मान्सूनच्या आगमनाविषयी हवामान तज्ञांच्या अंदाजाने धाकधूक वाढली

नागपूर : विदर्भात एकीकडे तापमान वाढत आहे, तर दुसरीकडे मान्सूनही उशिरा येणार असल्याचं हवामान तज्ञांनी सांगितलंय. हवामान तज्ञांच्या मते, 7 जूनच्या ऐवजी मान्सूनला येण्यासाठी 15 ते 16 जूनपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी योग्य नियोजन करण्याचा सल्ला कृषी विभागाने दिलाय. विदर्भातील चंद्रपूरमध्ये आज जगातील सर्वोच्च तापमानाची नोंद करण्यात आली आहे. तर दुसरीकडे हा उन्हाचा …

मान्सूनच्या आगमनाविषयी हवामान तज्ञांच्या अंदाजाने धाकधूक वाढली

नागपूर : विदर्भात एकीकडे तापमान वाढत आहे, तर दुसरीकडे मान्सूनही उशिरा येणार असल्याचं हवामान तज्ञांनी सांगितलंय. हवामान तज्ञांच्या मते, 7 जूनच्या ऐवजी मान्सूनला येण्यासाठी 15 ते 16 जूनपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी योग्य नियोजन करण्याचा सल्ला कृषी विभागाने दिलाय. विदर्भातील चंद्रपूरमध्ये आज जगातील सर्वोच्च तापमानाची नोंद करण्यात आली आहे. तर दुसरीकडे हा उन्हाचा तडाखा आणखी काही दिवस सहन करावा लागणार आहे.

विदर्भात कापूस, धान, तूर, सोयाबीन ही पिके घेतली जातात. शेतकऱ्यांनी नियोजन केलं असून जमिनीची मशागत सुरु आहे. मात्र उशिरा मान्सून येत असल्याने पेरणीसाठी धाकधूक मनात आहे. कापूस या पिकाला वेळ लागतो, तर सोयाबीनचं पीक तीन ते चार महिन्यात येतं. त्यामुळे त्याच्यावर फार परिणाम होणार नाही. पण कापसावर परिणाम होऊ शकतो. सोबतच धान पिकासाठी पाण्याची मोठी आवश्यकता असते आणि पाऊस उशिरा आला तर त्याचं नियोजन चुकू शकतं. त्यामुळे योग्य नियोजन करण्याचा सल्ला कृषी विभाग देत आहे. त्यानुसार माहितीही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविली जात असल्याचं कृषी अधिकारी सांगतात.

मान्सून उशिरा म्हणजे 7 जूनच्या ऐवजी 15 ते 20 जूनपर्यंत आला तर कापसाच्या पिकाची लावणी करण्यास उशीर होणार आहे. मग शेवटच्या काळात पाऊस आला नाही, तर त्याचं नुकसान होऊ शकतं. त्यामुळे शेतकरी बांधवानो घाई करू नका, योग्य नियोजन करा आणि मगच पेरणी करा, असा सल्ला कृषी विभागाने दिलाय.

राज्यात कृत्रिम पाऊस पाडणार

राज्यात उद्‌भवलेल्या तीव्र दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी पाण्याच्या उपलब्धतेसाठी आवश्यक त्या सर्व तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलाय. पर्जन्यवाढीसाठी एरियल क्लाऊड सीडिंगची (Arial Cloud Seeding) उपाययोजना करून कृत्रिमरित्या पाऊस पाडण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.

राज्यात कमी पाऊस पडल्याने यंदा दुष्काळी परिस्थ‍िती असून बहुतांशी भागांमध्ये पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली आहे. अशा वेळी पर्जन्यमानात वाढ होणे आवश्यक आहे. त्यासाठी शासनाच्या पातळीवर विविध उपायांचा अवलंब करण्याबाबत विचारविनिमय सुरु आहे. कृत्रिम पर्जन्यमान हा त्यातलाच एक भाग आहे. सुयोग्य ढगांची उपलब्धता बघून राबविण्यात येणाऱ्या या उपाययोजनेबाबत अगोदरच निर्णय घेऊन पूर्वनियोजन करणे आवश्यक असल्याने आज मंत्रिमंडळाने एरियल क्लाऊड सीडिंग करून पर्जन्यवाढ करण्यास मान्यता दिली आहे. यासाठी 30 कोटी रूपयांच्या खर्चाच्या प्रस्तावासही मंजुरी देण्यात आली आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *