? पाहा काय म्हणाल्या अभिनेत्री...
शुभ्रा

मुंबई : नुकताच ‘झी मराठी अवॉर्ड्स 2020-21’ (Zee Marathi Awards) या रंगतदार सोहळ्याचा पूर्वार्ध पार पडला. या सोहळ्यात प्रेक्षकांच्या लाडक्या मालिका आणि त्यातील सर्वोकृष्ट व्यक्तिरेखा यांना पुरस्काराने गौरवण्यात आले होते. या सोहळ्यात एका पुरस्काराकडे आणि तो स्वीकारणाऱ्या नायिकेकडे प्रेक्षकांचे विशेष लक्ष लागून राहिले होते. हा पुरस्कार होता ‘सर्वोत्कृष्ट सुने’चा. यंदा ‘सर्वोत्कृष्ट सून’ म्हणून ‘शुभ्रा’ (Shubhra) या व्यक्तिरेखेला पुरस्कार जाहीर करण्यात आला होता. मात्र, हा पुरस्कार स्वीकारायला नवी शुभ्रा अर्थात अभिनेत्री उमा पेंढारकर (Uma Pendharkar) मंचावर गेल्यामुळे सगळ्यांच्याच चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते (Zee Marathi Awards Fans get confused when new shubhra gets an award as best daughter in law).

गेल्या काही वर्षांपासून तेजश्री प्रधानने (Tejashri Pradhan) अभिनयाच्या जोरावर लाखो प्रेक्षकांची मने जिंकली. ‘होणार सून मी या घर’ची या मालिकेतून खऱ्या अर्थाने तिला प्रचंड लोकप्रियता मिळाली. याच अभिनयाच्या जोरावर तेजश्रीने ‘अग्गबाई सासूबाई’ या मालिकेतील ‘शुभ्रा’ या व्यक्तीरेखेसाठी ‘सर्वोत्कृष्ट सून’ या पुरस्कारावर आपले नाव कोरले होते.

उमाने स्वीकारला पुरस्कार

या पुरस्कार सोहळ्यात तेजश्रीला जरी हा पुरस्कार मिळाला असला, तरी तो पुरस्कार नवीन शुभ्राने स्वीकारल्याने थोडासा गोंधळ उडाला होता. ‘अग्गबाई सासूबाई’च्या जागी आलेली नवीन मालिका ‘अग्गबाई सूनबाई’ला यंदा नामांकन मिळाले नव्हते, तरी तो पुरस्कार उमा पेंढारकर या नव्या अभिनेत्रीला कसा काय दिला गेला?, हा प्रश्न सर्वांना पडला होता. परंतु, आता दोघींनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमुळे हा गोंधळ सुटला आहे (Zee Marathi Awards Fans get confused when new shubhra gets an award as best daughter in law).

नेमकं काय झालं?

‘सर्वोत्कृष्ट सून’ हा पुरस्कार खरं तर तेजश्री प्रधान या अभिनेत्रीला मिळाला होता. तर, उमा पेंढारकरने तेजश्रीच्या वतीने हा पुरस्कार स्वीकारला होता. उमाने इंस्टास्टोरीमध्ये या पुरस्कारासंदर्भात बोलताना लिहिले की, ‘काल तेजश्री प्रधान ताईच्या वतीने हा पुरस्कार स्वीकारताना मला खूप आनंद झाला होता. तुला मनापासून शुभेच्छा. तुझ्या इतक्याच ऊर्जेने ते पात्र साकारायला मी उत्सुक आहे.’

Story

उमाची इन्स्टा स्टोरी

यावर स्टोरीवर उत्तर देताना तेजश्री म्हणाली, ‘खूप खूप धन्यवाद उमा. मला खात्री आहे की, तू नक्की जादू करशील आणि तू शुभ्रा बनून स्वतःचे नाव तयार करशील.’ दोघींच्या या पोस्टमुळे अनेक चाहत्यांचा हा संभ्रम दूर झाला आहे. सध्या या मालिकेत उमा देखील उत्तम अभिनय करत असून, चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे. तेजश्री लवकरच बॉलिवूड चित्रपटात झळकणार असल्यामुळे तिने सध्या मालिका सोडण्याचा निर्णय घेतला होता.

(Zee Marathi Awards Fans get confused when new shubhra gets an award as best daughter in law)

हेही वाचा :

कर्मभूमीचं ऋण अपार मानणाऱ्या या अभिनेत्याचं अभिनंदन, राज ठाकरेंचं रजनीकांत यांच्यासाठी खास ट्विट

Birthday Wishes | ‘तू माझं जग आहेस…’, पडद्यावरच्या ‘गुरुनाथ’ची खऱ्या आयुष्यातल्या ‘राधिका’साठी खास पोस्ट!

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI