अमित शाहांनी भाजपच्या सर्व प्रदेशाध्यक्षांना दिल्लीत बोलावलं!

नवी दिल्ली : राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोराम या पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीचा काल निकाल समोर आल्यानंतर, भाजपचे धाबे दणाणले आहे. राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड यांसारखी मोठी राज्यं भाजपने हातून गमावली आणि मुख्य प्रतिस्पर्धी असलेल्या काँग्रेसने या राज्यांमध्ये विजय मिळवला. त्यामुळे भाजपमधील हालचाली आता वेगवान झाल्या आहेत. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह …

अमित शाहांनी भाजपच्या सर्व प्रदेशाध्यक्षांना दिल्लीत बोलावलं!

नवी दिल्ली : राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोराम या पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीचा काल निकाल समोर आल्यानंतर, भाजपचे धाबे दणाणले आहे. राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड यांसारखी मोठी राज्यं भाजपने हातून गमावली आणि मुख्य प्रतिस्पर्धी असलेल्या काँग्रेसने या राज्यांमध्ये विजय मिळवला. त्यामुळे भाजपमधील हालचाली आता वेगवान झाल्या आहेत.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी देशातील सर्व राज्यांच्या भाजप प्रदेशाध्यक्षांना दिल्लीत बोलावलं आहे. दिल्लीत अमित शाह यांच्याबरोबर या भाजप प्रदेशाध्यक्षांची बैठक होईल. दुपारी 2 वाजता ही बैठक नियोजित असल्याची माहिती मिळते आहे.

राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड ही तीन महत्त्वाची राज्य हातातून गेल्यानंतर भाजप खडाडून जागी झाली आहे. त्यामुळे पुढील रणनीती आखण्यासाठी आणि अपयशावर चिंतन करण्यासाठी बैठक बोलवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

काँग्रेसने भाजपकडून तीन राज्य हिसकावून घेतली!

मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, तेलंगणा आणि मिझोराम या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसने बाजी मारली आहे. ईशान्य भारतात हातात असलेलं एकमेव राज्य गमावलं असलं तरी हिंदी भाषिक तीन राज्यांमध्ये काँग्रेसने भाजपला चितपट केलंय. छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि राजस्थान ही तीन राज्य काँग्रेसने भाजपच्या ताब्यातून हिसकावून घेतली आहेत. राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेसने बहुमत मिळवलंय, तर मध्य प्रदेशात इतर पक्षांची मदत काँग्रेसला घ्यावी लागणार आहे. मोठ्या प्रतीक्षेनंतर मध्य प्रदेशातील चित्रही स्पष्ट झालंय.

अंतिम निकाल (राज्यनिहाय आकडेवारी)

राजस्थान (199) :

 • काँग्रेस –  99
 • भाजप – 73
 • इतर – 27

मध्य प्रदेश (230) :

 • काँग्रेस – 114
 • भाजप -109
 • इतर – 07

छत्तीसगड (90) :

 • काँग्रेस – 68
 • भाजप – 15
 • इतर – 07

तेलंगणा (119) :

 • टीआरएस – 88
 • काँग्रेस-टीडीपी – 19
 • भाजप – 01
 • इतर – 11

मिझोराम (40) :

 • एमएनएफ – 26
 • काँग्रेस – 05
 • भाजप – 01
 • इतर – 08

संबंधित बातम्या :

काँग्रेसने मध्य प्रदेशातही भाजपला मागे टाकलं, तीन राज्य हिसकावून घेतली!  

पाच राज्यांच्या निकालावर मोदींची पहिली प्रतिक्रिया  

राहुल गांधी यांच्या पत्रकार परिषदेतील 9 महत्त्वाचे मुद्दे  

‘घमेंडी’च्या विरोधात मतदारांची ‘मुसंडी’ : राज ठाकरे  

पाच राज्यांच्या निकालानंतर सोशल मीडियावर विनोदांचा पाऊस 

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *