भाजपच्या शुभेच्छा स्वीकारल्या, आम्ही आघाडीसोबत जातोय : उद्धव ठाकरे

मी काँग्रेस-राष्ट्रवादीला काही नवी सुरवात करता येईन का हे विचारलं. त्याप्रमाणे आम्ही चर्चा करत आहोत, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

Uddhav Thackeray press conference, भाजपच्या शुभेच्छा स्वीकारल्या, आम्ही आघाडीसोबत जातोय : उद्धव ठाकरे

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray press conference) यांनी आज पुन्हा शिवसेना आमदारांशी चर्चा करुन त्यांच्याशी संवाद साधला. त्यानंतर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे (Uddhav Thackeray press conference)  यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचा सत्तास्थापनेचा दावा कायम असल्याचं सांगितलं. तसंच राज्यपालांवरही अप्रत्यक्ष टोलेबाजी केली. इतका दयाळू राज्यपाल पहिल्यांदाच पाहिल्याचा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला. 

भाजपने शिवसेनेला आघाडीसोबत जाण्यासाठी शुभेच्छा दिल्या. ते आम्हाला मित्र मानत होते की नाही, माहित नाही. पण आम्ही त्यांना मित्र मानत होतो, मानतो, त्यामुळे मित्रांनी आम्हाला शुभेच्छा दिल्याने आम्ही आघाडीसोबत नक्कीच जाऊ. मी काँग्रेस-राष्ट्रवादीला काही नवी सुरवात करता येईन का हे विचारलं. त्याप्रमाणे आम्ही चर्चा करत आहोत, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

उद्धव ठाकरे म्हणाले, “राज्यपालांनी सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपला जो वेळ दिला होता तो वेळ काल सायंकाळी संपणार होता. त्याआधीच राज्यपालांनी शिवसेनेला विचारणा केली. त्यात त्यांनी आमदारांच्या पाठिंब्याच्या सहीसह पत्र मागितलं. काँग्रेस-राष्ट्रवादीशी आम्ही काल संपर्क केला. त्याप्रमाणे काल राज्यपालांना देखील आम्ही दावा करताना पाठिंब्याचं पत्र दाखवण्यासाठी 48 तासांचा वेळ मागितला होता. राज्यपालांनी काल आम्हाला 7.30 पर्यंतची मुदत दिली. ती मुदत संपण्यापूर्वी म्हणजे भाजपला दिलेल्या वेळेतच आमच्या वेळेची मुदत देण्यात आली. त्या पत्रात आमदारांच्या पाठिंब्याच्या सह्या हव्या होत्या. काल आम्ही पहिल्यांदाच काँग्रेस आणि राष्ट्रवादीला संपर्क साधण्यात आला. आमचा मित्रपक्ष आम्ही भाजपपेक्षा आघाडीशी संपर्कात आहे असं म्हणत होता, त्यांना ते उत्तर होतं.

महाराष्ट्रासारखं राज्य चालवणं म्हणजे पोरखेळ नाही. म्हणून आम्ही आमच्यामध्ये स्पष्टता येण्यासाठी चर्चा सुरु केली. आम्ही राज्यपालांकडे 48 तास मागितले त्यांनी आम्हाला 6 महिने देतो म्हणून सांगितलं. इतका दयाळू राज्यपाल पहिल्यांदीच एखाद्या राज्याला मिळाला असेल.

जशी काँग्रेस-राष्ट्रवादीला काही मुद्द्यांवर स्पष्टता हवी, तशी शिवसेनेलाही काही मुद्द्यांवर स्पष्टता हवी आहे. आम्ही दोन विचारधारेचे पक्ष आहे. हे पक्ष एकत्र कसे येणार हा सर्वांना पडलेला प्रश्न आहे. याचं उत्तर सर्वांना लवकरच मिळेल. मात्र, मेहबुबा मुफ्ती आणि भाजप, नितीशकुमार-मोदी, चंद्रबाबू नायडू आणि मोदी हे कसे एकत्र येऊ शकतात याची माहिती मी मागितली आहे. त्यामुळे आम्ही वेगळे विचारधारा असलेले पक्ष एकत्र कसे येणार हे लवकरच सांगू.

भाजपसोबत जे ठरलं होतं त्यात अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रीपदाबाबत निश्चित निर्णय झाला होता. त्यांनी मला खोटं ठरवलं त्यामुळे माझा संताप झाला. मी असं ऐकलं की भाजपने जेव्हा सत्तास्थापन नकार दिला तेव्हा त्यांनी शिवसेनेला आघाडीसोबत जाण्यासाठी शुभेच्छा दिल्या. ते आम्हाला मित्र मानत होते की नाही, माहित नाही. पण आम्ही त्यांना मित्र मानतो, त्यामुळे मित्रांनी आम्हाला शुभेच्छा दिल्याने आम्ही आघाडीसोबत नक्कीच जाऊ.

भाजपशी संपर्क आहे. मात्र, प्रत्येकवेळी वेगळं ठरत असेल, तर त्याला काही अर्थ नाही. आम्ही हिंदुत्वाच्या मुद्द्यावर काम करतो. मात्र, भाजप हिंदुत्व म्हणत खोटं बोलणार असेल तर ते योग्य नाही.

मी अरविंद सावंत यांना धन्यवाद देतो. या कडवट शिवसैनिकाने शिवसेना पक्षप्रमुखांचा शब्द म्हणून तात्काळ राजीनामा दिला. असा शिवसैनिक असणं याचा मला अभिमान आहे”.

मी काँग्रेस-राष्ट्रवादीला काही नवी सुरवात करता येईन का हे विचारलं. त्याप्रमाणे आम्ही चर्चा करत आहोत. राष्ट्रपती राजवटीविरोधात आम्ही याचिका केलेली नाही. आम्ही 48 तासांची मागणी केली, त्यांनी 6 महिने वेळ दिला आहे. त्यामुळे त्यांच्याविरोधात आम्ही याचिका करणार नाही.

काँग्रस-राष्ट्रवादीने आम्ही काल पहिल्यांदा संपर्क केल्याचं स्पष्ट केलं आहे. त्यावरुन भाजप जो आरोप करत होता की आम्हाला काँग्रेस-राष्ट्रवादीशी बोलायला वेळ आहे. पण आमच्याशी बोलण्यासाठी वेळ नाही, असं म्हणत होते. ते खोटं असल्याचं स्पष्ट होतं. राज्याला नवी दिशा देता येईन का यावर आम्ही चर्चा करत आहोत.

आतापर्यंत आम्ही केवळ एकदा चर्चा केली, अजून भेटही झालेली नाही. आधी आम्हाला भेटू द्या. मग आम्ही ठरवू.

भाजपचा पर्याय मी संपवलेला नाही, त्यांनी संपवला. लोकसभा निवडणुकीच्यावेळी ते सत्तेत येणार की नाही हे स्पष्ट नव्हतं तरी मी त्यांच्यासोबत गेलो. त्यावेळी युती करताना जे ठरलं होतं ते त्यांनी पाळलं नाही. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी स्वतः आम्हाला आघाडीसोबत जाण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. त्यामुळे आम्ही निर्णय घेऊ.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *