बोस्टन, वॉशिंग्टन, सॅन फ्रान्सिस्को; बलाढ्य देशातही वाढला रामभक्तांचा उत्साह, प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाची होतेय जय्यत तयारी

22 जानेवारीला अयोध्येतील राम मंदिरात रामललाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची वेळ जवळ येत आहे. भाविकांच्या उत्साहाने परिसीमा ओलांडली आहे. हा ऐतिहासिक सोहळा साजरा करण्यासाठी अमेरिकेतही मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

बोस्टन, वॉशिंग्टन, सॅन फ्रान्सिस्को; बलाढ्य देशातही वाढला रामभक्तांचा उत्साह, प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाची होतेय जय्यत तयारी
US RAM MANDIRImage Credit source: TV9 NEWS NETWORK
Follow us
| Updated on: Jan 14, 2024 | 11:47 PM

नवी दिल्ली | 13 जानेवारी 2024 : 22 जानेवारी रोजी अयोध्येतील राम मंदिरात राम लल्लाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा साजरा होत आहे. देशभरात उत्साहाचे वातावरण आहे. अशातच अमेरिकेतही सुमारे डझनभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. संपूर्ण अमेरिकेतील लोक राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठा सोहळा साजरा करणार आहेत. न्यू यॉर्क टाईम्स स्क्वेअर, बोस्टन, वॉशिंग्टन, डीसी, एलए किंवा सॅन फ्रान्सिस्को येथे या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे भारतात अभिषेक समारंभाच्या वेळीच हे कार्यक्रम होणार आहेत.

यूएस – इंडिया स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप फोरम (USISPF) चे अध्यक्ष आणि सीईओ मुकेश अघी यांनी या उत्साहाबद्दल माहिती देताना सांगितले की, ‘अमेरिकेत सुमारे डझनभर कार्यक्रम होणार आहेत. जिथे लोक राम मंदिराचा अभिषेक सोहळा साजरा करणार आहेत. न्यू यॉर्क टाईम्स स्क्वेअर, बोस्टन, वॉशिंग्टन, डीसी, एलए किंवा सॅन फ्रान्सिस्को येथे कार्यक्रमांचे आयोजन केले गेले आहे, जे भारतात अभिषेक समारंभाच्या वेळीच होणार आहेत.

भारतीय अमेरिकन समुदायाची भौगोलिक सीमा ओलांडणाऱ्या राम मंदिर प्राण प्रतिष्ठा कार्यक्रमाशी सांस्कृतिक, भावनिक आणि धार्मिक संलग्नता आहे. सुमारे 5 दशलक्ष इतक्या मोठ्या संख्येने भारतीय अमेरिकेत स्थलांतरित झाले आहेत. मात्र, त्यांनी आपली संस्कृती सोडलेली नाही. त्यांची भावनिक आणि धार्मिक नाळ अजूनही जोडलेली आहे. याचेच प्रतिबिंब म्हणून हा सोहळा अमेरिकेतही साजरा करण्यात येणार आहे.

राम मंदिरासाठी टेस्ला कार लाइट शो

दरम्यान, अमेरिकेतील भारताचे राजदूत तरनजीत सिंग संधू यांनी यूएस कॅपिटल हिल येथे एका कार्यक्रमादरम्यान रामायण महाकाव्याच्या महत्त्वावर भर दिला. अमेरिकेच्या विश्व हिंदू परिषदेने मेरीलँडमध्ये टेस्ला म्युझिकल लाइट शो आयोजित केला होता. ज्यामध्ये 150 हून अधिक कार सहभागी झाल्या होत्या. टेस्ला कार लाइट शोमध्ये ‘जय श्री राम’ च्या सुरात अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाच्या उत्सवाची हिंदू समुदायाने झलक दाखविली.

मॉरिशसमध्ये विशेष व्यवस्था

मॉरिशस सरकारने 22 जानेवारीला हिंदू अधिकाऱ्यांसाठी दोन तासांची विशेष सुट्टी जाहीर केली आहे. अयोध्येतील राम लल्लाच्या ‘प्राण प्रतिष्ठे’च्या निमित्ताने होणाऱ्या स्थानिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी त्यांना वेळ मिळावा, हा यामागे हेतू आहे. पंतप्रधान प्रविंद कुमार जगन्नाथ यांच्या नेतृत्वाखाली मॉरिशस मंत्रिमंडळाने याला मंजुरी दिली. तर, दुसरीकडे अमेरिकेतील 10 हून अधिक राज्यांमध्ये भगवान राम आणि राम मंदिराचे 40 हून अधिक होर्डिंग लावण्यात आले आहेत.

Non Stop LIVE Update
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला.
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा.
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला.
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर.
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य.
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'.
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका.
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?.
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार.
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला.