अक्षयच्या ‘मिशन मंगल’चा धमाकेदार टीझर रिलीज

बॉलिवूडचा ‘खिलाडी’ म्हणजेच अक्षय कुमार हा नेहमीच वेगवेगळ्या विषयांवर सिनेमा करत असतो. सध्या तो त्याच्या आगामी ‘मिशन मंगल’मध्ये व्यस्त आहे. त्याच्या या सिनेमाचा टीझर नुकताच लाँच झाला. ‘मिशन मंगल’ चा टीझर खूप धमाकेदार आहे.

अक्षयच्या ‘मिशन मंगल’चा धमाकेदार टीझर रिलीज

मुंबई : बॉलिवूडचा ‘खिलाडी’ म्हणजेच अक्षय कुमार हा नेहमीच वेगवेगळ्या विषयांवर सिनेमा करत असतो. सध्या तो त्याच्या आगामी ‘मिशन मंगल’मध्ये व्यस्त आहे. त्याच्या या सिनेमाचा टीझर नुकताच लाँच झाला. ‘मिशन मंगल’ चा टीझर खूप धमाकेदार आहे. या सिनेमाचा टीझर अक्षय कुमारने त्याच्या इन्स्टाग्राम आणि ट्वीटर अकाऊंटवर शेअर केला.

‘एक देश, एक स्वप्न आणि एक इतिहास. इंडिया स्पेस मिशनची खरी कहाणी’, असं लिहत अक्षय कुमारने ट्वीटरवर ‘मिशन मंगल’ टीझर शेअर केला. अक्षय कुमारच्या या ट्वीटवर त्याच्या चाहत्यांकडून अनेक कमेंट  केल्या जात आहेत. ‘मिशन मंगल’ च्या टीझरनंतर अक्षयसोबतच इतर सर्व कलाकारांचंही कौतुक केलं जात आहे. जगन शक्ति यांनी ‘मिशन मंगल’चं दिग्दर्शन केलं आहे.

अभिनेता अक्षय कुमार, अभेनेत्री विद्या बालन, तापसी पन्नू, सोनाक्षी सिन्हा, अभिनेता शरमन जोशी अशी तगडी स्टारकास्ट असलेला ‘मिशन मंगल’ हा सिनेमा येत्या 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिनाला प्रदर्शित होणार आहे. भारताच्या मंगळ ग्रहावर पोहोचण्याची कहाणी या सिनेमात दाखवण्यात आली आहे. टीझरच्या सुरुवातीलाच हा सिनेमा एका वास्तविक घटनेवर आधारित असल्याचं स्पष्ट केलं गेलं. सिनेमाचा टीझर अत्यंत जबरदस्त आहे. यामध्ये भारताचा मंगळ ग्रहावर पोहोचण्याचा प्रवास दाखवण्यात आला आहे.

‘मिशन मंगल’ या सिनेमाच्या टीझरनंतर अक्षय कुमारच्या चाहत्यांमध्ये या सिनेमाबाबत आणखी उत्सुकता निर्माण झाली आहे. आता चाहत्यांना 15 ऑगस्टची प्रतिक्षा आहे. अक्षय कुमारचा हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर काय कमाल दाखवतो हे पाहाणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *