Bharti Singh | ‘कामाची नशा करा, अमली पदार्थांची नाही’, मित्र सुनील पालचा भारतीला सल्ला!

‘कामाची नशा करा, अमली पदार्थांची नाही’, असे म्हणत त्यांनी ड्रग्ज कनेक्शनमध्ये अडकलेल्या कलाकारांना टोलादेखील लगावला आहे.

Bharti Singh | ‘कामाची नशा करा, अमली पदार्थांची नाही’, मित्र सुनील पालचा भारतीला सल्ला!
Follow us
| Updated on: Nov 22, 2020 | 5:11 PM

मुंबई : कॉमेडियन भारती सिंग (Bharti Singh) आणि तिचा नवरा हर्ष लिंबाचिया (Harsh Limbachiyaa) यांना एनसीबीने ड्रग्ज प्रकरणात अटक केली आहे. एनसीबीने ताब्यात घेतलेल्या ड्रग तस्कराच्या चौकशीत भारतीचे नाव समोर आले होते. यानंतर एनसीबीने भारती सिंग आणि हर्ष लिंबाचिया यांच्या घरी छापा टाकला. या छाप्यादरम्यान एनसीबीला भारतीच्या घरात गांजा देखील सापडला. भारती आणि हर्ष यांना एनसीबीने अटक केल्यानंतर त्यांचे जवळचे मित्र सुनील पाल (Sunil Pal) यांनी त्यांना ‘मोला’चा सल्ला दिला आहे (Comedian Sunil Pal Reacted on Bharti singh’s NCB Arrest).

‘कामाची नशा करा, अमली पदार्थांची नाही’, असे म्हणत त्यांनी ड्रग्ज कनेक्शनमध्ये अडकलेल्या कलाकारांना टोलादेखील लगावला आहे. या प्रकरणात भारतीचे नाव समोर आल्याने त्यांनी दुःखदेखील व्यक्त केले आहे.

ती स्टारची सुपरस्टार झाली…

सुनील पाल म्हणतात, ‘भारती सिंहने जेव्हा लाफ्टर चॅलेंजपासून करिअरची सुरुवात केली तेव्हापासून मी तिला ओळखत आहे. स्टेजवरच तिची आणि माझी ओळख झाली. नंतर ती हळूहळू एक स्टार बनली, सुपरस्टार बनली. पण, तिच्या स्वभावात कधीच फरक पडला नव्हता. तीने नेहमीच मला भाऊ मानले. नेहमी प्रेमाने सगळ्यांना भेटली. अचानक, काय घडले, कोणत्या संगतीने तिला या ड्रगच्या व्यसनी दुनियेकडे ढकलले, हे कळत नाही.ती खरेच खूप चांगली मुलगी असून, एका चांगल्या घरातून ती आली आहे. तिच्या घरचे देखील खूप साधे आहेत. तिची आई देखील खूप गोड, सरळ स्वभावाची आणि आनंदी स्त्री आहे.’ (Comedian Sunil Pal Reacted on Bharti singh’s NCB Arrest)

‘या क्षणी मला भारतीचा राग येतो आहे. मला तिला ओरडायचे आहे. आमच्या कॉमेडीचा भरती अभिमान होती. पूर्वी महिला कॉमेडी करत नव्हत्या. पण, भारतीमुळे अनेक स्त्रियांना कॉमेडी करण्याची प्रेरणा मिळाली. आज या प्रकारामुळे लोक सगळ्या कॉमेडियन्सकडे त्याच नजरेने पाहत आहेत. पण तरीही एनसीबीने केलेल्या कारवाईचे मी स्वागत करतो’, असे सुनील यांनी म्हटले.

कामाची नशा करा…

पुढे, भारती यांना सल्ला देताना सुनील पाल म्हणतात, कामाची नशा करा, अमली पदार्थांची नाही.’ आई सरस्वतीने तुम्हाला या ठिकाणापर्यंत पोहचवले आहे. वास्तविक हा आई सरस्वतीचा अपमान आहे. हा देवाचा अपमान आहे. कोट्यावधी लोकांमधून तुम्हाला हे यश मिळाले आहे. तुमच्यावर बऱ्याच लोकांचे आशीर्वाद आहेत. तू त्यांच्या दयाळूपणाचा अपमान केला आहेस. या सगळ्यामुळे मी खूप दुखी आहे. केस्टो मुखर्जी मद्यपी म्हणून पडद्यावर काम करायचे. लोक त्यांना मद्यपी म्हणत. परंतु, त्यांनी आयुष्यभर कधीही दारूला स्पर्श केला नाही. अशा कलाकारांचा आपण आदर्श घेतला पाहिजे.’

(Comedian Sunil Pal Reacted on Bharti singh’s NCB Arrest)

Non Stop LIVE Update
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल.
राणा दाम्पत्याची अडसूळांनी काढली अक्कल; म्हणाले, राजकारण सोडेल पण...
राणा दाम्पत्याची अडसूळांनी काढली अक्कल; म्हणाले, राजकारण सोडेल पण....
पुढे द्रौपदीचा विचार...मुलींच्या जन्मदरावर दादांच्या वक्तव्याची चर्चा
पुढे द्रौपदीचा विचार...मुलींच्या जन्मदरावर दादांच्या वक्तव्याची चर्चा.
थेट विमानातून पंतप्रधान मोदी झाले 'त्या' विलक्षण सोहळ्याचे साक्षीदार
थेट विमानातून पंतप्रधान मोदी झाले 'त्या' विलक्षण सोहळ्याचे साक्षीदार.
उदयनराजेंना तिकीट मिळालं पण भाजपने अपमान केला, अभिजीत बिचुकलेंची टीका
उदयनराजेंना तिकीट मिळालं पण भाजपने अपमान केला, अभिजीत बिचुकलेंची टीका.
संध्याकाळी 6 वाजेनंतर उमेदवारांना प्रचार करता येणार नाही, कारण....
संध्याकाळी 6 वाजेनंतर उमेदवारांना प्रचार करता येणार नाही, कारण.....
मी मी म्हणारे चालत नाही, ज्यांचे पुण्य संपले..., महाजनांचा रोख कुणावर?
मी मी म्हणारे चालत नाही, ज्यांचे पुण्य संपले..., महाजनांचा रोख कुणावर?.
चारही खांदे गेले तर मी..., राम बोलो भाई राम, गुलाबराव पाटलांची बॅटिंग
चारही खांदे गेले तर मी..., राम बोलो भाई राम, गुलाबराव पाटलांची बॅटिंग.
राणांची आनंद अडसूळांनी काढली अक्कल,पती-पत्नी त्यांच्या मुलाच्या भेटीला
राणांची आनंद अडसूळांनी काढली अक्कल,पती-पत्नी त्यांच्या मुलाच्या भेटीला.
पाहिजे तेवढा निधी देऊ, पण आमच्यासाठी बटण दाबा कचा कचा...दादांची बॅटिंग
पाहिजे तेवढा निधी देऊ, पण आमच्यासाठी बटण दाबा कचा कचा...दादांची बॅटिंग.